Love Marriage Numerology : ज्योतिषशास्त्रानुसार, आपण राशीवरून व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्वाविषयी जाणून घेऊ शकतो त्याचप्रमाणे अंकशास्त्रानुसार आपण मूलांकवरून सुद्धा व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्वाविषयी जाणून घेऊ शकतो.
अंकशास्त्रामध्ये अंकांना खूप महत्त्व आहे. प्रत्येक अंकाचा संबंध कोणत्या ना कोणत्या ग्रहाबरोबर असतो. प्रत्येक व्यक्तीचा मूलांक हा वेगवेगळा असतो. या मूलांकच्या मदतीने तुम्ही व्यक्तीविषयी अनेक गोष्टी जाणून घेऊ शकता. व्यक्तीचा मूलांक हा त्याच्या विवाहाविषयी सुद्धा माहिती देतो. आज आपण त्याविषयी जाणून घेणार आहोत.
मूलांक १ – कोणत्याही महिन्याच्या १, १०, १९ आणि २८ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक १ असतो. ते प्रेमाच्या बाबतीत खूप लाजाळू असतात. ते सहज आपल्या भावना व्यक्त करत नाही. जोडीदाराजवळ प्रेम व्यक्त करू शकत नाही. त्यामुळे प्रेमविवाह करणे या लोकांसाठी खूप कठीण जाते.
मूलांक २ – कोणत्याही महिन्याच्या २, ११ आणि २० तारखेला जन्मलेले लोक आपल्या मनाचे मालक असतात. प्रेमाच्या बाबतीत हे लोक बुद्धीने विचार करतात. खूप विचार करून हे लोक प्रेमात पडतात पण ते प्रेम विवाह करण्याचा पूर्ण विचार करतात.
मूलांक ३ – कोणत्याही महिन्याच्या ३, १२, २१ आणि ३० तारखेला जन्मलेले लोक खूप वर्चस्व गाजवणारे असतात. या लोकांचा स्वामी ग्रह गुरू असतो. प्रेम विवाह करण्याची शक्यता या लोकांची जास्त असते.
मूलांक ४ – कोणत्याही महिन्यातील ४, १३, २२ आणि ३१ तारखेला जन्मलेल्या लोकांचा स्वामी ग्रह राहु असतो. ते एकापेक्षा जास्त संबंध ठेवतात. प्रेमसंबंधाविषय ते फार गंभीर नसतात. ते नात्यात प्रामाणित नसतात त्यामुळे या मूलांकचे लोक प्रेमविवाह खूप कमी करतात.
हेही वाचा : रक्षाबंधनानंतर ‘या’ राशींचे सुखाचे दिवस, मिळेल धन? देवगुरु नक्षत्र बदल करताच मिळू शकते प्रचंड श्रीमंतीची संधी
मूलांक ५ – महिन्याच्या ५, १५ आणि २३ ताखरेला ज्यांचा वाढदिवस असतो, ते प्रेमाच्या बाबतीत लकी नसतात. त्याचबरोबर हे लोक संस्कृती आणि परंपरा पाळतात ज्यामुळे मोठ्यांच्या सहमतीने ते विवाह करतात.
मूलांक ६ – ६, १५ आणि २४ जन्म तारीख असलेल्या लोकांचा स्वामी ग्रह शुक्र असतो. हे लोक प्रेमाच्या बाबतीत खूप लकी असतात. यांचा प्रेमविवाह सुद्धा यशस्वी होतो. पण अनेकदा एकापेक्षा जास्त प्रेम प्रकरणामुळे ते जोडीदाराला गमवतात.
मूलांक ७ – महिन्याच्या ७, १६ आणि २५ तारखेला जन्मलेले लोक खूप लाजाळू असतात. या मूलांकच्या लोकांचा स्वामी ग्रह केतू असतो. लव्ह मॅरेजमध्ये या लोकांची खूप इच्छा असते पण लग्नासंबंधित निर्णय घेताना हे लोक खूप गोंधळून जातात.
मूलांक ८ – मूलांक ८ हा शनिचा नंबर असतो. हे लोक नात्यात खूप प्रामाणिक असतात. नातेसंबंधातील निर्णय ते खूप विचारपूर्वक करतात. ते खूप जास्त प्रेमात पडत नाही पण त्यांची लव्ह मॅरेज यशस्वी होते.
मूलांक ९ – मूलांक ९ च्या लोकांना प्रेमाच्या बाबतीत खूप जास्त आवड नसते. हे लोक लव्ह मॅरेज करणे टाळतात. ते सहसा अरेंज मॅरेज करतात.
© IE Online Media Services (P) Ltd