Gaj Lakshmi Rajyog : ज्योतिषशास्त्रामध्ये गुरू हा अत्यंत शुभ ग्रह मानला जातो. त्याचा आकार मोठा आहे. तो १२ वर्षांमध्ये सर्व १२ राशींचे चक्र परिवर्तन करतो. एका राशीमध्ये बदल करताना गुरूला एका वर्षाचा वेळ लागतो. सध्या गुरू शुक्राची राशी वृषभ मध्ये विराजमान आहे. त्यानंतर गुरू मिथुन राशीमध्ये प्रवेश करणार आहे. शुक्र सुद्धा जुलै २०२५ मध्ये त्याच्या मागे मिथुन राशीमध्ये प्रवेश करणार आहे. दोन्ही शुभ ग्रह एकत्र आल्यामुळे मिथुन राशीमध्ये १२ वर्षानंतर गज लक्ष्मी राजयोग निर्माण होणार आहे. त्यामुळे तीन राशींचे नशीब पालटू शकते आणि त्यांना आकस्मिक धन लाभ मिळू शकतो.
गुरु- शुक्र कधी करणार युती?
हिंदू पंचागनुसार, गुरू पुढच्या वर्षी १४ मे २०२५ च्या रात्री मिथुन राशीमध्ये प्रवेश करणार आहे. त्यानंतर दोन महिन्यांनी म्हणजेच २६ जुलैला सकाळी ९ वाजता शुक्र ग्रह मिथुन राशीमध्ये प्रवेश करतील. ते २१ ऑगस्टापर्यंत मिथुन राशीमध्ये विराजमान राहतील. या दरम्यान गुरू आणि शुक्राची युती निर्माण होईल आणि गज लक्ष्मी राजयोग निर्माण होईल ज्यामुळे काही राशींना अपार धन लाभ होईल. त्या राशी कोणत्या जाणून घेऊ या.
हेही वाचा : सूर्य आणि शनि बदलणार आपली चाल, ‘या’ राशीच्या लोकांचे नशीब पलटणार, विलासी जीवनासह मिळेल अपार पैसा
u
तुला राशी (Tula Rashi)
गज लक्ष्मी राजयोग निर्माण झाल्यामुळे तुळ राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते. जोडीदाराबरोबर चांगले संबंध निर्माण होतील आणि हे लोक आयुष्यात मनसोक्त आनंद लुटू शकतील. कामाच्या ठिकाणी यश प्राप्त होतील. मेहनतीच्या जोरावर या लोकांना अनेक मोठ्या जबाबदार्या सोपवू शकतात. जुन्या गुंतवणुकेतून या लोकांना मोठा लाभ मिळू शकतो. कामा संबंधित या लोकांना अनेक ठिकाणी प्रवास करावा लागू शकतो.
सिंह राशी (Singh Rashi)
या राशीच्या लोकांसाठी पुढील वर्षी निर्माण होणारी गुरू आणि शुक्राची युती लाभदायक ठरू शकते. आपले आरोग्य उत्तम राहीन. व्यवसाय करणारे लोक व्यवसाय वाढवण्यास सक्षम राहतील. या लोकांची प्रमोशनसह पगारवाढ सुद्धा होईल. अडकलेले काम पूर्ण होतील.
हेही वाचा : पुढील १३४ दिवसांचा काळ कमावणार बक्कळ पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार प्रत्येक कामात यश
मिथुन राशि (Mithun Rashi)
या राशीच्या लोकांच्या जीवनात गज लक्ष्मी राजयोग निर्माण झाल्यामुळे अनेक स्त्रोत निर्माण होऊ शकतात. शुक्र देवाच्या कृपेमुळे या लोकांचे प्रेम संबंध उत्तम राहीन. या लोकांचा आर्थिक स्थिती उत्तम राहीन. विविध मुद्द्यांवरून हे लोक लोन परत फेड करण्यास यशस्वी होतील. जे तरुण मंडळी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहे. त्यांच्यासाठी आनंदाची बातमी मिळू शकते.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)