Love Numerology: अंकशास्त्रानुसार, जन्म तारखेला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि याचा संबंध व्यक्तीच्या विवाहाशी जुळलेला आहे. विवाह हे एक पवित्र बंधन आहे. विवाह हे दोन प्रकारचे असतात. एक लव्ह मॅरेज आणि दुसरे अरेंज मॅरेज. खूप लोक अरेंज मॅरेज पेक्षा प्रियकर किंवा प्रेयसीबरोबर लव्ह मॅरेज करण्यास पसंती देतात पण अनेकदा लोक इच्छा असूनही प्रेम विवाह करू शकत नाही.

आज आपण अशा चार मूलांक विषयी जाणून घेणार आहोत जे लव्ह मॅरेज करू शकतात म्हणजेच आज आपण अशा लोकांविषयी जाणून घेणार आहोत जे त्यांचे प्रेमाचे विवाहात रुपांतर करतात. अंक शास्त्रानुसार, चार मूलांक लव्ह मॅरेज करू असतात ते मूलांक आहेत – ३, ५, ६ आणि ९

मूलांक ३

कोणत्याही महिन्याच्या ३, १२, २१ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ३ असतो आणि हे लोक मनमिळाऊ व बोलक्या स्वभावाचे असतात. ते कोणालाही स्वत:कडे आकर्षित करण्याची क्षमता ठेवतात. हे लोक प्रेमात पडल्यानंतर आपल्या जोडीदाराबरोबर लग्न करण्यास तयार असतात. हे लोक प्रेम विवाह करण्यास उत्सुक असतात.

मूलांक ५

कोणत्याही महिन्याच्या ५, १४ आणि २३ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ५ असतो. हे लोक स्वतंत्र असतात आणि स्वभावाने रोमँटिक असतात. हे लोक प्रेम संबंधाला लग्नापर्यंत नेतात.

मूलांक ६

कोणत्याही महिन्याच्या ६, १५, २४ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ६ असतो. हे लोक आपल्या प्रेमाला घेऊन खूप सेन्सेटिव्ह असतात. प्रेमात पडल्यानंतर हे लोक कोणतेही नाते खूप मनापासून निभावतात. ते प्रेमी किंवा प्रेमिकाबरोबर खूप दृढ संबंध ठेवतात. हे लोक प्रेमात पडल्यानंतर आवर्जून लग्न करतात. ते जोडीदाराबरोबरचे नाते खूप मनापासून जपतात.

मूलांक ९

कोणत्याही महिन्याच्या ९, १८ आणि २७ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ९ असतो. अंकशास्त्रानुसार, हे लोक स्वभावाने खूप धाडसी, जिद्दी आणि सामाजिक परंपरेला आव्हान देतात. हे लोक एखाद्यावर मनापासून प्रेम करत असेल तर कोणत्याही परिस्थितीत प्रेम विवाह करतात. ते मनापासून जोडीदारावर खूप प्रेम करतात.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)