– सोनल चितळे

Leo Yearly Horoscope 2023 Predictions in Marathi: सिंह राशीचा स्वामी रवी आहे. रवी भरपूर ऊर्जा देतो, उत्साह देतो , प्रकाश देतो त्याप्रमाणे सिंह राशीच्या व्यक्तींकडे देखील स्फूर्ती असते, आशा असते, भविष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन असतो. त्यांचे व्यक्तिमत्व प्रभावी असते. वागणे, बोलणे राजासारखे दिमाखदार आणि डौलदार असते. अधिकार गाजवायला त्यांना आवडते. काही वेळा इतरांना आपला बढेजाव दाखवण्याची त्यांची धडपड सुरू असते. ‘खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी’ या तत्वानुसार वागणाऱ्या सिंह राशीच्या मंडळींना २०२३ हे वर्ष कसे असेल ते पाहू.

१७ जानेवारीला* शनी आपल्या षष्ठ स्थानातून सप्तम स्थानातील कुंभ राशीत प्रवेश करणार* आहे. व्यवसायात भरभराट होईल. सत्य परिस्थितीचा स्वीकार कराल. २१ एप्रिलपर्यंत गुरू अष्टम स्थानातील मीन राशीत स्थित आहे. तोपर्यंत गुरुबल कमजोर असेल. २१ एप्रिलला गुरू भाग्यातील मेष राशीत प्रवेश करेल. तेव्हापासून उत्तम गुरुबल प्राप्त होईल. अडचणीतून बाहेर पडाल. नव्या संधी उपलब्ध होतील. वर्षाच्या शेवटच्या महिन्यापर्यंत राहू भाग्य स्थानात स्थित असेल. २८ नोव्हेंबरला तो अष्टमातील मीन राशीत प्रवेश करेल. वर्षभरातील राहूचे हे भ्रमण हिताचे ठरेल. राहू हिंमत, धैर्य देईल. तसेच संपूर्ण वर्ष हर्षल भाग्य स्थानातील मेष राशीतच असेल. अद्ययावत तंत्रज्ञानाचा उपयोग तसेच उच्च शिक्षण घेण्यासाठी याचा लाभ होईल. अशा या महत्त्वाच्या ग्रहबदलांसह इतर सर्व ग्रहांच्या भ्रमणांचा विचार करता एकंदरीत सिंह राशीचे प्रत्येक महिन्याचे ग्रहफल असे आहे…

Vivah muhurat 2025 Marriage Dates in 2025 Hindu Panchang
Vivah Muhurat 2025 : नवीन वर्ष २०२५ मध्ये विवाहासाठी किती शुभ मुहूर्त, पाहा जानेवारी ते डिसेंबरपर्यंतच्या तारखांची यादी
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Shani gochar in kumbh shash rajyog 2024
२०२५ पर्यंत ‘या’ राशींचे लोक होतील मालामाल; शनीच्या शश राजयोगामुळे कमावतील चिक्कार पैसा अन् जगतील राजासारखे जीवन
Sun Rashi Parivartan 2024
सूर्य करणार मालामाल; वृश्चिक राशीतील राशी परिवर्तनाने ‘या’ तीन राशी कमावणार पैसा, प्रेम आणि प्रतिष्ठा
shukra gochar 2024
डिसेंबर महिन्यात शुक्र दोनदा करणार गोचर, ‘या’ तीन राशींचे पालटणार नशीब, मिळणार अपार पैसा अन् धन
After 30 years Saturn-Venus alliance will happen
३० वर्षांनतर शनी-शुक्राची होणार युती! २०२५ मध्ये ‘या’ राशींची होणार चांदी, मिळणार अपार पैसा
Tulsi Vivah 204 Date Time Puja Vidhi Shubh Muhurat in Marathi
Tulsi Vivah 2024 Date Time: १२ की १३, तुळशी विवाह नक्की कधी? जाणून घ्या योग्य तारीख, तिथी आणि शुभ मुहूर्त
Aries To Pisces 8th November Horoscope
८ नोव्हेंबर पंचांग : उत्तराषाढा नक्षत्रात रवि योगाचा शुभ संयोग! मेष, वृषभसह ‘या’ ५ राशींना मिळेल प्रत्येक कार्यात भरघोस यश; वाचा तुमचे राशिभविष्य

