-सोनल चितळे

Libra Yearly Horoscope 2023 Predictions in Marathi: तुळ राशीचा स्वामी शुक्र आहे. शुक्र हा प्रेमभावानेचा कारक आहे. सौंदर्यदृष्टी असलेला शुक्र मोहक आहे. त्याचा सहवास हवाहवासा असतो. सौख्य, समृद्धी, आनंद देणाऱ्या शुक्राची ही तुळ रास देखील प्रत्येक गोष्टीतून आनंद निर्माण करणारी रास आहे. तुळ राशीच्या व्यक्ती आनंदी, उत्साही असतात. न्यायाने वागणाऱ्या आणि समतोल साधणाऱ्या असतात. त्या समाजप्रिय असतात. हळव्या असल्या तरी कमकुवत नसतात. तत्वासाठी वादविवाद करतील पण त्या भांडखोर नसतात. अशा या सत्यवादी, समतावादी तुळ राशीच्या व्यक्तींना २०२३ हे वर्ष कसे असेल ते पाहू.

यंदा संपूर्ण वर्षभर हर्षल आपल्या सप्तमातील मेष राशीतच आहे. २८ नोव्हेंबरपर्यंत* हर्षलसह राहू देखील असेल. त्यामुळे वैवाहिक नाते अलगद जपावे लागेल. समज गैरसमज यांपासून दूर राहावे. २१ एप्रिलपर्यंत* गुरु आपल्या षष्ठ स्थानातील मीन राशीत स्थित असेल. तो पर्यंत गुरुबल मध्यम आहे. प्रयत्नशील राहूनच कार्य सिद्धीस जातील. २१ एप्रिलला गुरू सप्तमातील मेष राशीत प्रवेश करेल. चांगले गुरुबल प्राप्त होईल. कामांना वेग येईल. अपेक्षित व्यक्तींच्या भेटीगाठी लाभदायक ठरतील. विवाहोत्सुक मंडळींचे विवाह जुळतील. नोकरीत अपेक्षित बदल मिळेल. संततीप्राप्तीचे योग येतील. नुकताच १७ जानेवारीला शनीने पंचमातील कुंभ राशीत प्रवेश केला आहे. शिक्षणाबाबत योग्य निर्णय घ्याल. मेहनतीचे फळ चांगले मिळेल. अशा या महत्वाच्या ग्रह बदलांसह इतर ग्रहांच्या भ्रमणांचा विचार करता एकंदरीत तुळ राशीचे वार्षिक राशी भविष्य असे आहे…

shani gochar 2025 zodiac sign today horoscope in marathi
Shani Gochar 2025 : २०२५ मध्ये शनीचे मीन राशीत गोचर, ‘या’ राशींच्या नशिबाचं टाळं उघडणार; रिकामी तिजोरी धनधान्याने भरण्याचे संकेत
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
surya gochar 2024 astrology horoscope in marathi
Surya Gochar 2025 : १५ डिसेंबरपासून करोडपती होऊ शकतात ‘या’ तीन राशींचे लोक; सूर्यदेवाच्या कृपेने जगू शकतात राजासारखे जीवन?
Guru gochar gajkesari rajyog horoscope 2025 in marathi
२०२५ चा गजकेसरी राजयोग ‘या’ तीन राशींची करु शकतो आर्थिक भरभराट, हत्तीवरुन वाटाल साखर
Shani Budh Yuti 2025 astrology
Shani Budh Yuti 2025 : नवीन वर्षात सोन्याचा हंडा घेऊन लक्ष्मी ठोठावेल ‘या’ राशींच्या मंडळींचे दार? शनी-बुधाच्या संयोगाने होऊ शकाल लखपती
rahu shukra yuti 2025 in marathi astrology
Rahu Shukra Yuti 2025: २०२५ वर्ष ‘या’ तीन राशींसाठी सुखाचं! राहू-शुक्राच्या संयोगाने मिळणार प्रचंड पैसा, आनंद अन् मान सन्मान
kharmas 2024 horoscope surya gochar 2024 in marathi
Kharmas 2024: १५ डिसेंबरपासून ‘या’ चार राशींवर मिळेल बक्कळ पैसा! खरमास सुरू होताच सूर्यदेवाच्या आशीर्वादाने धनलाभाची संधी
budh uday 2024
१२ डिसेंबरपासून नुसता पैसा; बुध ग्रहाचा उदय ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना देणार धन-संपत्तीचे सुख

