Shukra Gochar 2024 in Kark : ज्योतिषशास्त्रानुसार धन- वैभव, प्रेम व आकर्षणाचा कारक म्हणजेच शुक्र ग्रहाने ७ जुलै (रविवारी) कर्क राशीत प्रवेश केला आहे. शुक्राच्या कर्क राशीत प्रवेशाने बुध व शुक्राची युती तयार होत आहे. जेव्हा बुध व शुक्र ग्रह एकत्र येतात तेव्हा लक्ष्मी नारायण राजयोग तयार होतो. लक्ष्मी नारायण योग हा अत्यंत शुभ व लाभदायक मानला जातो. ३१ जुलैपर्यंत लक्ष्मी नारायण योग कायम असणार आहे व त्याच्या प्रभावाने ५ राशींचे नशीब उजळणार आहे. पुढील २३ दिवसांमध्ये कोणत्या राशींना राजेशाही वैभव प्राप्त होईल, अपार धन- संपत्ती लाभेल हे पाहूया..

लक्ष्मी नारायण राजयोगामुळे ‘या’ ५ राशी होणार अपार श्रीमंत

वृषभ रास (Taurus Rashi Bhavishya)

शुक्र गोचर झाल्याने वृषभ राशीला सर्वात मोठा फायदा होणार आहे. आपल्याला अडकून पडलेले पैसे परत मिळू शकतात. आपल्या आर्थिक मिळकतीत वाढ होऊ शकते. आपल्याला बँक बॅलन्स वाढण्यासाठी नव्या नोकरीची मदत होऊ शकते. आपल्या नेहमीच्या कामातून वेगळा मार्ग काढून त्यातून धनप्राप्ती वाढवू शकता. आपल्या आयुष्यात सुख सुविधा वाढतील. भौतिक सुखाची प्राप्ती होऊ शकते. वाहन खरेदीचे योग आहेत. प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करू शकता.

Guru Asta 2025 Guru will set for 27 days in the new year
Guru Ast 2025: नवीन वर्षात २७ दिवसांनी अस्त होणार गुरू! ‘या’ राशींची होणार चांदी, झटपट वाढेल पगार
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Mangal Rashi Parivartan 2024
४२ दिवसानंतर नुसता पैसा; मंगळाच्या राशी परिवर्तनाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्ती होणार भाग्यवान
Shani Budh Yuti 2025 astrology
Shani Budh Yuti 2025 : नवीन वर्षात सोन्याचा हंडा घेऊन लक्ष्मी ठोठावेल ‘या’ राशींच्या मंडळींचे दार? शनी-बुधाच्या संयोगाने होऊ शकाल लखपती
Rahu Gochar 2025
Rahu Gochar 2025 : राहु बदलणार चाल, पडणार पैशांचा पाऊस! ‘या’ तीन राशींचे चमकणार भाग्य
rahu shukra yuti 2025 in marathi astrology
Rahu Shukra Yuti 2025: २०२५ वर्ष ‘या’ तीन राशींसाठी सुखाचं! राहू-शुक्राच्या संयोगाने मिळणार प्रचंड पैसा, आनंद अन् मान सन्मान
Mars Gochar 2024
पुढील ११० दिवस मंगळ देणार बक्कळ पैसा; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार संपत्तीचे सुख अन् प्रत्येक कामात यश
Saturn-Venus gochar 2024
आजपासून शनी-शुक्र देणार नुसता पैसा ‘या’ तीन राशींचे चमकणार भाग्य

मिथुन रास (Gemini Horoscope)

लक्ष्मी नारायण योग तयार झाल्याने मिथुन राशीला धनलाभ होऊ शकतो. करिअर व व्यवसायात प्रगतीचे योग आहेत. आपल्या व्यक्तिमत्वाला साहसाची जोड लाभू शकते. कुटुंबातील व समाजातील आपले स्थान भक्कम होईल व प्रतिष्ठा वाढेल. कौटुंबिक सुख लाभू शकते. पती- पत्नीच्या नात्यात गोडी वाढू शकते. शुक्र हा प्रेमळ ग्रह मानला जातो त्यामुळे येत्या काळात आपण आपल्या जोडीदारासह नातं भक्कम करण्यावर आपण भर देऊ शकता.

कर्क रास (Cancer Rashi Bhavishya)

पुढील २३ दिवस आपलं नशीब जोरावर असणार आहे. अडकून पडलेले पैसे परत येतील. कामांना गती लाभेल. अचानक मिळणारा धनलाभ तुमच्या चैनीच्या इच्छा पूर्ण करेल. संतती सुख लाभू शकते. एखादे नवे घर घेऊ शकता. जोडीदाराला तुमच्यामुळे धनलाभ होऊ शकतो. भागीदारीच्या व्यवसायात प्रगतीची चिन्हे आहेत. शेअर बाजारात गुंतवणूक करताना थोडे साहस दाखवावे लागू शकते व घाई करू नये.

तूळ रास (Libra Astrology)

शुक्राचे गोचर आपल्यासाठी शुभ असू शकते, नव्या नोकरीच्या संधी मिळू शकतात. काही महत्त्वाचे बदल घडून येतील. अविवाहित मंडळींना लग्नासाठी चांगले स्थळ चालून येऊ शकते. आयुष्यात येणारी नवी व्यक्ती लक्ष्मीच्या रूपात आपल्या आयुष्यात प्रवेश घेऊ शकते. नवे आर्थिक स्रोत प्राप्त होऊ शकतात. प्रवासाचे योग आहेत. वाहन चालवतना काळजी घ्या.

हे ही वाचा<< शनी राहूच्या जोडीमुळे २०२५ पर्यंत तब्बल ८ राशी होणार अपार श्रीमंत; बघता बघता बदलेल आयुष्य, कुंडलीत कसे येतील अच्छे दिन?

मकर रास (Capricorn Horoscope)

खासगी आयुष्यातील राग-रुसवे दूर होऊ शकतात. प्रेमाची नाती भक्कम होतील. कामाच्या ठिकाणी हा महिना सर्वाधिक फायद्याचा ठरू शकतो. मेहनतीला पर्याय नाही पण आवश्यक तेवढी मेहनत घेतल्यास प्रचंड मोठा आर्थिक, मानसिक लाभ होऊ शकतो. तुमच्या कामाचे कौतुक होऊ शकते. वरिष्ठांकडून पदोन्नतीची संधी ऑफर केली जाऊ शकते.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Story img Loader