जानेवारी :

१७ जानेवरीचा शनीचा राशीबदल हा आपल्यात बरीच परीवर्तने घडवून आणेल. खोटा अहंकार दूर होईल. इतरांच्या गुणांची कदर कराल. दशम स्थानातील मंगळ कामकाजात यश देईल पण गुरुबल कमजोर असल्याने अधिक कष्ट घेऊनच हे शक्य होईल. विद्यार्थी वर्गाने वेळेचे नियोजन करताना गुरुजनांचा, वडीलधाऱ्यांचा सल्ला घ्यावा. महत्वाचे मुद्दे दुर्लक्षित होऊ देऊ नका. जोडीदारासह वाद न घालता संवाद साधण्याचा प्रयत्न करावा. स्थावर मालमत्तेसंबंधीत कामे हळूहळू मार्गी लागतील. डोकेदुखी वाढेल.

फेब्रुवारी :

सप्तमातील शनीसह रवी आणि शुक्र देखील भ्रमण करत आहेत. जोडीदारासह कुरबूर चालू राहील. व्यवसायात नवे करार करताना छुप्या अटींकडे दुर्लक्ष करू नका. धनसंपत्तीचा लाभ होईल. कुटुंबातील ज्येष्ठांना वेळ द्यावा लागेल. विरोधक कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतील. पाठ, मणका यांचे आरोग्य सांभाळावे. विद्यार्थी वर्गाला बुधाच्या बुद्धिमत्तेची साथ मिळेल. विवाहोत्सुक मंडळींनी थोडे सबुरीने घ्यावे. परदेश गमनासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची जमवाजमव सुरू कराल.

मार्च :

अष्टम स्थानातील रवी, गुरू, शुक्र मेहनतीचा योग्य मोबदला देण्यास असमर्थ ठरतील. त्यामुळे अधिकाधिक मेहनत आणि सातत्य फार गरजेचे ठरेल. रात्र आहे वैऱ्याची, जागा रहा. सप्तमातील शनी, बुध आणि तृतीयेतील मंगळ या परिस्थितीवर मात करू शकतील. आधीपासूनच कामाचे वा अभ्यासाचे नियोजन केलेत तरच अडचणींतून सहीसलामत बाहेर पडाल. ऐन वेळची धावपळ कामी येणार नाही. जोडीदारासह मिळते जुळते घ्याल. झटपट श्रीमंतीचा मोह टाळा.

एप्रिल :

एप्रिल मध्यातील रवीचे भाग्य स्थानातील भ्रमण हितकारक असेल. २१ एप्रिलला गुरुचा मेष राशीतील प्रवेश आपल्याला नवी ऊर्जा, नवे चैतन्य देईल. रेंगाळलेली कामे पूर्ण करण्याचा सपाटा सुरू कराल. यश, कीर्ती, मान, पैसा मिळवाल. कष्टाचे चीज होईल. विद्यार्थी वर्गाला परीक्षेत अपेक्षित यश मिळेल. परदेशाशी संबंधित कामे झपाट्याने मार्गी लागतील. प्रयत्नाशिवाय कोणतीही हालचाल होणार नाही. मेहनतीला चांगले फळ मिळणार आहे हे लक्षात असुद्या. पडझड होणे, मार लागणे यापासून सावधगिरी बाळगावी.

मे :

लाभ स्थानातील शुक्र आणि व्यय स्थानातील मंगळ यांमुळे अतिरिक्त खर्च कराल. प्रवास, यात्रा ,स्नेहसंमेलने यात सहभागी व्हाल. जोडीदाराची साथ मिळेल. कौटुंबिक प्रश्न हळुवार सोडवावे लागतील. मुलांना धीर द्याल. त्यांचा आत्मविश्वास वाढवाल. नोकरी व्यवसायात रवी साहाय्यकारी ठरेल. संतती प्राप्तीसाठी वैद्यकीय सल्ला घ्यावा. गुरुबल चांगले आहे. प्रयत्न यशस्वी होतील. आर्थिक नियोजन उपयोगी पडेल. ओळखीमुळे स्थावर मालमत्तेची कामे पुढे सरकतील.

