Vastu Shastra: चिनी वास्तूमध्ये मेणबत्त्यांचे विशेष महत्त्व आहे. आजकाल बाजारात अनेक प्रकारच्या मेणबत्त्या पाहायला मिळतात. वेगवेगळ्या शैलीतील वेगवेगळ्या रंगांच्या मेणबत्त्या घरात खूप सुंदर दिसतात. ते घरातील वातावरणात भर घालतात आणि आनंददायी बनवतात. मात्र, घरात मेणबत्त्या एका विशिष्ट जागी लावण्याची पद्धत असते. त्या जागी मेणबत्या लावल्यास, तुमच्या घरात सुख समृद्धी नांदते.
तर आज वास्तुशास्त्रातील इंदू प्रकाशमधील मेणबत्त्यांबद्दल जाणून घेऊया.
मेणबत्त्या लावल्याने घरात ऊर्जेचा समतोल राहतो. मेणबत्या नकारात्मक ऊर्जा काढून टाकतात आणि तिचे सकारात्मक ऊर्जेमध्ये रूपांतर करतात. असे म्हणतात की मेणबत्त्यांमधून निघणारी ऊर्जा नकारात्मक ऊर्जा नष्ट करते, ज्यामुळे सकारात्मक ऊर्जा आपोआप वाढते. त्यामुळे घरात मेणबत्या लावणं कधीही शुभ मानलं जातं.
मात्र, मेणबत्या विशिष्ट जागी लावण्याची पद्धत असते. त्यामुळे मेणबत्त्या ठेवण्यासाठी जागा निवडताना विशेष काळजी घेतली पाहिजे. घराच्या पूर्व, उत्तर-पूर्व आणि दक्षिण दिशेला मेणबत्ती लावल्याने घरात सुख-समृद्धी नांदते. त्यामुळे मेणबत्ती लावताना याचं जागी लावावी जेणेकरून त्याचा फायदा होईल.