सोनल चितळे
Leo Yearly Horoscope 2024 Predictions in Marathi: सिंह राशीचा स्वामी रवी आहे. आपल्या जीवनाचा मूळ ऊर्जास्रोत रवी असल्याने रवीच्या सिंह राशीतही भरपूर ऊर्जा सामावलेली असते. सिंह राशीच्या व्यक्ती प्रचंड उत्साही असतात. जीवनाकडे त्या सकारात्मक दृष्टीने पाहतात. आपल्या संपर्कात येणाऱ्या इतरांना देखील त्या उमेद आणि आशेचे किरण दाखवतात. त्यांचे प्रभावी व्यक्तिमत्व चारचौघांत उठून दिसते. राजासारखा दिमाख आणि डौल त्यांना शोभून दिसतो. काही वेळा मात्र ते अतिदिखाऊगिरी करतात. सिंह राशीच्या व्यक्ती आपले म्हणणे खाली पडू देत नाहीत. अशा या सिंह राशीला हे २०२४ वर्ष कसे जाईल, याचा आढावा घेऊया.
एप्रिल २०२४ च्या अखेरपर्यंत आपल्या भाग्य स्थानातून गुरु भ्रमण करेल. उत्तम गुरुबल असलेल्या या कालावधीत अनेक महत्त्वाची कामे पूर्ण होतील. १ मेला गुरू दशम स्थानातील वृषभ राशीत प्रवेश करेल. या गुरुचे बळ देखील आपल्या कामासाठी पूरक असणार आहे. पूर्ण वर्षभर शनी आपल्या सप्तम स्थानातील कुंभ राशीतून भ्रमण करेल. जोडीदाराचे चांगले सहकार्य मिळेल. तसेच नवे करार यशस्वी ठरतील. नेपच्यून आणि राहू अष्टमातील मीन
राशीतून भ्रमण करतील आणि केतू द्वितीय स्थानातील कन्या राशीतून भ्रमण करेल. या ग्रहांमुळे सुरळीत चालू असलेल्या कामांमध्ये अडीअडचणी निर्माण होतील. कामे विलंबाने पूर्ण होतील. षष्ठ स्थानातील मकर राशीत प्लूटो पूर्ण वर्षभर असणार आहे. लोकांचा समूह एकत्र करून भरीव कार्य कराल. मे अखेरीपर्यंत हर्षल भाग्य स्थानातील मेष राशीत असेल तर १ जूनला हर्षलचा दशमातील वृषभ राशीत प्रवेश होईल. या भ्रमणामुळे महत्वाचे निर्णय घेताना अनिश्चितता जाणवेल. अशा या महत्वाच्या ग्रहबदलांसह इतर ग्रहांच्या भ्रमणांचा
विचार आणि अभ्यास करता सिंह राशीला २०२४ हे वर्ष काय राशीफल देईल ते पाहूया.
सिंह वार्षिक राशिभविष्य (Taurus Yearly Horoscope 2024)
जानेवारी (January Horoscope)
आपल्या प्रभावी बोलण्याने इतरांवर छाप पाडाल. कामातील नेमकेपणा, मुद्देसूद भाषण यामुळे प्रगतिकारक घटना घडतील. विद्यार्थी वर्गाला आपल्या मेहनतीचे योग्य फळ मिळेल. मात्र अतिरिक्त आत्मविश्वास बाळगू नका. नोकरी व्यवसायात अधिकारपद भूषवाल. सहकारी वर्गाला आपल्या अनुभवाच्या शिदोरीतून उत्तम मार्गदर्शन कराल. विवाहोत्सुक मंडळींना वधुवर संशोधनात यश मिळेल. विवाहित दाम्पत्यांना वैवाहीक सुख चांगले
मिळेल. गुंतवणूकदारांना अतिशय सावधगिरी बाळगावी लागेल. घर, प्रॉपर्टी, जमीनजुमला याबाबतचे कामकाज कायदेशीर मार्गाने पुढच्या टप्प्यावर जाईल. हाडे, मणका, हृदय यांचे आरोग्य विशेष जपणे आवश्यक आहे.