जानेवारी :

प्रवास योग चांगले आहेत. कामानिमित्त देशांतर्गत तसेच परदेशातील छोटे प्रवास कराल. नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने मेहनतीचे फळ म्हणावे तसे मिळणार नाही. विवाहीत दाम्पत्यांनी जोडीदाराचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकावे. शब्दाने शब्द वाढवू नका. विद्यार्थी वर्गाची मेहनत परीक्षेत दिसून येईल. खर्चाचे प्रमाण वाढेल. टाळता न येणारे खर्च डोईजड होतील. कौटुंबिक समस्या सोडवण्यासाठी ज्येष्ठ मंडळी मदत करतील. रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवावे.

फेब्रुवारी :

पंचमातील रवी, शनी, शुक्र संमिश्र फळ देईल. तंत्रज्ञानाची, कलात्मक आणि कष्टप्रत कामे करावी लागतील. निर्णय पक्का करण्यापूर्वी सर्व बाजूंनी विचार करावा. आर्थिक नियोजन कामी येईल. गुंतवणूक लाभदायक ठरेल. विवाहीत दाम्पत्यांनी सबुरीने घ्यावे. विद्यार्थी वर्गाकडून बौद्धिक परिश्रम अपेक्षित आहेत. नोकरी व्यवसायात सध्या तरी बदल नको. आहे ते नेटाने करावे. पाय सुजणे, मरगळ वाटणे, मूत्रपिंडावर अतिरिक्त ताण पडणे हे त्रास संभावतात.

मार्च :

बुध शनीच्या प्रभावाने नव्या जबाबदाऱ्या उत्तम रित्या पार पाडाल. आयोजन, नियोजन चांगले कराल. विद्यार्थी वर्गाला ग्रहांचे पाठबळ चांगले मिळेल. षष्ठ आणि सप्तम स्थानातून या महिन्यातील शुक्राचे भ्रमण आत्मविश्वास वाढवेल. पण तो गरजेपेक्षा जास्त वाढू देऊ नका. नाहीतर हातातील संधी निसटून जाईल. जोडीदाराच्या अपेक्षा वाढतील. संवादात्मक चर्चा करणे गरजेचे ठरेल. गुंतवणूकदारांनी प्रलोभनांना बळी पडू नये. आर्थिक चढ उतार होतील. अपचनाच्या तक्रारी वाढतील.

एप्रिल :

भाग्य स्थानातील मंगळ आर्थिक गणिते पुन्हा स्थिर स्थावर करेल. नव्या संकल्पना यशस्वी होतील. नोकरी व्यवसायातील प्रकल्प मार्गी लागतील. २१ एप्रिलला होणारा गुरूचा मेष राशीतील प्रवेश लाभकारक ठरेल. जोडीदारासह मिळते जुळते घेण्यासाठी ज्येष्ठ मंडळी मध्यस्थी करतील. विद्यार्थी वर्गाने घेतलेल्या जीवापाड मेहनतीचे चीज होईल. हिमतीने पुढे जाल. डोळे आणि डोकं यांचे आरोग्य सांभाळावे. गुंतवणूकदारांनी फसव्या तेजीला भुलू नये.

मे :

शुक्र भाग्यात आणि शनी पंचमातून भ्रमण करणार आहे. तंत्रज्ञान, व्यवहारज्ञान आणि कलात्मकता यांचा सुंदर मिलाप होईल. मंगळ कमजोर असला तरी नोकरी व्यवसायात धीराने आगेकूच करण्यास मदत करेल. जोडीदाराच्या समस्या सोडवताना अधिक खबरदारी घ्यावी. नाते नाजूक आहे. विद्यार्थी वर्गाची मेहनत फळास येईल. अपेक्षित क्षेत्रात शिक्षण घ्याल. सध्या परदेशाबाबतची कामे लांबणीवर पडतील. सबुरीने घ्यावे. सर्दी व श्वसनाचे विकार बळावतील.