जून :

भाग्य स्थानातील गुरू, राहू, हर्षल परदेशासंबंधित कामांसाठी पूरक ठरतील. उच्च शिक्षण घेण्यास परदेशी जायचे असल्यास त्यासंबंधीची कामे मार्गी लागतील. नोकरीत आपल्या मताला मान मिळेल. वरिष्ठांचा पाठिंबा महत्वाचा ठरेल. बढतीचे योग येतील. व्यावसायिकांनी नव्या संकल्पना अमलात आणाव्यात. फायद्याचे ठरेल. प्रगतीचा आलेख उंचावेल. प्रिय व्यक्तींच्या भेटीगाठी उत्साहवर्धक असतील. जोडीदाराची धोरणी वृत्ती आणि योग्य निर्णय यांमुळे कुटुंबाचे भले होईल. संसर्गजन्य आजारांपासून सावधान !

जुलै :

रवी, मंगळ आणि शुक्र यांच्या शुभ योगामुळे मनातल्या कल्पना प्रत्यक्षात उतरवाल. नवनिर्मितीचा आनंद मिळेल. मात्र अनाठाई खर्चावर कटाक्षाने नियंत्रण ठेवावे. विद्यार्थी वर्गाला नवे शैक्षणिक वर्ष प्रगतिकारक ठरेल. मनाजोगते शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होईल. नोकरी व्यवसायात हितकारक घटना घडतील. आपली कामगिरी चोख पार पाडाल. टीकाकार मंडळी आपल्या चुकांवर बोट ठेवायला टपून बसली आहेत हे ध्यानात असू द्यावे. जोडीदाराच्या साथीमुळे कौटुंबिक जबाबदाऱ्या पेलता येतील.

ऑगस्ट :

रवी, गुरुची भक्कम पाठबळ मिळाल्याने अडचणींवर आत्मविश्वासाने मात कराल. धनलाभ आणि मानसन्मान मिळवाल. आपल्या स्पष्ट वक्तव्याने गैरसमज दूर कराल. नुकसान टळेल. नोकरी व्यवसायात सुवर्णसंधी मिळेल. मेहनतीला पर्याय नाही. आडमार्गाचा अवलंब नको. राजासाठी राजमार्गच योग्य आहे. संतती प्राप्तीसाठी केलेले प्रयत्न फळास येतील. जोडीदाराला अतिरिक्त कामाचा बोजा उचलावा लागेल. मुलांची उन्नती मनाला सुखावेल. मान, मणका आणि बरगड्या यांचे आरोग्य सांभाळावे.

सप्टेंबर :

ग्रहबल चांगले असल्याने आर्थिक उत्कर्ष होईल. धनलाभाचे योग चांगले आहेत. कौटुंबिक समस्यांवर उपाय सापडतील. स्थावर मालमत्तेचे काम पुढे सरकेल. सातत्याने केलेले प्रयत्न फळास येतील. नातेवाईकांच्या भेटी लाभदायक ठरतील. नवे संबंध जुळतील. विवाहोत्सुक मंडळींना ग्रहमान साथ देईल. विद्यार्थी वर्गाने अभ्यासात हलगर्जीपणा न करता मन लावून अभ्यास करणे इष्ट आहे. अन्यथा प्रगतीचा आलेख खालावेल. चाकोरीबाह्य कल्पना सध्या दूर ठेवा.

Aries Yearly Horoscope 2023: मेष राशीला धनलाभ कधी होणार? सोनल चितळेंकडून जाणून घ्या १२ महिन्यांचे राशीभविष्य

ऑक्टोबर :

धन स्थान आणि पराक्रम स्थान यातून होणारे रवी, बुधाचे भ्रमण धन संपत्तीच्या दृष्टीने लाभकारी असेल. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार केलेली गुंतवणूक चांगला धनलाभ मिळवून देईल. नोकरी व्यवसायात बुद्धिमत्ता आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर मोठे प्रकल्प हाताळाल. गुरुबल चांगले असल्याने प्रयत्नांना यश नक्कीच मिळेल. विद्यार्थी वर्गाला आपल्यातील बऱ्या वाईट गोष्टी, बलवत्ता, कमजोरी यांची जाणीव होईल. विवाहीत दाम्पत्यांना एकमेकांसाठी पुरेसा वेळ राखून ठेवावा लागेल.

