Chandra Grahan 2023 Dates and Time : वैदिक पंचागानुसार काही विशिष्ट काळाने सूर्यग्रहण अथवा चंद्रग्रहण असते; ज्याचा प्रभाव व्यक्तींच्या आयुष्यावर होत असतो. तसेच ग्रहण काही राशींच्या व्यक्तींसाठी शुभ असते; तर काही राशींच्या व्यक्तींसाठी अशुभ असते, असे मानले जाते. ऑक्टोबर महिन्यातील दोन ग्रहणांपैकी १४ ऑक्टोबर रोजी सूर्यग्रहण झाले; तर शनिवारी (२८ ऑक्टोबर) चंद्रग्रहण आहे.
केव्हा लागेल चंद्रग्रहण?
हे ग्रहण आश्विन पौर्णिमा, अश्विनी नक्षत्र व मेष राशीवर लागणार आहे. भारतीय वेळेनुसार ते शनिवार, २८ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री ११ वाजून ३२ मिनिटांनी सुरू होणार आहे आणि रविवार, २९ ऑक्टोबर रोजी पहाटे ३ वाजून ५६ मिनिटांनी ते संपेल.
हेही वाचा – २८ की २९ ऑक्टोबर, २०२३ चं शेवटचं खंडग्रास चंद्रग्रहण नक्की कधी? सुतक काळ, तिथी जाणून घ्या
केव्हा लागू होईल सुतक काळ?
या ग्रहणाचा सुतक काळ २८ ऑक्टोबर सांयकाळी ४ वाजून ५ मिनिटांपासून सुरू होईल आणि २९ ऑक्टोबरला पहाटे ३ वाजून ५६ मिनिटांपर्यंत होईल. ग्रहणकाळ संपल्यानंतर अंघोळ करावी आणि दान-पुण्य करावे, असे म्हणतात. हे ग्रहण संपूर्ण भारतामध्ये दिसणार आहे. अशा वेळी ग्रहणाचा प्रभाव सर्व राशींवर पडणार आहे, असे मानले जाते.चला तर मग जाणून घेऊ या चंद्रग्रहणाचा या सर्व राशींवर काय प्रभाव पडणार आहे ते..
सर्व राशींवर चंद्रग्रहणाचा काय परिणाम होईल?
- मेष : चंद्रग्रहणाच्या प्रभावामुळे मानसिक त्रास होऊ शकतो. त्यामुळे डोक्याला दुखापत होण्याची शक्यता आहे. परिणामत: सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जातो.
- वृषभ : चंद्रग्रहणाच्या प्रभावामुळे कुटुंबात वाद होऊ शकतात. तसेच आर्थिक नुकसान होऊ शकते.
- मिथुन – चंद्रग्रहणाच्या प्रभावाने आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे.
- कर्क : चंद्रग्रहणाच्या प्रभावामुळे वादविवादाची स्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीसह सतत वाद घालू नका. तसेच रागावर नियंत्रण ठेवा.
- सिंह : चंद्रग्रहणामुळे मुलांच्या बाबतीत चिंता वाढू शकते. कोणतेही महत्त्वाचे काम अडकू शकते.
- कन्या : चंद्रग्रहण काळात अनेक प्रकारे सुखाची प्राप्ती होऊ शकते. वाहन आणि मालमत्ता खरेदी करू शकता.
- तुला : चंद्रग्रहणाच्या प्रभावामुळे जोडीदारासह वाद होऊ शकतो. तसेच तणावाची स्थिती निर्माण होऊ शकते.
- वृश्चिक : चंद्रग्रहणाच्या प्रभावामुळे आजारपण येऊ शकते. खर्च वाढू शकतो.
- धनू : चंद्रग्रहणाच्या प्रभावामुळे या काळात तुम्हाला अपमानाचा सामना करावा लागू शकतो. कोणताही वाद निर्माण होऊ शकतो.
- मकर : चंद्रग्रहण काळात भौतिक सुखाच्या प्राप्तीची शक्यता आहे. वाहन आणि मालमत्तेचे सुख मिळू शकते.
- कुंभ : चंद्रग्रहणाच्या प्रभावामुळे व्यवसायात धनलाभ होऊ शकतो. तसेच अडकून राहिलेल्या आर्थिक व्यवहारातून धनप्राप्ती होऊ शकते.
- मीन : चंद्रग्रहणाच्या प्रभावाने व्यवसायाची प्रगती मंद गतीने होईल. तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते.
- (टीप : सदर लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)