Mangal Shukra Yuti 2023: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार मे महिन्यात, अनेक ग्रहांचे गोचर तसेच राशी व नक्षत्र परिवर्तन होणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, येत्या २ मे २०२३ पासून काही राशींसाठी सोन्याहून पिवळा सुखाचा काळ सुरु होण्याची शक्यता आहे. दैत्यगुरू शुक्रदेव हे मे महिन्याच्या सुरुवातीलाच बुध राशी मिथुन मध्ये प्रवेश घेणार आहे. २ मे ला दुपारी १ वाजून ४६ मिनिटांनी शुक्राचा मिथुन राशीत प्रवेश होणार आहे. ज्योतिष अभ्यासक सांगतात की, मिथुन राशीत अगोदरच मंगळदेव स्थिर आहेत त्यामुळे शुक्र व मंगळाची युती होऊन येत्या काळात काही राशींच्या भाग्यात प्रचंड मोठ्या उलाढाली पाहायला मिळू शकतात. मात्र ही युती केवळ आठच दिवस कायम असणार आहे कारण १० मे ला शुक्र मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश घेणार आहे. मंगळ व शुक्राच्या युतीने नेमक्या कोणत्या राशीला काय लाभ होण्याची चिन्हे आहेत हे पाहूया…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मंगळ- शुक्र युतीने ‘या’ ३ राशींना मिळणार बक्कळ धनलाभ?

मेष रास (Mesh Rashi)

मेष राशीत शुक्र व मंगळाचे गोचर हे तिसऱ्याच स्थानी होणार आहे. या राशीला येत्या काही काळात आपल्या जवळच्या माणसांची पारख करण्याची वेळ अनुभवता येऊ शकते. जवळचे लोक भेटून तुम्हाला खूप आनंद होऊ शकतो. निस्वार्थपणे केलेली मदत तुम्हाला धनलाभ मिळवून देऊ शकते. भावंडांच्या साहाय्याने एखाद्या नव्या संधीचे सोने करू शकता. नोकरी व व्यवसाय तुम्हाला आर्थिक लाभ मिळवण्याची संधी देऊ शकतो.

वृषभ रास (Taurus Zodiac)

शुक्र व मंगळाचे गोचर हे वृषभ राशीच्या दुसऱ्या स्थानी होत आहे. या राशीला येत्या काळात प्रचंड धन- संपत्ती, आनंद, समृद्धी अनुभवता येऊ शकते. तसेच आर्थिक मिळकतीचे मार्ग मोकळे होऊ शकते. नोकरीच्या बाजूने तुम्हाला स्थैर्य अनुभवता येऊ शकते. प्रेम व वैवाहिक आयुष्यात किंचित चढउतार येऊ शकतात. काम पाहून तुमच्यावर नव्या जबाबदाऱ्या टाकल्या जाऊ शकतात, ज्यामुळे समाजात तुमचा मान सन्मान वाढू शकतो.

हे ही वाचा<< ३६५ दिवसांनी आता ग्रह राजा करणार मोठी उलाढाल; ‘या’ ४ राशी कोट्याधीश होऊन मिळू शकते सूर्यासम तेज

कन्या रास (Kanya Zodiac)

कन्या राशीच्या कुंडलीत मंगळ देव आठव्या स्थानी व शुक्र दहाव्या स्थानी स्थिर होणार आहे. कन्या राशीच्या नोकरदार व व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना अनपेक्षित स्वरूपात माता लक्ष्मीचा आशिर्वाद लाभू शकतो. प्रलंबित कामे मार्गी लागल्याने डोक्यावरचा ताण दूर होण्यास मदत होऊ शकते. कामाच्या ठिकाणी प्रगतीची संधी मिळू शकते. मेहनतीचे फळ मिळू शकते व कुटुंबासह प्रेमाचा काळ अनुभवता येऊ शकतो.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ma lakshmi in mangal shukra yuti give tremendous money and you can earn crores astrologer prediction for zodiac signs svs