फेब्रुवारी (February Horoscope)
अधिकार गाजवताना त्यासोबतच्या जबाबदाऱ्या देखील डोक्यावर असतात याचे भान ठेवावे. आपल्या खुशीसाठी इतरांच्या हक्कावर गदा आणू नये. विद्यार्थी वर्गाला आपल्या ध्येयापासून दूर नेणारी अनेक प्रलोभने वाटेत येतील. अतिशय जिद्दीने त्यावर मात करावी. यासाठी वेळप्रसंगी तज्ज्ञांची वा ज्येष्ठ मंडळींची मदत घ्यावी लागेल. नोकरी व्यवसायात हितशत्रूंच्या डावपेचांना हिमतीने सामोरे जाल. त्यांचे डाव उघडकीस आणाल. यासाठी आपल्या कामाची पत जराही खाली येऊ देऊ नका. विवाहोत्सुक मंडळींना सुयोग्य जोडीदार मिळेल. तर
विवाहित दाम्पत्य एकमेकांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करतील. समजूतदारपणा दाखवल्याने नाते उमलण्यास मदत होईल. डोळे चुरचूरणे, कोरडेपणा जाणवणे असे त्रास संभवतात.
मार्च (March Horoscope)
मित्र मंडळींना मदतीचा हात पुढे करताना दिलदारपणा दाखवाल. राजा जसा प्रजेची काळजी घेतो तसे आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या उत्तमरीतीने पार पाडाल. विद्यार्थी वर्गाची आता खरी कसोटी जवळ आली आहे. परीक्षा जवळ आल्यावर नेटाने अभ्यास करण्यापेक्षा महिन्याच्या सुरुवातीपासूनच जोर लावणे आवश्यक आहे. नोकरी व्यवसायातील चढउतार , राजकारण यांचा आपल्यावर फारसा परिणाम होणार नाही. नव्या जोमाने नव्या
कार्यक्षेत्रातही आपला ठसा उमटवाल. आधीच्या अनुभवातून खूप काही शिकायला मिळेल. गुंतवणूकदारांच्या लाभावर अंकुश लागेल. त्यामुळे फार अपेक्षा ठेवणे इष्ट नाही. १५ मार्चच्या आत जमीन, प्रॉपर्टी संबंधित कामकाजात यश मिळेल. कोर्टकचेरीची कामे चालू असल्यास आपल्या बाजूने निकाल लागेल. पित्त, पुळ्या, उष्माघात यांचा त्रास वाढेल.
एप्रिल (April Horoscope)
आत्मविश्वास असेल तर मोठ्या संकटांनाही सहज तोंड देऊ शकाल. भाग्य स्थानातील रवी, गुरूच्या साहाय्याने परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळाल. विद्यार्थी वर्गाने पुढच्या आव्हानासाठी सज्ज व्हावे. अभ्यासातील सातत्य ढळू देऊ नका. नोकरी व्यवसायातून अपेक्षित यश, धनसंपत्ती मिळण्यासाठी स्वतःला अद्ययावत ज्ञानाने परिपूर्ण कराल. विवाहोत्सुक मुलामुलींना सुयोग्य जोडीदार मिळणे शक्य आहे. शोधकार्य सुरूच ठेवावे. नवविवाहित दाम्पत्यांना कौटुंबिक जबाबदाऱ्या पेलाव्या लागतील, धीराने घ्यावे. गुंतवणूकदारांना आपल्या गुंतवणूकीचा चांगला परतावा मिळेल. तज्ज्ञांच्या सल्ल्याने पुढे जावे. रोगप्रतिकारशक्ती वाढविल्यास आरोग्याच्या लहानमोठ्या तक्रारी दूर होतील.
मे (May Horoscope)
महिन्याच्या सुरुवातीलाच १ मेला गुरू दशम स्थानातील वृषभेत प्रवेश करेल. भाग्य स्थानातील उच्चीचा रवी आपल्या कामाचा दर्जा उंचावण्यास मदत करेल. मानसन्मान, प्रतिष्ठा मिळाल्याने आत्मविश्वास दुणावेल. विद्यार्थी वर्गाच्या कष्टाला ग्रहांचा पाठिंबा मिळेल. यशाच्या दिशेने वाटचाल कराल. नोकरी व्यवसायातील खाचखळगे ओळखून धोरणी वृत्तीने वागाल. स्वतःबरोबर इतरांचे देखील हित साधाल. आपल्यातील कलागुणांना चांगला वाव मिळेल. घरासंबंधीत प्रश्न रेंगाळतील. निर्णय घेता येणार नाही. गुंतवणुकीच्या परताव्याची शाश्वती नाही. त्यामुळे नियंत्रित जोखीम पत्करलीत तरी सावधगिरीचा इशाराच मिळेल. मूत्रपिंडाच्या विकारांचे लवकर निदान होणार नाही.
