Grah Gochar 2023: नववर्षात अनेक ग्रह हे आपले स्थान सोडून अन्य राशींच्या प्रभाव कक्षेत स्थिर होणार आहेत. जानेवारी २०२३ मध्ये शनि, सूर्य, मंगळ असे शक्तिशाली व मोठे ग्रह आपला मार्ग बदलणार आहेत. याचा परिणाम राशीचक्रातील १२ राशींवर दिसून येणार असून यामुळे येत्या काळात अनेकांसाठी शुभ अशुभ वेळ सुरु होऊ शकते. मात्र तत्पूर्वी २०२२ च्या शेवटच्या आठवड्यात काही राशींच्या नशिबाचे दार उघडणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, २०२२ च्या शेवटच्या आठवड्यात ग्रहांचे राशी परिवर्तन झाल्याने अचानक काही राशींसाठी अत्यंत लाभदायक योग तयार होत आहेत.
ज्योतिष शास्त्र अभ्यासक सांगतात की, २८ डिसेंबरला बुध व २९ डिसेंबरला शुक्र देव मकर राशीत प्रवेश घेणार आहेत. तसेच बुध ग्रह ३१ डिसेंबरला वक्री होऊन धनु राशीत प्रवेश घेणार आहेत. या राशी परिवर्तनामुळे काही राशींना प्रचंड धनलाभासह करिअरमध्ये मोठ्या प्रगतीचे योग तयार होत आहेत. या भाग्यवान राशी कोणत्या हे आता पाहुयात …
मेष (Grah Gochar 2023)
मकर राशीत बुध व शुक्राने प्रवेश करताच तसेच धनु राशीत बुध ग्रहाचा प्रभाव सुरु होताच मेष राशीसाठी सुखाचा काळ सुरु होऊ शकतो. २०२२ च्या शेवटच्या आठवड्यात मेष राशीच्या मंडळींना हव्या त्या कामात यश प्राप्तीचे योग आहेत. तुमच्या कामाच्या ठिकाणी वाहवा होऊ शकते. तुमच्या जोडीदाराला तुमच्यामुळे प्रचंड धनलाभ होण्याची शक्यता आहे. यामुळे तुमचे वैवाहिक आयुष्य तुमच्या आनंदाचे कारण ठरू शकते.
कर्क (Budh Gochar 2023)
कर्क राशीच्या मंडळींना सूर्यासह बुध ग्रहाची चांगली साथ लाभणार आहे. या मंडळींच्या भाग्यात विना खर्च लाभाचे योग आहेत. म्हणजेच एखाद्या वेळीस आपल्या कामाच्या ठिकाणहून आपल्याला परदेशी जाण्याची संधी मिळू शकते. तसेच पूर्वजांच्या गुंतवणुकीचा लाभ होऊ शकतो. येत्या काळात शुक्र गोचर होत असल्याने कर्क राशीला धनसंपत्तीची व प्रदीर्घ काळ टिकणारे वैभव लाभू शकते.
कन्या (Shukra Gochar 2023)
कन्या राशीसाठी ग्रहांचे राशी परिवर्तन फलदायक ठरू शकते. नोकरीच्या शोधात असणाऱ्या मंडळींना लवकरच शुभ वार्ता मिळू शकते. तुम्हाला हवी तशी नोकरीची संधी समोरून चालत येणार असल्याचे दिसत आहे. तुम्हाला करिअरमध्ये मोठी प्रगती लाभू शकते. कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पना वरिष्ठांना प्रचंड आवडून तुम्हाला प्रमोशन मिळू शकते, फक्त तुम्ही हिमंत हरू नका.
हे ही वाचा<< १४ जानेवारी पासून ‘या’ राशी होऊ शकतात श्रीमंतीच्या धनी; २०२३ ची मकरसंक्रांत देणार गोड बातमी
तूळ (Gochar 2023)
तूळ राशीच्या मंडळींसाठी ग्रह गोचर लाभदायक ठरू शकते. येत्या काळात सुख- समृद्धी तुमच्या दाराशी येण्याची चिन्हे आहेत. धनलाभासह अधिकाधिक संधी तुमच्याकडे चालून येऊ शकतात. तुमचे आरोग्य सुधारण्यात हा काळ फायद्याचा ठरू शकतो. या काळात तुमचे कुटुंब तुम्हाला हवी तशी साथ देईल परिणामी तुम्हाला मानसिक शांती व सुख अनुभवता येईल.
(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)