Lakshmi Narayan Yog: ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रह १० महिन्यानंतर मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहे. मित्र आणि गुरूच्या राशीमध्ये बुध ग्रहाची स्थिती मजबूत आणि शुभ प्रभाव देणार आहे. बुध देव २७ फेब्रुवारी रोजी मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहे. शुक्र येथे आधीच विराजमान राहणार आहे. अशात मीन राशीमध्ये बुध शुक्राच्या युतीने लक्ष्मी नारायण राजयोग निर्माण होणार आहे. लक्ष्मी नारायण योग वृषभ राशीसह पाच राशींचे नशीब चमकवणार आहे. जाणून घेऊ या लक्ष्मी नारायण योग कोणत्या राशींसाठी शुभ आहे.

वृषभ राशी

बुध ग्रह मीन राशीमध्ये गोचर करणार आहे त्यामुळे वृषभ राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत होणार. पैसा कमावण्याचे स्त्रोत उघडू शकतात ज्यामुळे आर्थिक स्थिती सुदृढ होणार. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ पगार वाढ आणि पदोन्नती साठी फायदेशी आहे. घर कुटुंबात सुख शांती लाभेल. आपल्या लोकांबरोबर चांगला वेळ घालवू शकतील. गुंतवणूक करणाऱ्या लोकांना नफा मिळू शकतो.

मिथुन राशी

मिथुन राशीच्या लोकासाठी बुध ग्रहाचे गोचर अत्यंत शुभ ठरणार आहे. करिअरमध्ये या लोकांची प्रगती होऊ शकते. नोकरीच्या शोधात असणाऱ्या लोकांना नोकरी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्या लोकांना लाभ मिळू शकतो आणि त्यांची आर्थिक स्थिती सुधारू शकते. आरोग्य उत्तम राहीन आणि कार्यक्षेत्रात नवीन जबाबदारी मिळू शकते. या काळात समस्या सोडवता येईल. मेहनतीचे फळ मिळेल. वैयक्तिक आणि व्यावसायिक आयु्ष्यात जीवनात संतुलन दिसून येईल.

कन्या राशी

कन्या राशीच्या लोकांसाठी करिअर आणि व्यवसायात अप्रत्यक्ष लाभ मिळू शकतो. मेहनतीचे सकारात्मक फळ मिळेल. पितृ संपत्तीपासून लाभ मिळू शकतो. उसणे दिलेले पैसे परत मिळू शकतात. नोकरीच्या शोधात असणाऱ्या लोकांना यश मिळू शकते. कौटुंबिक जीवनात आनंद दिसून येईल आणि जर तुम्ही नवीन व्यवसायात गुंतवणुक करण्याचा विचार करत असाल तर हा काळ उत्तम आहे.

मकर राशी

मकर राशीच्या लोकांसाठी हा गोचर शुभ संकेत देणारा ठरू शकतो. नोकरीमध्ये यश मिळू शकते तसेच व्यवसाय करणाऱ्या लोकांचे प्लॅनिंग यशस्वी होऊ शकते. आर्थित प्रकरणात ही वेळ उत्तम राहीन. विद्यार्थ्यांना कठीण परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. वैयक्तिक संबंधामुळे तणाव जाणवेल. कौटुंबिक प्रकरणात धीराने आणि समजुतदारपणे काम करणे आवश्यक आहे.

कुंभ राशी

कुंभ राशीच्या लोकांसाठी बुध गोचर आर्थिकदृष्ट्या अत्यंत लाभदायक ठरू शकतात. अचानक धनलाभ मिळू शकतो. संपत्ती प्राप्तीचे योग जुळून येईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण दिसेल. कुटुंबातील सदस्यांबरोबर गोडवा जाणवेल. पगारात आणि बचतमध्ये वृद्धी होईल. जोडीदाराबरोबर सन्मानजनक संवाद करणे आवश्यक आहे.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)

Story img Loader