Taurus Yearly Horoscope 2023: वृषभ राशीसाठी यंदा श्रीमंतीचा योग कधी? सोनल चितळेंकडून जाणून घ्या १२ महिन्यांचे राशीभविष्य

नोव्हेंबर :

तृतीय आणि चतुर्थ स्थानातील रवी, मंगळाचे भ्रमण हे आपल्यातील उत्साह वाढवणारे ठरेल. नव्या संकल्पना , नवा दृष्टिकोन इतरांपुढे मांडाल. गुरूच्या साथीने त्याच्या अवलंब करणे शक्य होईल. विद्यार्थी वर्गाला गुरुजनांचे योग्य मार्गदर्शन लाभल्याने शंका दूर होतील. डोक्यातील गोंधळ कमी होईल. जोडीदाराच्या दूरदर्शीपणाचे कौतुक करावे. परदेशासंबंधित कामे वेग घेतील. आर्थिक गणिते नव्याने मांडाल. अधिक धनलाभ होण्यासाठी गुंतवणूकदारांनी विशेष अभ्यासपूर्वक पाऊल उचलावे.

Gemini Yearly Horoscope 2023: १७ जानेवारी पासून मिथुन राशीचे अच्छे दिन! वर्षभरात यंदा ‘हे’ महिने देतील धनलाभाची संधी

डिसेंबर :

२८ नोव्हेंबरला* भाग्य स्थानातील राहू आता अष्टमातील मीन राशीत प्रवेश करणार आहे*. कामात अडचणी , अडथळे आले तरी गुरू, मंगळ आणि शुक्र यांची भ्रमणे साहाय्यकारी असतील. त्यामुळे प्रश्न सुटतील. मार्ग मोकळा होईल. डोक्याला ताप करून घेऊ नका. समस्येतून संधी शोधा. प्रवासयोग चांगला आहे. लाभकारक घटना घडतील. विद्यार्थी वर्गाने अभ्यासावरून लक्ष विचलित होऊ देऊ नका. नोकरीत बढती , बदलीसाठी प्रयत्न सुरू करावेत. व्यावसायिकांची व्यवसाय वाढवण्याची स्वप्ने पूर्ण होतील.

२०२३ मध्ये कर्क राशीला धनलाभ कधी? प्रेम व आरोग्य कसे असणार? सोनल चितळेंकडून जाणून घ्या १२ महिन्यांचे राशीभविष्य

२०२३ हे वर्ष एकंदरीत लाभकारक असेल. जून ते ऑक्टोबर या कालावधीत लक्षणीय आर्थिक लाभ होईल. या काळात लाभाचा आलेख उंचावेल. त्यादृष्टीने केलेले प्रयत्न यशस्वी होतील. आपल्या स्वभावाप्रमाणे दिलदार वृत्तीने गरजवंतांना मदत कराल. नाव लौकीक वाढेल. मित्र परिवार, नातेवाईक यांच्यासाठी वेळ राखून ठेवाल. एप्रिलनंतर परदेशी प्रवास वा परदेशासंबंधित कामे यासाठी योग चांगले आहेत. विवाहोत्सुक मंडळींना आपला सुयोग्य जोडीदार निवडण्याचे योग देखील २१ एप्रिलनंतर सुरू होत आहेत. जानेवारी ते एप्रिलपर्यंतच्या शैक्षणिक वर्षात मेहनतीचा कस लागेल. प्रयत्नात हयगय करू नका. जूनपासून सुरू होणारे नवे शैक्षणिक वर्ष विद्यार्थी वर्गाला यशकारक असेल. डोकं जड होणे, डोकेदुखी, भोवळ, चक्कर वा गाठ, गुठळीकडे दुर्लक्ष करू नका. नियमित व्यायाम, प्राणायाम आणि सकस आहार घेतलात तर २०२३ हे वर्ष आरोग्यदायी जाईल.