जून :

ग्रहांची साथ चांगली आहे. नोकरी व्यवसायात प्रगती कराल. धनसंपत्ती वाढेल. आनंदाच्या वार्ता समजतील. विवाहीत दाम्पत्यांनी एकमेकांसाठी वेळ काढावा. समस्यांचे निराकरण होईल. विद्यार्थी वर्गाने या नव्या शैक्षणिक वर्षात सुरुवातीपासूनच अभ्यासावर लक्ष केंद्रीत करावे. गुरुबल चांगले असल्याने विशेष लाभ मिळतील. कुटुंबातील ज्येष्ठ मंडळींचा पाठिंबा मिळेल. तब्येतीच्या बारीकसारीक तक्रारी येतील पण वैद्यकीय निदान लगेच होणार नाही.

जुलै :

भाग्य आणि दशम स्थानातील रवी, बुधाचे भ्रमण विशेष लाभकारक ठरेल. गुरुबल चांगले आहेच. नोकरी व्यवसायात मोठी झेप घ्याल. त्यात आर्थिकदृष्ट्या चांगला लाभ होण्याचे योग आहेत. विद्यार्थी वर्गाला मेहनतीचे फळ उत्तम मिळेल. जोडीदाराच्या समस्या सोडवताना नातेवाईकांची मदत होईल. खांदे भरून येणे, मान आखडणे असे त्रास संभवतील. गुंतवणूकदारांना कमीतकमी तोटा सहन करावा लागेल. चिंता नसावी. विवाहोत्सुक मंडळींनी जोडीदाराचे संशोधन सुरू ठेवावे.

ऑगस्ट :

लाभ स्थानातील रवी मंगळाचे भ्रमण आपल्याला विशेष लाभ मिळवून देईल. आपल्या योजना यशस्वी होतील. नोकरी व्यवसायातील रखडलेली कामे मोठ्या हिमतीने मार्गी लावाल. कामाची दखल घेतली जाईल. जोडीदाराच्या साथीने कौटुंबिक बाबी अलगद सोडवाल. विद्यार्थी वर्गाच्या सातत्यपूर्ण अभ्यासामुळे यश मिळेल. आळस झटकावा. विवाहोत्सुक मंडळींना मनाजोगता जोडीदार मिळेल. पायाला जखम झाल्यास त्यात पू होऊन ती चिखळण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा<< Virgo Yearly Horoscope 2023: कन्या राशीला लक्ष्मी कधी देणार धनलाभ? सोनल चितळेंकडून जाणून घ्या १२ महिन्यांचे राशीभविष्य

सप्टेंबर :

एकंदरीत ग्रहबल चांगले असल्याने हाती घेतलेली कामे झपाट्याने पुढे सरकतील. सरकारी कामे मात्र लांबणीवर पडतील. त्यासाठी धीराने घेणेच बरे ! नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने आर्थिक पाठबळ चांगले मिळेल. नोकरीत बदल घ्यायचा असेल तर कालावधी योग्य आहे. खर्चाचे प्रमाण बरेच वाढेल. त्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. विद्यार्थी वर्गाच्या एकाग्रतेमुळे विषयाचे आकलन झटपट होईल. हवेतील प्रदूषणामुळे श्वासाचे विकार त्रास देतील.

