Libra Annual Horoscope 2025: तूळ राशीचा स्वामी शुक्र आहे. शुक्र हा आकर्षक, नीटनेटका, कलेचा भोक्ता असल्याने हे सारे गुण तूळ राशीतही दिसून येतात. तूळ राशीच्या व्यक्ती उत्साही आणि हसतमुख असतात. तूळ ही बौद्धिक रास असल्याने आपली बुद्धिमत्ता उच्च प्रतीची असते. आपल्याला प्रियजनांचा सहवास आवडतो. आपली कल्पनाशक्ती प्रबळ असते. समतोल राखणे आणि अस्थिरतेतही स्थिरता शोधणे हा आपला विशेष स्थायी भाव आहे. अशा या तूळ राशीला २०२५ हे वर्ष कसे असेल याचा आढावा घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

तूळ राशीच्या दृष्टीने महत्त्वाच्या ग्रहांचे राशीबदल असे असतील. मार्चमध्ये मेष राशीतील हर्षल अष्टमातील वृषभ राशीत प्रवेश करेल. २९ मार्चला कुंभ राशीतील शनी षष्ठातील मीन राशीत प्रवेश करेल. १४ मे रोजी गुरु अष्टमातील वृषभ राशीतून भाग्य स्थानातील मिथुन राशीत प्रवेश करेल. उत्तम गुरुबल प्राप्त होईल. २९ मे रोजी वक्र गतीने राहू पंचमात कुंभ राशीत व केतू लाभ स्थानात सिंह राशीत प्रवेश करतील.

तूळ राशीसाठी २०२५ वर्ष कसे असणार? जाणून घ्या (Libra Yearly Horoscope 2025)

जानेवारी (January Horoscope 2025) :

नववर्षाची सुरुवात नव्या जोशात कराल. जे झेपतील, पेलवतील आणि ज्यात सातत्य राखता येईल असे व्यावहारिक संकल्प कराल. विद्यार्थी आपल्या अभ्यासातील सरावाबाबत एखादा संकल्प करतील आणि तो तडीस नेतील. नोकरी व्यवसायात नव्या संकल्पना राबवाल. आपला आणि इतरांचाही उत्कर्ष साधेल याचा आपण प्रयत्न कराल. मकर संक्रांतीला बुद्धिवादी आणि व्यावहारिक प्रश्नांची उत्तरे मिळतील. गुरुबल अगदी कमजोर असल्याने विवाहोत्सुकांनी धीर धरावा. विवाहित मंडळींनी एकमेकांना समजून घेणे गरजेचे ठरेल. घर, प्रॉपर्टीच्या कामांना थोडीफार चालना मिळाली तरी अडचणी अधिक येतील. गुंतवणूकदारांनी आपली क्षमता ओळखावी. मोठी जोखीम तोट्यात नेईल.

फेब्रुवारी (February Horoscope 2025) :

नवनवीन आव्हानांचा सामना करत पुढे नेणारा असा हा महिना असेल. कलेला बुद्धिमत्तेची जोड मिळाल्याने कामाची प्रत उत्तम असेल. विद्यार्थी अभ्यासासह इतर विषयांमध्येदेखील रस दाखवतील. नोकरी व्यवसायात हितशत्रूंचा त्रास वाढेल, पण आपण त्यांना पुरून उराल. वरिष्ठ आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील. विवाहितांचे रेशीम बंध हळुवार हाताळावेत. गैरसमजाची छाया पडू देऊ नका. गप्प राहण्यापेक्षा मनमोकळेपणाने बोला. घर, जमीन, वाहन यांच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारात खूप सावधगिरी बाळगावी लागेल. महाशिवरात्रीच्या दरम्यान गुंतवणूकदारांना ग्रहबल कमी असल्याने मनाप्रमाणे लाभ पदरी पडणार नाही. तोटा झाला नाही म्हणजे पुरे! शारीरिक व्याधींपेक्षा मानसिक उद्वेग अधिक त्रासदायक ठरेल.