जून (June Horoscope)
१ जूनला हर्षल दशमातील वृषभ राशीत प्रवेश करेल आणि मंगळ भाग्य स्थानातील मेष राशीत प्रवेश करेल. तसेच बुध आणि शुक्राच्या साहाय्याने महत्वाचे निर्णय घेताना योग्य पध्दतीने विचार विनिमय कराल. विद्यार्थी वर्गाने नव्या शैक्षणिक वर्षात सुरुवातीपासून अभ्यासात रस घ्यावा. नवे विषय चटकन आत्मसात कराल. तंत्रज्ञानाचा खूप चांगला उपयोग होईल. नोकरी व्यवसायात गुरूच्या साथीने मोठे प्रश्न आणि समस्या सोडवाल.
वरिष्ठांकडून आपल्या कामाची दखल घेतली जाईल. विवाहोत्सुक मंडळींनी प्रयत्न सुरू ठेवावेत. विवाहितांना जोडीदाराच्या समंजसपणाची साक्ष पटेल. गुंतवणूकदारांना भरपूर आर्थिक लाभ होईल. अतिहव्यास टाळावा. नियमित व्यायामाचे तंत्र सांभाळल्यास आरोग्य चांगले राहील.
जुलै (July Horoscope)
‘मागील पानावरून पुढे सुरू’ अशी या महिन्यातील स्थिती असेल. मोठ्या महत्त्वाकांक्षेला फारसा वाव मिळाला नाही तरी कामातील सातत्य सोडू नका. विद्यार्थी वर्गाला शिक्षक आणि मार्गदर्शक यांच्याकडून विशेष सहाय्य मिळेल. आता संधीचे सोने करून दाखवणे आपल्या हातात आहे. नोकरी व्यवसायात परदेशासंबंधित कामांना गती मिळेल. नवे करार करताना सतर्कता बाळगावी. विवाहित मंडळींनी एकमेकांना समजून घेतल्याने प्रेमबंध दृढ होतील. जमीन जुमला, घर, इस्टेट यासंबंधीची कामे मार्गी लागतील. गुंतवणूकदारांना अभ्यासपूर्वक गुंतवणूक लाभदायक ठरेल. डोकेदुखी, पोटदुखी किंवा अपचन यांच्या त्रासाने बेजार व्हाल.
ऑगस्ट (August Horoscope)
१६ ऑगस्टला रवी आपल्या सिंह राशीत प्रवेश करेल. आत्मविश्वास वाढेल. कामातील हुरूप वाढेल. लोककार्यात हिरीरीने पुढाकार घ्याल. विद्यार्थी वर्गाला यश मिळेल. कष्टाचे चीज होईल. विषयाचे आकलन चांगले होईल. नोकरी व्यवसायात मोठ्या आर्थिक उलाढाली यशस्वीरीतीने पार पाडाल. विवाहोत्सुक मंडळींच्या वधूवर संशोधनास यश येईल. विवाहित मंडळींनी जोडीदाराच्या कलाने घ्यावे. कौटुंबिक वातावरण हसते खेळते ठेवाल.घराचे प्रश्न, मालमत्तेच्या समस्यांवर तोड मिळेल. गुंतवणूक करताना दीर्घ मुदतीसाठी करावी. स्नायू, मज्जासंस्था यांच्यावर अतिरिक्त ताण पडेल. व्यायाम आणि विश्रांती गरजेची आहे.
हेही वाचा : ३० वर्षानंतर शनिदेव वक्री होताच ‘या’ तीन राशींना होणार अचानक धनलाभ? जाणून घ्या, त्या तीन राशी कोणत्या?
सप्टेंबर (September Horoscope)
उत्साहवर्धक वातावरणात मन आनंदी राहील. मित्र परिवार, नातेवाईक यांच्या भेटी झाल्याने अनेक आठवणी ताज्या होतील. विद्यार्थी वर्गाला अभ्यासासोबत थोडी करमणूक पुष्टीदायी ठरेल. त्यातही आपल्या सर्जनशीलतेला उत्तम वाव मिळेल. नोकरी व्यवसायातील कामे सुरळीत पार पडतील. हितशत्रूंना जशास तसा शह द्याल. आत्मविश्वास वाढेल. विवाहोत्सुक मंडळींना आपल्या ओळखीतून जोडीदार मिळेल. प्रेमसंबंध दृढ होतील. विवाहितांचे कौटुंबिक जीवन चांगले राहील. गुंतवणूकदारांनी थोडे धीराने घ्यावे. घाईगडबडीत नुकसान होण्याची शक्यता आहे. डोळ्यांचे विकार आपणास त्रासदायक ठरतील.