ऑक्टोबर :

आपल्या राशीत रवी, मंगळ, केतू हे तीन उष्ण ग्रह येणार आहेत. नेहमीचा वैचारिक समतोल ढासळू शकतो. ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणाखाली नाहीत त्या गोष्टींबाबत डोक्यात राग घालून घेऊ नका. नोकरी व्यवसायात चढ उतार अनुभवायला मिळतील. गुरुबल चांगले असल्याने परिस्थितीतून तरून जाल. विद्यार्थी वर्गाने अतिरिक्त आत्मविश्वास टाळावा. गुरुजनांचे मार्गदर्शन कामी येईल. विवाहोत्सुक मंडळींना चांगला योग आहे. त्वचा विकार, डोकेदुखीचा त्रास होईल.

हे ही वाचा<< Leo Yearly Horoscope 2023: सिंह रास श्रीमंत कधी होणार? सोनल चितळेंकडून जाणून घ्या १२ महिन्यांचं राशीभविष्य

नोव्हेंबर :

रवी, मंगळाचे आपल्या तुळ राशीतील आणि द्वितीय स्थानातील वृश्चिक राशीतील भ्रमण हळूहळू प्रगती करणारे ठरेल. कठोर शब्द टाळा. आपल्याच जवळच्या व्यक्तींच्या जिव्हारी लागतील असे सत्य थोड्या वेगळ्या पद्धतीने मांडा. नोकरी व्यवसायात देखील नातेसंबंध जपणे महत्वाचे ठरेल. विद्यार्थी वर्गाला अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज भासेल. आरोग्य ठीक राहील. २८ नोव्हेंबरला राहु आपल्या षष्ठ स्थानातील मीन राशीत प्रवेश करेल.

हे ही वाचा<< २०२३ मध्ये कर्क राशीला धनलाभ कधी? प्रेम व आरोग्य कसे असणार? सोनल चितळेंकडून जाणून घ्या १२ महिन्यांचे राशीभविष्य

डिसेंबर :

२८ नोव्हेंबरला झालेला राहुचा राशीबदल आपल्यासाठी अनेक दृष्टीने हितावह ठरेल. हिंमत वाढेल. स्पर्धा परीक्षेच्या तयारीला साहाय्य मिळेल. बढती, बदलीचे प्रयत्न सुरू करा. जोडीदाराच्या प्रगतीचा आलेख उंचावेल. कामासाठी लहानमोठे प्रवास कराल. कुटुंबासंमवेत वेळ घालवाल. आपल्या राशीतील शुक्र छंद, आवडीनिवडी यांना पूरक ठरेल. छंदाचे रूपांतर लहानश्या व्यवसायातही करू शकाल. कामाचे आयोजन चोख असायला हवे. सर्दी, खोकला, ताप यांच्या साथीला बळी पडाल.

२०२३ या वर्षात २१ एप्रिलनंतर आपल्याला गुरुबल चांगले आहे. बऱ्याच रखडलेल्या गोष्टी मार्गी लागतील. विवाह ठरेल. मोठे प्रवास वा परदेश गमनासाठी जोरदार योग नाहीत. त्यामुळे सध्या तरी उसंत घ्यावी. अंतर्गत बढती बदलीचे योग लाभदायक ठरतील. भावंडांच्या बाबतीत आपली स्पष्ट मते मांडणे इष्ट ठरणार नाही. नात्यात कटुता येईल. मार्च ते जुलै या कालावधीत केलेली गुंतवणूक पुढे खूप फायदा करून देईल. १७ जानेवारीला झालेला शनीचा राशी बदल आपणास खूपच लाभदायक ठरेल. न्यायालयीन कारवायांना वेग येईल. कायदेशीर मार्गाने त्या गोष्टींचा पाठपुरावा करणे अत्यंत महत्वाचे आहे. त्वचा, पाय, रक्तदोष या संबंधात शारीरिक त्रास होतील. संतती प्राप्तीसाठी वैद्यकीय तपासणी आणि उपास इलाज केलेत तर या वर्षात गोड बातमी समजेल. विद्यार्थी वर्गाच्या कष्टाचे चीज नक्कीच होईल. २१ एप्रिलनंतरचे दिवस खूप चांगले आहेत. थोडक्यात, प्रयत्नांना योग्य फळ देणारे असे हे २०२३ वर्ष असेल.

Story img Loader