Laxmi Narayan Yog 2025: नवग्रहामध्ये बुध आणि शुक्राची युती अत्यंत खास मानली जाते. ज्योतिषशास्त्रामध्ये बुधला व्यवसाय, बुद्धी आणि एकाग्रता तसेच बौद्धिक क्षमतेचा कारक मानले जाते. तसेच शुक्राला धन वैभव, सुख समृद्धी, प्रेम, आकर्षण, मान सन्मान, इत्यादीचा कारक मानला जातो. अशात बुध आणि शुक्राची युती असेल तर लक्ष्मी नारायण राजयोग निर्माण होतो ज्याचा फायदा राशी चक्रातील १२ राशींवर दिसून येतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बुध आणि शुक्र ग्रह प्रत्येक महिन्याला राशी परिवर्तन करतात ज्याचा थेट परिणाम राशीच्या लोकांवर दिसून येतो. नवीन वर्षात २०२५ मध्ये दोन्ही ग्रह राशी परिवर्तन करतात आणि मीन राशीमध्ये दोन्ही ग्रहांची युती दिसून येईल. अशात जवळपास एक वर्षानंतर लक्ष्मी नारायण योग निर्माण होतात. अशात काही राशीच्या लोकांना भरपूर लाभ मिळू शकतो. जाणून घेऊ या कोणत्या राशी चमकू शकतात?

पंचागनुसार, दैत्यांचे गुरू शुक्र २८ जानेवारीला मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहे आणि या राशीमध्ये ३१ मे पर्यंत राहणार आहे तसेच ग्रहांचे राजा राजकुमार बुध २७ फेब्रुवारीला रात्री ११ वाजून ४६ मिनिटांपर्यंत या राशीमध्ये प्रवेश करणार आहे. अशात बुध आणि शुक्राची युतीमुळे लक्ष्मी नारायण योग निर्माण होणार आहे. बुध ग्रहाने मेष राशीमध्ये ७ मे रोजी प्रवेश केल्यानंतर हा राजयोग समाप्त होईल.

हेही वाचा : ३६५ दिवसांनंतर सूर्याचा जबरदस्त प्रभाव; धनु राशीतील प्रवेशाने ‘या’ तीन राशींच्या आयुष्यात येणार सुखाचे दिवस

मेष राशी (Mesh Zodiac)

या राशीमध्ये लक्ष्मी नारायण राजयोग बाराव्या स्थानी निर्माण होत आहे. अशात या राशीच्या लोकांवर शुक्र आणि बुध ग्रहाची विशेष कृपा दिसून येईल. लक्ष्मी नारायण योग निर्माण झाल्यानंतर या राशीच्या लोकांना सुख सुविधामध्ये वृद्धी दिसून येईल.
पैसा कमावण्याचे नवीन स्त्रोत निर्माण होऊ शकतात. तसेच पितृ संपत्तीद्वारा मोठा धनलाभ मिळू शकतो. मान सन्मानात वृद्धी दिसून येईल. तसेच गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर या दरम्यान भरपूर लाभ मिळू शकतो. करिअरच्या क्षेत्रात या लोकांना भरपूर लाभ मिळेन. व्यवसायात सुद्धा तुम्ही तुमच्या प्लॅनिंगनुसार भरपूर नफा कमावू शकता. अध्यात्माकडे हे लोक वळू शकतात. अशात हे लोक धार्मिक यात्रांमध्ये सहभागी होतील. अविवाहित लोकांना लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो. तसेच जीवनात आनंदाचे क्षण येतील.

मिथुन राशी (Mithun Zodiac)

या राशीमध्ये बुध आणि शु्क्राची युती दहाव्या स्थानात दिसून येईल. या राशीच्या लोकांना भौतिक सुखाची प्राप्ती होईल. हे लोक कामाच्या बाबतीत प्रवास करू शकतात त्यामुळे या लोकांना भरपूर लाभ मिळू शकतो.
वरिष्ठ अधिकाऱ्यांना सहकार्य प्राप्त होईल. तसेच मेहनतीने हे लोक विदेशात नोकरी मिळवू शकता.
व्यवसायात भरपूर लाभ मिळवू शकता. तसेच व्यवसायात नवीन लोकांच्या संपर्कात येतील ज्यामुळे त्यांना फायदा होऊ शकतो. या राशीचे लोक भरपूर धन कमावू शकतात. या लोकांना नशीबाची साथ मिळेन तेच पैसे वाचवण्यात हे लोक यशस्वी होतील.

हेही वाचा : १२ वर्षांनंतर मिथुन राशीमध्ये निर्माण होईल गजलक्ष्मी राजयोग! २०२५मध्ये ‘या’ राशीच्या लोकांवर होईल माता लक्ष्मीची कृपा, कमावतील पैसाच पैसा

मीन राशी (Meen Zodiac)

या राशीमध्ये लग्न भावात बुध आणि शुक्राची युती दिसून येईल ज्यामुळे लक्ष्मी नारायण योग या राशीच्या लोकांना अत्यंत लाभदायक ठरू शकतो. हे लोक जोडीदाराबरोबर चांगला वेळ घालवू शकतील. तसेच संपत्ती, घरामध्ये गुंतवणूक करण्यात लाभ मिळू शकतात. तसेच व्यवसायात या लोकांना भरपूर लाभ मिळू शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांना सुद्धा अनेक संधी मिळू शकतात. त्यामुळे पगारात वृद्धी होईल आणि तुम्ही भरपूर लाभ मिळवू शकता. नशीबाची चांगली साथ मिळेन. बिझिनेस पार्टनरचे सहकार्य लाभेल. मान सन्मानात वृद्धी होऊ शकते.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)