ऑक्टोबर (October Horoscope)
रवीचे बल कमी असल्याने या महिन्यात निर्णय घेताना मन द्विधा होईल. अशा वेळी ज्येष्ठ, तज्ज्ञ मंडळी, खास मित्र किंवा जोडीदाराचा सल्ला उपयोगी ठरेल. विद्यार्थी वर्गाला शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली वेगाने पुढे जाणे शक्य होईल. अभ्यासातील अडचणी, शंका आत्ताच दूर कराव्यात. परदेशासंबंधीत कामे लांबणीवर पडतील. नोकरी व्यवसायातील महत्वाचे टप्पे पार कराल. निर्धाराने आगेकूच केलीत तरच आत्मविश्वास पुन्हा मिळवाल.
विवाहोत्सुक मंडळींना त्यांच्या शोधकार्याचे चांगले फळ मिळेल. वरकरणी लाभदायक दिसणारी गुंतवणूक भविष्यात लाभदायक नसेल. घराचे कागदपत्र नीट तापसवेत. छुप्या अटी आणि नियम यांची काळजीपूर्वक दखल घ्यावी. प्रदूषणामुळे घसा आणि फुप्फुसाचा त्रास वाढेल.
नोव्हेंबर (November Horoscope)
मनाची चंचलता वाढेल. अनेक विचार डोक्यात घोळत राहतील. आपल्या ध्येयावर प्रयत्नपूर्वक लक्ष केंद्रित करावे लागेल. विद्यार्थी वर्गाला तर अधिक मेहनत घेऊन , त्यात सातत्य राखून पुढे जावे लागेल. लक्ष विचलित करणाऱ्या बऱ्याच गोष्टी आणि घटना आसपास घडत असतील. नोकरी व्यवसायात आपल्या अंतिम निर्णयावर अनेक बाबी अवलंबून असतील. शांत चित्ताने जबाबदारी पार पाडाल. विवाहोत्सुक मुलामुलींचे विवाह जुळतील, संपन्न होतील. विवाहित मंडळींनी शब्द जपून वापरावेत. गैरसमज व्हायला वेळ लागणार नाही. मालमत्तेसंबंधित कोर्टकचेरीची कामे ठप्प होतील. कायदेशीर कार्यवाही मध्ये अडथळे येतील. शाश्वत गुंतवणूक कामी येईल. अतिविचार आणि अधिक श्रमामुळे दमणूक होईल. विश्रांतीची गरज भासेल.
डिसेंबर (December Horoscope)
१३ डिसेंबरला हर्षल वक्र गतीने भाग्य स्थानातील मेष राशीत प्रवेश करेल. तसेच १५ डिसेंबरला रवी पंचमातील धनु राशीत प्रवेश करेल. वर्षाच्या शेवटी पुन्हा एकदा उत्साह वाढेल. पूर्ण करण्याचे काही प्रकल्प, योजना जोमाने हातावेगळ्या कराल. अडचणीतून वाट काढत पुढे जायचे आहे हे ध्यानात असू द्यावे. विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबर बऱ्याच सामाजिक कार्यक्रमात भाग घेण्याची संधी मिळेल. उत्तम नेतृत्व कराल. नोकरी व्यवसायात गुरूच्या
पाठबळामुळे संकटातून सहीसलामत बाहेर पडाल. वरिष्ठांचे मार्गदर्शन कामी येईल. विवाहोत्सुक मंडळींना ओळखीतून स्थळे सांगून येतील. गुंतवणूकदारांची आर्थिक पातळी उंचावेल. चांगला धनलाभ होईल. बदलत्या हवामानाशी जुळवून घ्याल.
एकंदरीत २०२४ हे वर्ष चढ उताराचे असले तरी प्रयत्नातील सातत्यामुळे प्रगतिकारकच असेल. गुरुचे पाठबळ हा खूप मोठा आधार असणार आहे. विवाहोत्सुक मंडळींना सुयोग्य जोडीदार मिळेल. तसेच घरासंबंधित बाबी मेनंतर हळूहळू मार्गी लागतील. आरोग्याची विशेष चिंता नाही. व्यायाम आणि पथ्यपाणी जपल्यास संपूर्ण वर्ष आनंदात जाईल.