मार्च (March Horoscope 2025):

सामाजिक बंधने आणि नियम पाळायला लावणारा, शिस्त शिकवणारा असा हा महिना असेल. कोणत्याही बाबतीतले नियम मोडू नका. शिस्त पाळलीत तर मोठे नुकसान टळेल. विद्यार्थी आपल्या सभोवतालच्या वातावरणातून खूप काही शिकतील. होळीच्या रंगात रंगून जाल. १८ मार्चला हर्षल अष्टमातील वृषभ राशीत प्रवेश करेल. अंगी बिनधास्तपणा येईल. नोकरी व्यवसायात आपल्या स्वभावातील चुणूक दाखवण्याची संधी मिळेल. तत्वासाठी लढाल. विवाहितांनी गैरसमजाचे खापर जोडीदाराच्या डोक्यावर फोडू नये. ज्येष्ठ मंडळींचा याबाबतीत फायदा होईल. घर खरेदी-विक्रीची कागदपत्रे नीट वाचून घ्यावीत. गुंतवणूकदार आपला पैसा सुरक्षित ठेवतील. २९ मार्चला शनी षष्ठ स्थानातील मीन राशीत प्रवेश करेल. गुढीपाडव्याच्या दरम्यान मांगल्य वाढवणारे क्षण उपभोगाल.

एप्रिल (April Horoscope 2025) :

योजनाबद्ध आणि जाणीवपूर्वक वेळापत्रकाप्रमाणे वागायला लावणारा असा हा महिना असेल. विद्यार्थी वर्गाला याचा विशेष लाभ होईल. सातत्याने प्रयत्न सुरू ठेवावेत. नोकरी व्यवसायात आपल्या कर्तृत्वाचा प्रभाव पडेल. आपला मुद्दा वरिष्ठांना पटवून द्यावा लागेल. विवाहोत्सुकांचे योग अजून सुरू व्हायचे आहेत. विवाहित मंडळींना जोडीदाराच्या कामगिरीबद्दल अभिमान वाटेल. नाती दृढ होतील. स्थावर इस्टेटीची खरेदी वा विक्री करण्यासाठी अनेक दिव्य पार करावी लागतील. गुंतवणूकदारांना मध्यम मानाने लाभ मिळतील अशी चिन्हे दिसतात. अक्षय्य तृतीया आर्थिक गणित सावरायला मदत करेल. प्रत्यक्ष कामाच्या ताणापेक्षाही लोकांच्या बोलण्याचा अधिक त्रास जाणवेल.

मे (May Horoscope 2025) :

आवडते छंद आणि समाजसेवा यांमध्ये आनंद शोधणारा असा हा महिना असेल. विद्यार्थी वर्ग उच्च शिक्षणाची जोरदार तयारी करेल. परदेशातील परीक्षा, स्पर्धात्मक परीक्षा यात बुडून जाल. १४ मे रोजी गुरु भाग्य स्थानातील मिथुन राशीत प्रवेश करेल. उत्तम गुरुबल प्राप्त होईल. नोकरी व्यवसायात कार्यकारिणीमध्ये काही हितकर बदल होतील. बुद्ध पौर्णिमा आपल्याला समाधान आणि नवचैतन्य देईल. विवाहोत्सुकांचे योग सुरू झाले आहेत. जोडीदार संशोधन जोमाने सुरू करा. विवाहितांना एकमेकांची चांगली साथ लाभेल. संतती प्राप्तीसाठीचे प्रयत्न आकार घेतील. कायदेशीर बाबींना वेग येईल. रखडलेल्या गोष्टी मार्गी लागतील. २९ मे रोजी वक्र गतीने राहू षष्ठातील मीनेत, तर केतू लाभतील सिंहेत प्रवेश करेल. धैर्य वाढेल. अपेक्षा कमी होतील.

जून (June Horoscope 2025) :

नव्या जोमाने नवी सुरुवात करणारा, आशेचे किरण घेऊन येणारा असा हा महिना असेल. विद्यार्थी वर्गाच्या मेहनतीला उत्तम यश मिळेल. अपेक्षित क्षेत्रात पुढील शिक्षणाची संधी मिळेल. नोकरी व्यवसायात बऱ्याच गोष्टी स्थिरस्थावर होतील. व्यवस्थापक मंडळ आपल्या कामाची, कामाच्या पद्धतीची कदर करेल. वटपौर्णिमा आर्थिक लाभ देणारी बातमी आणेल. परदेशासंबंधित कामे मार्गी लागतील. विवाहोत्सुकांचे विवाह ठरतील. विवाहित मंडळींना संतान प्राप्तीचे योग आहेत. वैद्यकीय सल्ला घ्यावा. वाहन योग चांगला आहे. प्रवाससुद्धा सुखकर होईल. घराचे व्यवहार लांबणीवर पडतील. गुंतवणूकदारांना लाभकारक ग्रहमान आहे. सर्दी आणि वाताचे विकार यांनी त्रस्त व्हाल. पित्ताचा जोर वाढेल.

