सप्टेंबर महिना काही राशींच्या लोकांसाठी अतिशय शुभ ठरणार आहे. बुध आणि शुक्र यांच्या युतीमुळे तयार होणारा लक्ष्मी नारायण योग या राशींच्या लोकांसाठी आर्थिकदृष्ट्या फलदायी ठरू शकतो. त्याचबरोबर या राशींच्या लोकांना करिअरमध्येही यश मिळेल. लक्ष्मी नारायण योग कन्या राशीमध्ये तयार होणार आहे. शुक्राच्या राशी परिवर्तनामुळे तयार होणारा लक्ष्मी नारायण योग कोणत्या राशींसाठी भाग्यदायी ठरणार आहे, हे जाणून घेऊया.

  • मेष

सप्टेंबर महिन्यात तयार होणाऱ्या लक्ष्मी नारायण योगामुळे मेष राशीच्या लोकांना खूप फायदा होऊ शकतो. व्यापारी वर्गाला मोठा नफा मिळू शकतो. नवीन नोकरीची ऑफर येऊ शकते. अविवाहितांचे लग्न ठरू शकते. मित्रांच्या मदतीने एखादे महत्त्वाचे काम पूर्ण होईल.

  • मिथुन

सप्टेंबर महिन्यात तयार होत असलेल्या लक्ष्मी नारायण योगामुळे मिथुन राशीच्या लोकांची रखडलेली कामे पूर्ण होतील. नोकरी करणाऱ्या लोकांना फायदा होईल. त्यांच्या कामाचे कौतुक होईल आणि उत्पन्नही वाढेल. व्यापाऱ्यांचा नफा वाढेल. तसेच, व्यवसायातील गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. परिश्रम केल्याने परीक्षा-मुलाखतीत यश मिळेल.

Monthly Horoscope September 2022 : सप्टेंबर महिन्यात ‘या’ राशींना मिळणार बाप्पाचा आशीर्वाद; जाणून घ्या मासिक राशीभविष्य

  • कर्क

बुध-शुक्र यांच्या संयोगाने तयार झालेला लक्ष्मी नारायण योग कर्क राशीच्या लोकांच्या करिअरला चालना देईल. सहकारी मदत करतील. या काळात धनलाभ होऊ शकतो. तुम्हाला मालमत्ता विकायची असेल तर चांगली डील होऊ शकते. कुटुंबाबरोबरच वेळ चांगला जाईल. गुंतवणुकीमुळे भविष्यात नफा मिळेल.

  • कन्या

कन्या राशीच्या लोकांसाठीही सप्टेंबर महिना शुभ राहील. नवीन संधी शोधून काढल्या तर तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. उत्पन्नही वाढेल आणि बचत करण्यातही यश मिळेल. जमीन-मालमत्तेतून लाभ होईल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. कर्जातून मुक्ती मिळेल. या काळात एकंदरीत तुम्हाला आनंद आणि आराम मिळेल.

  • धनु

धनु राशीच्या लोकांच्या उत्पन्नात सप्टेंबरच्या सुरुवातीपासूनच वाढ होऊ शकते. तुम्हाला अडकलेले पैसे मिळतील. अचानक कुठून तरी पैसे किंवा भेटवस्तू मिळू शकतात. तुमच्या कामाचे कौतुक होईल. नोकरीच्या ठिकाणी मान-सन्मान मिळेल. नोकरी बदलण्याची तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

Story img Loader