Somvati Amavasya 2022 Date Muhurat Puja Vidhi: मे महिन्यात येणारी अमावस्या ही वर्षातील शेवटची सोमवती अमावस्या आहे. यावर्षी सोमवार, ३० मे २०२२ रोजी सोमवती अमावस्या व्रत पाळण्यात येणार आहे. २०२२ मध्ये सोमवारी येणारी अमावस्या फक्त २ वेळा साजरी केली जाणार आहे. एक ३१ जानेवारीला साजरी झाली आणि आता दुसरी ३० मे रोजी पडेल.
ज्येष्ठ महिन्यात येणारी सोमवती अमावस्या विशेष मानली जाते. सोमवती अमावस्येचे व्रत आणि पूजा केल्याने सौभाग्य प्राप्त होते. या दिवशी खास विवाहीत स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात आणि पिंपळाच्या झाडाची पूजा करतात. भगवान शिव-पार्वतीचीही पूजा केली जाते.
सोमवती अमावस्या तिथी आणि मुहूर्त
सोमवती अमावस्येचा शुभ मुहूर्त रविवार, २९ मे रोजी दुपारी ०२:५४ वाजता सुरू होईल आणि सोमवारी संपूर्ण दिवस उलटल्यानंतर, अमावस्या ०४:५९ वाजता संपेल. म्हणजेच सोमवारी संपूर्ण दिवस अमावस्या तिथी असेल. उदय तिथीनुसार तिथी मानली जात असल्याने अमावस्या ३० मे रोजीच साजरी केली जाईल. उदय तिथी म्हणजे सूर्याचा उदय.
सोमवारी ब्रह्म मुहूर्तावर पवित्र नदीत स्नान करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाईल. या दिवशी तीर्थक्षेत्रावर स्नान केले जाते. सोमवती अमावस्येला गंगा, सिंधू, कावेरी, यमुना, नर्मदा किंवा इतर कोणत्याही पवित्र नदीत अनंत वेळा स्नान केले जाते.
आणखी वाचा : Venus Transit May 2022: शुक्राचा मेष राशीत प्रवेश, धनहानीसह वैयक्तिक आयुष्यात अडचणी वाढू शकतात!
सोमवती अमावस्येला वट सावित्रीचा विशेष योग
या दिवशी वट सावित्री व्रत आणि शनी जयंती साजरी केली जाते. अनेक शुभ योगही तयार होत आहेत. २०२२ मधील शेवटची सोमवती अमावस्या सोमवार, ३० मे रोजी आहे. या दिवशी वट सावित्री व्रत आणि शनी जयंती असल्याने अनेक शुभ योगही तयार होत आहेत.
आणखी वाचा : विवाहीत महिलांनी अशा प्रकारे करावं सोळा श्रृंगार, जाणून घ्या काय म्हणतं ऋग्वेद?
सोमवती अमावस्या पूजा पद्धत
सोमवती अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. कारण या दिवशी स्नान व उपवासाचे विशेष महत्त्व आहे. गंगा किंवा कोणत्याही पवित्र नदीत स्नान करणे शक्य नसेल तर घरात स्नान करताना गंगाजल पाण्यात मिसळून स्नानही केले जाते. जर तुम्ही या दिवशी उपवास करत असाल तर पूजा करताना संकल्प घ्यावा, त्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे.
या दिवशी पितरांच्या नावाने तर्पण आणि दान करणे देखील शुभ मानले जाते. पितरांसाठी नैवेद्य दाखवावा. तसेच गरजूंना दान आणि दक्षिणा द्या. शक्य असल्यास सोमवती अमावस्येच्या दिवशी पीपळ, वड, केळी, लिंबू किंवा तुळशीचे झाड लावावे. सोमवती अमावस्येला भगवान शिवाची पूजा केल्याने चंद्र बलवान होतो. दुसरीकडे, या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केल्याने पैशाशी संबंधित समस्या देखील दूर होतात.