जुलै (July Horoscope 2025) :

मेहनतीला शिस्तीची जोड मिळाली तर अधिक चांगले फळ मिळेल, हे शिकवणारा हा महिना असेल. आषाढी एकादशीच्या दिवशी आनंदाची बातमी समजेल. विद्यार्थी वर्ग सुरुवातीपासून नियमितता अंगी बाणवेल. गुरुपौर्णिमा आत्मविश्वास वाढवणारी असेल. गुरुजनांच्या मार्गदर्शनाने यशस्वी व्हाल. नोकरी व्यवसायात बदल आणि बढती यासाठी पूरक ग्रहमान आहे. प्रयत्न सफल होतील. विवाहोत्सुकांना अनुरूप जोडीदार मिळेल. विवाहितांनी कुटुंबासाठी वेळ राखून ठेवावा. सहवासाने प्रेम आणि ओढ वाढेल. प्रॉपर्टीच्या कागदपत्रांची नीट तापसणी करावी. तज्ज्ञ वकिलांची नेमणूक कराल. गुंतवणूकदार उंच भरारी घेतील.

ऑगस्ट (August Horoscope 2025) :

सणवार साजरे करण्यात मन प्रफुल्लित राहील. नातेवाईकांच्या भेटीतून कडूगोड अनुभव येतील. विद्यार्थीवर्ग आपल्यातील गुणांची झलक दाखवेल. अभ्यास सांभाळून आपले छंद जोपसेल. नारळी पौर्णिमा आनंददायी ठरेल. नोकरी व्यवसायात संमिश्र प्रतिसाद मिळेल. जन्माष्टमीच्या सुमारास क्लेशकारक परिस्थितीला सामोरे जाल. घराच्या व्यवहारात घाई नको, पण चालढकलदेखील नको. उपवर मुलामुलींचे विवाह ठरतील. विवाहितांना एकमेकांच्या साथीने प्रगती करण्याची संधी मिळेल. श्री गणेशाचे आगमन चैतन्यमय असेल. संततीसंबंधित गोड बातमी समजेल. गुंतवणूकदारांनी थोडी वाट बघावी. रक्तातील साखर आणि रक्तदाब यांचा तोल सांभाळावा.

सप्टेंबर (September Horoscope 2025) :

सर्जनशीलता आणि कलात्मकता यांना पूरक पोषक असलेला असा हा महिना असेल. बुद्धिमत्तेच्या जोरावर विद्यार्थी वर्ग मोठा पल्ला गाठेल. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि मित्रांची मदत मिळेल. पितृपक्षात पूर्वजांप्रती कृतज्ञता व्यक्त कराल. नोकरी व्यवसायात गरजूंना आपल्या पायावर उभे कराल. विवाहोत्सुकांना गुरुबल उत्तम आहे. प्रयत्नांना यश येईल. नवरात्रात शुभ वार्ता समजेल. परदेशातील कामे मार्गी लागतील. खर्चाचे प्रमाण वाढेल. जोडीदाराच्या कार्यक्षेत्रात त्याची विशेष प्रगती होईल. संतान प्राप्तीसाठी ग्रहमान अनुकूल आहे. वैद्यकीय उपचारांना यश मिळेल. कोर्टात आपल्या बाजूने निकाल लागेल. गुंतवणुकीचा योग्य परतावा मिळाल्याने हुरूप वाढेल. यकृताच्या समस्या, त्वचा विकार यांकडे दुर्लक्ष करू नका.

