Favourite Zodiac Signs of Lord Vishnu: भारतात श्री हरी विष्णू हे जगाचे पालनकर्ता म्हणून ओळखले जातात. जे भक्त भगवान विष्णूची आराधना करतात त्यांच्या जीवनात नेहमी सुख-शांती राहते आणि त्यांना समृद्धीही मिळते असे मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, जी व्यक्ती भगवान विष्णूची पूजा करते तिच्यावर देवी लक्ष्मीची कृपा असते. असे म्हणतात की, भगवान विष्णू आपल्या सर्व भक्तांवर प्रेम करतात. जो खऱ्या मनाने आणि पूर्ण भक्तीने श्री हरीची उपासना करतो, त्याला आपला आशीर्वाद नक्कीच मिळतो. परंतु अशा काही राशी आहेत, ज्यांवर भगवान विष्णूची विशेष कृपा राहते. या राशीच्या लोकांना कधीही पैशाशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागत नाही आणि त्यांना जीवनातील प्रत्येक सुख मिळते असे मानले जाते. चला जाणून घेऊ या, त्या कोणत्या राशी आहेत.
वृषभ रास
ज्योतिषशास्त्रानुसार वृषभ राशीच्या लोकांवर भगवान विष्णूंची सदैव कृपा असते. असे म्हणतात की, वृषभ राशीच्या जातकांचे व्यक्तिमत्त्व आकर्षक असते. ते खूप मेहनतीही असतात आणि जे काम हातात घेतात त्यात यशस्वी होतात. म्हणून वृषभ राशीच्या जातकांवर श्री हरी विष्णुसह लक्ष्मीदेवीचीही विशेष कृपा असते असे मानले जाते.
हेही वाचा – शुक्रदेव ३७ दिवस कर्क राशीत विराजमान, ‘या’ तीन राशींच्या लोकांचे नशीब बदलणार? बख्खळ पैसा मिळण्याची शक्यता!
कर्क रास
ज्योतिषशास्त्रानुसार कर्क राशीचे जातक भगवान विष्णूंच्या कृपेने आयुष्यात खूप यशस्वी होतात. असे म्हणतात की, भगवान विष्णूंप्रमाणे कर्क राशीच्या लोकांचा स्वभावदेखील शांत असतो पण जेव्हा त्यांच्या संयमाचा बांध तुटतो तेव्हा त्यांना शांत राहणे अवघड जाते. या लोकांना नेहमी चांगल्या गोष्टी आवडतात असे मानले जाते.
सिंह रास
ज्योतिषशास्त्रानुसार सिंह राशीच्या जातकांवरदेखील भगवाना विष्णूंची विशेष कृपा असते. असे म्हणतात, सिंह राशीचे जातक जे काम करतात त्यात विष्णूच्या कृपेमुळे यशस्वी होतात. या राशींच्या लोकांना नशीब नेहमी साथ देते आणि त्यांना नेहमी मानसन्मान मिळतो, असे मानले जाते.
हेही वाचा – शेवटच्या श्वासापर्यंत शत्रुत्व ठेवतात ‘या’ राशीचे लोक! तुम्ही तर नाही ना त्यांच्यापैकी एक?
तूळ रास
ज्योतिषशास्त्रानुसार तूळ राशीच्या लोकांवरही भगवान विष्णूची कृपा असते. असे म्हणतात की , तूळ राशीचे लोक कठोर परिश्रम करतात, जे कोणत्याही अडचणीतही काम करण्यास मागेपुढे पाहत नाहीत आणि यशस्वी होतात. तसेच ते कुटुंबातील प्रत्येक सदस्याला वेळ देण्याचा प्रयत्न करतात. श्री हरी विष्णूच्या कृपेने त्यांच्या आयुष्यात आर्थिक मंदी येत नाही असे मानले जाते.