Astrology Today: आज २७ जानेवारी २०२५ (सोमवार) रोजी पौष महिन्याच्या कृष्ण पक्षाची त्रयोदशी तिथी आहे. त्रयोदशी तिथी सोमवारी रात्री ८ वाजून ३५ मिनिटांपर्यंत असणार आहे. आज सकाळी ९ वाजून २ मिनिटांपर्यंत मूळ नक्षत्र जागृत असेल, त्यानंतर पूर्वाषाढा नक्षत्र सुरू होईल. आजचा राहू काळ सकाळी ७ पासून सकाळी ९ वाजून ३० मिनिटांपर्यंत असेल.

तसेच आज सोमप्रदोष देखील असणार आहे. हिंदू धर्मामध्ये सोमप्रदोषला खूप महत्त्वपूर्ण मानले जाते. या दिवशी व्रत-उपासना केल्याने महादेव सर्व मनोकामना पूर्ण करतात असे म्हटले जाते. दरम्यान, आजच्या या शुभ दिवशी १२ राशींपैकी कोणत्या राशीला अधिक सावधगिरी बाळगावी लागेल हे आपण जाणू घेऊ

27 January 2025 Horoscope In Marathi
२७ जानेवारी पंचांग: मासिक शिवरात्रीने होणार आठड्याची सुरुवात; कोणाला मिळेल मेहनतीचे फळ तर कोणाला नोकरीच्या नवीन संधी?
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Vinayak Chaturthi special 5th November Rashi Bhavishya
५ नोव्हेंबर पंचांग: विनायक चतुर्थीला ‘या’ राशींना होणार फायदा, भाग्याची साथ ते धनलाभाचे योग; वाचा तुमच्या नशिबात कसं येईल सुख?
diwali 2024 1st october 2024 panchang marathi horoscope mesh to meen
Laxmi Pujan Horoscope : लक्ष्मी कृपेने नोव्हेंबरचा पहिला दिवस मेष ते मीन राशीला कसा जाईल; कुणावर होणार धन अन् सुखाचा वर्षाव? वाचा तुमचे राशीभविष्य
Aries To Pisces 7th November Horoscope In Marathi
७ नोव्हेंबर पंचांग : आज स्वामींच्या कृपेने १२ पैकी कोणत्या राशी होतील धनवान; तुमच्या आयुष्यात येतील का सुखाचे क्षण? वाचा गुरुवारचे राशिभविष्य
Daily Horoscope On 30 October
३० ऑक्टोबर पंचांग: दिवाळीआधीच येईल सोनेरी संधी, आर्थिक बळ वाढेल; कसा जाईल १२ राशींचा बुधवार?
Aries To Pisces 6th November Horoscope
६ नोव्हेंबर पंचांग: चारचौघात कौतुक, अचानक धनलाभ, जन्मराशीनुसार कोणाची मनोकामना आज पूर्ण होणार; वाचा तुमचे राशिभविष्य
4th November 2024 Rashi Bhavishya
४ नोव्हेंबर पंचांग : पूर्वाषाढा नक्षत्रात वृषभ,कर्कसह ‘या’ ३ राशींचा आनंदित जाईल दिवस; कामात यश ते गोड बातमी मिळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

तूळ राशीच्या व्यक्तींना कसा जाईल आजचा दिवस (How will today be for Libra people?)

आजच्या दिवशी प्रत्येक गोष्टीत संघर्ष करावा लागेल. त्यामुळे जास्त मेहनत करून यश मिळवाल. कामातील अडथळे दूर होण्यास वेळ लागेल. अनावश्यक खर्च कमी करा. नवीन गोष्टीत सावधगिरीने पाऊल टाका. मित्रांचे सहकार्य लाभू शकेल. नोकरदार वर्गाला दिलासादायक दिवस. अधिकारात वृद्धी होईल. आरोग्याचीही काळजी घ्या आणि रागावर नियंत्रण ठेवा. येणारा काळ तुमच्यासाठी लाभदायी असेल.

तूळ राशीचे आजचे आर्थिक राशिभविष्य (Astrology Predictions: Libra Finance Horoscope Today)

आजच्या दिवशी आर्थिक परिस्थिती सामान्य असेल. मात्र, खर्चावर नियंत्रण ठेवा. नाहीतर अनावश्यक खर्च वाढतील. आज कोणाकडून उधार घेऊ नका आणि कोणाला उधार देऊ नका.

तूळ राशीचे करिअरविषयीचे राशिभविष्य (Astrology Predictions: Libra Career Horoscope Today)

आजच्या दिवशी तूळ राशीच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेत यश मिळेल. कामाच्या ठिकाणी सहकार्यांची मदत मिळेल परंतु कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. स्वतःच्या प्रगतीकडे अधिक लक्ष द्या.

तूळ राशीचे आजचे नातेसंबंधांविषयीचे राशिभविष्य (Astrology Predictions: Libra Love Horoscope Today)

तूळ राशीच्या व्यक्तींना कुटुंबातील व्यक्तींची मदत मिळेल. आई-वडिलांच्या आर्शीवाद तुमच्या पाठिशी असेल. वैवाहिक जीवन सामान्य राहिल. आजच्या दिवशी जोडीदारासह तीर्थक्षेत्री भेट देऊ शकता.

Story img Loader