ऑक्टोबर (October Horoscope 2025) :

नव्या संकल्पना अमलात आणण्यासाठी दसऱ्यासारखा उत्तम मुहूर्त नाही. नवे प्रकल्प आकार घेतील. आपली बुद्धी, मेहनत, जिद्द आणि कलात्मकता फळास येईल. विद्यार्थी वर्ग यशाची शिखरे सर करत आगेकूच करेल. नोकरी व्यवसायात नव्या संधी उपलब्ध होतील. व्यक्तिमत्वाचे नवे आयाम विकसित कराल. १८ ऑक्टोबरला गुरु कर्क राशीत प्रवेश करेल. अनेक लाभकारक गोष्टी घडतील. दिवाळी आनंदीआनंद घेऊन येईल. विवाहोत्सुकांचे विवाह ठरतील. विवाहितांच्या जोडीदाराची आर्थिक प्रगती होईल. घराच्या व्यवहारासाठी तज्ज्ञांचे योग्य मार्गदर्शन मिळाल्याने नफ्याचा सौदा होईल. गुंतवणूक करताना दीर्घ मुदतीचा विचार करावा. मूत्र विकार, ओटीपोटाचे विकार त्रास देतील.

नोव्हेंबर (November Horoscope 2025) :

आत्मपरीक्षण करून स्वतःमध्ये काही बदल घडवून आणणारा, भविष्याकडे दूरदृष्टीने बघणारा असा हा महिना असेल. विद्यार्थी सचोटीने अभ्यासावर लक्ष केंद्रित करतील. संयमाने वागतील. परदेशातील उच्च शिक्षणात यश मिळवतील. ११ नोव्हेंबरपासून गुरू वक्री होईल. देव दिवाळी ते चंपाषष्ठी या कालावधीत आत्मविश्वास बळावेल. अन्यायाविरुद्ध आवाज उठवाल. नोकरी व्यवसायात आपल्या विचारांचा प्रभाव पडेल. विवाहोत्सुकांचे विवाह ठरतील. विवाहित मंडळींना जोडीदाराचा सहवास सुखकर होईल. एकमेकांसाठी आपल्या आवडीनिवडी बाजूला ठेवाल. प्रॉपर्टीचे रेंगाळलेले काम मार्गी लागेल. गुंतवणुकीत जोखीम पत्करणे धोक्याचे ठरेल. छाती आणि घसा यांचे आरोग्य सांभाळा. प्रदूषणाचा त्रास होईल.

हेही वाचा: Virgo 2025 Horoscope : २०२५ मध्ये विद्यार्थी, नोकरदारांचे उजळणार नशीब; कन्या राशीसाठी कोणता महिना आर्थिकदृष्ट्या फायदेशीर? जाणून घ्या १२ महिन्यांचे भविष्य…

डिसेंबर (December Horoscope 2025) :

श्री दत्त जयंतीच्या निमित्ताने उत्सवाचे वातावरण अनुभवाल. सुखशांती मिळेल. ५ डिसेंबरला गुरु वक्र गतीने मिथुन राशीत प्रवेश करेल. विद्यार्थी वर्गाचे शंका, प्रश्न यांचे निरसन होईल. उत्तमोत्तम पुस्तके वाचाल. नोकरी व्यवसायात सहकारी वर्गाच्या प्रगतीसाठी विशेष प्रयत्न कराल. विवाहोत्सुकांचे विवाह होतील. मनपसंत जोडीदारासह जीवनप्रवास सुरू होईल. विवाहित मंडळींचे नातेसंबंध अधिक दृढ होतील. कौटुंबिक जबाबदारी एकत्रितपणे पार पाडाल. बाळाच्या आगमनाची चाहूल लागेल. जमीनजुमला, प्रॉपर्टी यांची कामे तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली मार्गस्थ कराल. गुंतवणूकदारांना अभ्यासपूर्वक केलेल्या गुंतवणुकीचा चांगला परतावा मिळेल. हवामानातील बदलामुळे सर्दी-खोकला आणि डोकं जड होणे असे त्रास संभवतात.

अशा प्रकारे २०२५ या वर्षात गुरुबल १४ मेपर्यंत अनुकूल नसेल, पण त्यानंतर उत्तम गुरुबल प्राप्त होईल. या कालावधीत नोकरी, विवाह, संतती, प्रवास हे योग येतील. बुद्धिमत्ता, प्रयत्न आणि जिद्द यांच्या जोरावर बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टी साध्य कराल. तब्येतीची योग्य काळजी घेतल्यास हे वर्ष आपणास सुखकर आणि उत्कर्षकारक ठरेल.