हिंदू धर्मातील सर्वाधिक पूज्य देवतांपैकी एक असलेल्या गणेशाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. अनेक भक्त बाप्पाला मनापासून मानतात. त्याची मनोभावे पूजा करतात.
पुराणांमध्ये सांगितल्याप्रमाणे, गणपतीबाप्पाच्या व्यक्तिमत्त्वातून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत.
असे म्हणतात की, गणपतीबाप्पाचे असे काही गुण आहेत की, जे सुखी आयुष्याचे कानमंत्र सांगतात. त्यांच्यापासून आपण कोणत्या गोष्टी आत्मसात कराव्यात, हे आज आपण जाणून घेणार आहोत.
हेही वाचा :Baby Names : पावसाळ्यात जन्मलेल्या बाळांचे नाव काय ठेवायचे? पाहा येथे एकापेक्षा हटके आयडिया!
- गणपती नेहमी आपल्या कर्तव्याला प्रथम प्राधान्य देतो. कर्तव्य पूर्ण करण्यासाठी त्याने शंकराबरोबरही युद्ध केले होते. कर्तव्याला नेहमी सर्वोच्च स्थानावर ठेवावे. गणपतीचा हा गुण सांगतो की, माणसाने आपल्या ध्येयापासून भटकू नये. त्यामुळे सुख नेहमी आपल्या पदरी येते.
- गणेशाने त्याच्या आई-वडिलांभोवती प्रदक्षिणा घातली होती. बाप्पाचा हा गुण सांगतो की, आई-वडिलांशिवाय जगात कोणीच मोठे नाही. त्यांच्या आनंदातच आपला आनंद आहे.
हेही वाचा : Shukra Vakri 2023 : शुक्र वक्रीमुळे ‘या’ तीन राशी ठरणार भाग्यवान; मिळू शकतो अपार पैसा
- महाकाव्य अर्धवट राहू नये यासाठी गणेशाने आपला दात तोडून पूर्ण महाभारत लिहिले होते. बाप्पाचा हा गुण शिकवतो की, त्याग आणि कोणतेही काम जिद्दीने पूर्ण करा; तुम्हाला आयुष्यभर सुख मिळेल.
- यश मिळवायचे असेल, तर ज्ञान व बुद्धीचा कसा वापर करावा, याचे गणपती हे उत्तम उदाहरण आहे.
- पुराणात सांगितल्याप्रमाणे गणपतीला खूप चंचल स्वभावाचे मानले जाते. गणपती खेळण्याबरोबरच आपल्या कामाप्रति कधीच निष्काळजीपणा करायचा नाही. यातून आनंदी जीवनासाठी माणसाने जीवनात संतुलन ठेवणे खूप गरजेचे आहे ही शिकवण आपल्याला मिळते.
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)