Love Marriage Numerology In Marathi : अंकशास्त्रानुसार, जन्मतारीख खूप महत्वाची आहे आणि संबध व्यक्तीच्या लग्नाशी देखील जोडला जातो. लग्न हे एक पवित्र बंधन आहे. जेव्हा लग्नाचा विषय निघते तेव्हा लोक प्रेम विवाहाला जास्त महत्त्व देतात. पण, प्रत्येकजण प्रेम विवाह करू शकत नाही. बहुतेक लोक अरेंज्ड मॅरेजऐवजी त्यांच्या प्रियकराबरोबर प्रेम विवाह करण्यास पसंती देतात परंतु अनेक वेळा असे घडते की, कितीही इच्छा असली तरी काही जण प्रेम विवाह करू शकत नाहीत. आजच्या या भागात आपण हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू की मूलांकापैकी कोणत्या मूलाकंचे लोक प्रेमविवाह करतात, म्हणजेच कोणाचे प्रेम लग्नापर्यंत पोहोचवतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अंकशास्त्रानुसार, चार अंक असलेले लोक प्रेमसंबंधांना विवाहात रूपांतरित करण्यात आघाडीवर असतात. त्यांच्यासाठी प्रेमविवाहाची शक्यता खूप जास्त असते.
हे मूलांक संख्या आहेत – ३, ५, ६ आणि ९

या मूलांक संख्यांच्या लोकांबद्दल जाणून घ्या

मूलांक ३: कोणत्याही महिन्याच्या ३, १२ किंवा २१ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ३ असतो आणि हे लोक स्वभावाने समजूतदार आणि बोलके असतात. कोणालाही आकर्षित करण्याची क्षमता असलेले हे लोक प्रेमात पडल्यानंतर त्यांच्या बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंडला नक्कीच त्यांचा लाईफ पार्टनर बनवतात. हे लोक अनेकदा प्रेमविवाह करण्याचा प्रयत्न करताना दिसतात.

मूलांक ५: कोणत्याही महिन्याच्या ५, १४ आणि २३ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ५ असतो. हे लोक आपले जीवन स्वातंत्र्याने जगतात आणि स्वभावाने रोमँटिक असतात. हे लोक अनेकदा त्यांचे प्रेमसंबंध लग्नापर्यंत घेऊन जातात.

मूलांक ६: कोणत्याही महिन्याच्या ६, १५, २४ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ६ असतो आणि हे लोक त्यांच्या प्रेमाबाबत संवेदनशील असतात. प्रेमात बुडालेले हे लोक नात्याशी पूर्णपणे भावनिकरित्या जोडले जातात. हे लोक, ज्यांचे त्यांच्या बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंडशी खूप खोल भावनिक बंधन असते, ते प्रेमात पडल्यानंतर नक्कीच लग्न करतात.

मूलांक ९: कोणत्याही महिन्याच्या ९, १८ किंवा २७ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ९ असतो. अंकशास्त्रानुसार, हे लोक स्वभावाने हट्टी असू शकतात आणि सामाजिक रीतिरिवाजांना आव्हान देऊ शकतात आणि कोणत्याही किंमतीत त्यांचे प्रेम लग्नाच्या गंतव्यस्थानावर घेऊन जाऊ शकतात.

टीप – सदर लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.