How to Worship Lakshmi Puja : दिवाळी हा हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा सण मानला जातो. पाच दिवसांचा हा सण दिव्यांची आरास, फराळ, फटाक्यांच्या आतिषबाजीने उत्साहात साजरा केला जातो. दिवाळीतील पाच दिवसांचे एक आगळे वेगळे महत्त्व आहे. दिवाळीतील या पाच दिवसांपैकी सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. या दिवशी लक्ष्मीची आराधना व पूजा केली जाते.
यंदा लक्ष्मीपूजन काही ठिकाणी ३१ ऑक्टोबर व काही ठिकाणी १ नोव्हेंबरला साजरे केले जाईल.. ज्या गावी अमावस्या सूर्यास्तानंतर किंवा त्यापेक्षा जास्त मिळत असेल, त्या गावी १ नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजन करावे आणि ज्या गावी अमावस्या २४ मिनिटांपेक्षा म्हणजे एक घटिकेपेक्षा कमी असेल अशा गावी ३१ ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजन करावे. अनेकांना लक्ष्मीची पूजा कशी मांडावी? घरी किंवा कामाच्या ठिकाणी लक्ष्मीपूजन कसे करावे, याविषयी माहिती नसते पण टेन्शन घेऊ नका. आज आपण या विषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
लक्ष्मीपूजन कसे करावे?
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मीची पूजा कशी करावी, याविषयी लोकसत्ताने पंडित उदय मोरोणे यांच्या हवाल्याने माहिती जाणून घेतली. ते सांगतात, “लक्ष्मी सरस्वती पूजनाचे तीन प्रकार निरनिराळे आहेत. भाद्रपद शुक्ल पक्षांत, अश्विन शुक्ल पक्षांत आणि कृष्ण अमावास्येस. या तीन प्रकारांपैकी पहिले दोन्ही प्रकार प्रत्येक घरीच होत असतात. परंतु तिसऱ्या प्रकारचे जे लक्ष्मीपूजन आहे ते फक्त “व्यापारे वसते लक्ष्मीः” या न्यायाने व्यापारी वर्गच आपल्या दुकानांतून, पेढींत, ऑफिसांत वैगरे सार्वजनिक उत्सवपद्धतीने करीत असतो.”
घरी लक्ष्मीपूजन कसे करावे आणि व्यापारी वर्गाने कामाच्या ठिकाणी लक्ष्मीपूजन कसे करावे? याविषयी पंडित उदय मोरोणे यांनी सविस्तर माहिती सांगितली आहे.
घरी लक्ष्मीपूजन कसे करावे?
सुरूवातीला चौरंग घ्यावा. चौरंगावर लाल कापड टाकावा. त्यावर तांदूळ टाकून एक कलश ठेवावा. त्या कलशावर एक प्लेट ठेवून त्या प्लेटवर लक्ष्मीची मूर्ती ठेवावी व त्या मूर्तीची पूजा करावी. तसेच लक्ष्मीचा फोटो ठेवावा व विडा ठेवावा. त्या विड्यावर नारळ ठेवावे. सुरूवातीला गणपतीची पूजा करावी नंतर लक्ष्मीची पूजा करावी. शेवटी मनोभावे आरती करावी.
व्यापारी वर्गाने कामाच्या ठिकाणी लक्ष्मीपुजन कसे करावे?
प्रथम आपल्या दुकानात पेढींत वगैरे रंगरोगणकरून साफसफाई करावी. तसेच फुलांच्या माळा, तोरणे, ध्वज पताका, केळीचे पाने, इत्यादी प्रकारांनी शोभा आणावी. बाहेरगावी असलेल्या व्यवसाय बांधवांना उत्सव समारंभास येण्याविषयी आमंत्रण पाठवावे. सरस्वती पूजनाकरिता स्वतःच्या पद्धतीप्रमाणे जमाखर्चाच्या वह्या, बुके तयार करून त्या सर्वांवर निदान खतावणी रोज किर्तन या दोन लोकांवर आरंभी तांबडे कुंकू लावून त्या गंधाने स्वास्तिक चिन्ह काढून त्यापुढे शाईने शक् संवत इसवी सन, वार, नक्षत्र इत्यादी कार्तिक शुक्ल, प्रतिपदेची तिथी पंचांगात पाहून लिहावी.
शेवटी तांबड्या गंधाने ‘शुभमस्तु’ असे लिहावे. शाईच्या दौतो, लेखण्या किंवा टाक स्वच्छ नव्या असाव्यात. गोडें तेलवात घातलेल्या समिईतील दिवा असावा. पुजेकरीता स्वच्छ उद्काने भरलेले तांब्याचे किंवा चांदीचे दोन कलश, पंचपात्री, ताम्हण, संध्येची पळी तांदूळ २ शेर, नारळ २, सुपाऱ्या २०, विड्याची पाने फळफळावळ, हळदकुंकू, अष्टगंध, गुलाल, बुका, जिरे, गूळ, फुले, तुळशी, दुर्वा, उदबत्ती, कापूर वाती, फुलवाती, नाडा बुडी नैवेद्याकरिता बत्तासे पेढे वगैरे एक कोरा पंचा चोळखण दक्षिणेसाठी काही नाणी याप्रमाणे सर्व साहित्याची तयारी करून अश्विन कृष्ण अमावस्या किंवा कार्तिक शुक्ल प्रतिपदा जसा स्वतःचा प्रघात चालू असेल त्या दिवशी सायंकाळी निशामुख समय दुकानांत दिव्यांची रोषणाई करून मुख्य मालकाने शुचिभूर्त होऊन पूजेचा आरंभ करावा दुकानात गाद्या, तक्के, लोड वगैरे घालून बिछायत करावी.
लक्ष्मीपूजन का करतात?
अश्विन वद्य अमावस्येला लक्ष्मी पूजन करण्याची परंपरा आहे. पण तु्म्हाला माहिती आहे का लक्ष्मीपूजन का केले जाते. या दिवशी बलीच्या बंदिवासातून लक्ष्मीची सुटका झाली होती याच आनंदात लक्ष्मीपूजन केले जाते, अशी आख्यायिका आहे.
लक्ष्मीचे वास्तव्य आपल्या घरात नेहमी रहावे, त्यासाठी मनोभावे लक्ष्मीपूजन केले जाते.याच कारणामुळे व्यापारी लोकही यादिवशी त्यांच्या कामाच्या ठिकाणी लक्ष्मीपूजन करता