Laxmi Narayan Yog : ग्रहाचे राजकुमार बुध एका ठराविक काळानंतर राशी परिवर्तन करतात. बुधला व्यवसाय, बुद्धी, एकाग्रता आणि बौद्धिक क्षमता इत्यादींचा कारक मानले जाते. अशात जर बुध ग्रह राशी परिवर्तन करत असेल त्याचा परिणाम राशिचक्रातील इतर राशींवर दिसून येतो. आज बुध ग्रहाने शुक्राची राशी तुळ मध्ये प्रवेश केला आहे तुळ मध्ये आधीच शुक्र ग्रह विराजमान आहे. त्यामुळे तुळ राशीत लक्ष्मी नारायण योग निर्माण होत आहे. कारण शुक्र हा त्याच्या त्रिकोण राशीमध्ये असल्यामुळे इतर राशींना अधिक लाभ मिळू शकतो. जाणून घेऊ या लक्ष्मी नारायण योग निर्माण झाल्यामुळे कोणत्या राशींचे नशीब चमकणार आहे?
पंचागनुसार, १० ऑक्टोबर ला सकाळी ११ वाजून २५ मिनिटांवर बुध ग्रहाने तुळ राशीत प्रवेश केला आहे. १३ ऑक्टोबरपर्यंत याच राशी राहणार आहे. बुध आणि शुक्राच्या या युतीमुळे लक्ष्मी नारायण योग निर्माण होत आहे. या योगामुळे काही राशींना लाभ मिळू शकतो.
तुळ राशी (Tula Zodiac)
या राशीच्या लोकांसाठी लक्ष्मी नारायण योग अत्यंत लाभदायक ठरू शकतो. अडकलेले काम पूर्ण होऊ शकतात. या राशीच्या लग्न भावमध्ये लक्ष्मी नारायण योग निर्माण होत असल्यामुळे या लोकांना चांगला फायदा दिसून येईल. सरकारी कामात यश मिळू शकते. विदेशात काम करण्याची संधी मिळू शकते तसेच व्यवसायात सुद्धा भरपूर लाभ मिळू शकतो. व्यवसायात मोठा प्रोजेक्ट, ऑर्डर मिळू शकते. तसेच चांगला नफा मिळण्याचे योग निर्माण होत आहे. हे लोक कुटुंबाबरोबर चांगला वेळ घालवू शकणार. आयुष्यात भरपूर आनंद येईल.
सिंह राशी (Leo Zodiac)
सिंह राशीच्या लोकांसाठी हा लक्ष्मी नारायण योग अत्यंत लाभदायक ठरू शकतो. या राशीच्या सातव्या भावात बुध आणि शुक्राची युती निर्माण होत आहे. अशात आपल्याला प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त होऊ शकते. विदेशात भरपूर लाभ मिळू शकतो. आकस्मिक धनलाभ मिळू शकतो. विदेशात जाण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. जीवनात अनेक प्रकारचा आनंद मिळू शकतो. अडकलेला पैसा परत मिळेल. नशीबाची साथ मिळेन. व्यवसायात भरपूर नफा मिळेन. आरोग्य उत्तम राहीन पण आरोग्याची नीट काळजी घेणे आवश्यक आहे.
मिथुन राशी (Mithun Zodiac)
या राशीच्या लोकांना लक्ष्मी नारायणाचा योग अत्यंत लाभदायक ठरू शकतो. बुध आणि शुक्र या लोकांच्या जीवनात आनंद देऊ शकतात. या राशीच्या लोकांवर माता लक्ष्मीची कृपा दिसून येईल. त्यामुळे यांना आकस्मिक धनलाभ मिळू शकतो. या लोकांचे आरोग्य उत्तम राहीन या लोकांना बँकेमधून लोन मिळू शकते. या लोकांनी त्यांचे विचार सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न करावा. या लोकांना भरपूर लाभ मिळू शकतो. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत लाभदायक ठरू शकतो.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)