माघ अमावस्या बुधवार, ०२ मार्च रोजी आहे. जीवनात सुख-शांती मिळवण्यासाठी केला जाणारा माघ अमावस्येचा व्रत यावेळी विशेष आहे. माघ अमावस्येला शिव आणि सिद्ध योगाचा एकत्र येत आहेत. या विशेष योगामध्ये केलेले व्रत आणि उपासना लोकांना दुहेरी फळ देईल. पितरांच्या शांतीसाठी या दिवशी तर्पण आणि श्राद्धही केले जाते. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करून दान देण्याचीही परंपरा आहे. धार्मिक मान्यतेनुसार माघ अमावस्येला देवी-देवता पवित्र नद्यांमध्ये वास करतात. त्यामुळे या दिवशी गंगा, यमुना आणि सरस्वती स्नान करण्याचे विशेष महत्त्व मानले जाते. माघ अमावस्या सोमवारी आली तर या दिवशी महाकुंभ स्नानाचा योगही तयार होतो. हा योग फलदायी असल्याचं मानलं जातं. अमावस्येच्या दिवशी भगवान शिवशंकर आणि भगवान श्रीकृष्ण यांची विधिवत पूजा करण्याचा नियम आहे.

माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी २ मार्च रोजी पहाटे ०१ वाजून ०३ पासून सुरू होत आहे. यावेळी महाशिवरात्रीची सांगता होईल. माघ अमावस्या तिथी २ मार्च रोजी रात्री ११ वाजून ०४ मिनिटांना समाप्त होईल. उदय तिथीनुसार, माघ अमावस्या २ मार्च रोजी आहे. फाल्गुन अमावस्येच्या दिवशी सकाळी ८ वाजून २१ मिनिटापर्यंत शिवयोग आहे. त्यानंतर सिद्ध योग असेल. हा योग ३ मार्च रोजी पहाटे ५ वाजून ४३ मिनिटापर्यंत राहील.

This Diwali the FDA will conduct a special drive to inspect food products
एफडीएची दिवाळीनिमित्त खाद्यपदार्थ विक्रेत्यांविरोधात विशेष मोहीम
24th October 2024 Horoscopes In Marathi
24 October Horoscope : गुरुपुष्यामृत योग कोणत्या राशींसाठी…
tapeworms pills effect on body
Tapeworm Pills : लठ्ठपणा कमी करण्यासाठी टेपवर्मचा वापर? त्याचा शरीरावर किती घातक परिणाम?
Gold-Silver Rate today | gold price gold rate
Gold Silver Rate : दसऱ्यानंतर सोने चांदीचे भाव घसरले, सोने खरेदी करायचा विचार करताय? जाणून घ्या आजचा भाव
police patrolling for women safety during festivals thane news
उत्सवांच्याकाळात महिला सुरक्षेसाठी साध्या वेशातील पोलीसांची गस्त
Shardiya Navratri 2024
Shardiya Navratri 2024 : नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये ‘या’ गंभीर चुका टाळा अन् देवीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी ‘या’ गोष्टी करा
season do hair lice occur
केसातील उवा कोणत्या ऋतूमध्ये होतात? त्यांच्यापासून दूर राहण्यासाठी तज्ज्ञांनी सांगितला उपाय…
To avoid repeat of incident during Navratri festival police started patrolling in bhiwandi
भिवंडीची पूनरावृत्ती टाळण्यासाठी नवरात्रोत्सवात पोलीस सतर्क समाजमाध्यमांवरील अफवांवर पोलिसांचे लक्ष, गस्तीवर भर

Rahu Gochar 2022: मायावी ग्रह राहूचे संक्रमण, ‘या’ चार राशींना शेअर्स आणि व्यवसायात होणार फायदा

माघ अमावस्येच्या दिवशी काय कराल

  • या दिवशी नदी, जलाशय किंवा तलाव इत्यादीमध्ये स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करून पितरांना नमस्कार करावा.
  • पितरांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी व्रत करा आणि एखाद्या गरीबाला दान आणि दक्षिणा द्या.
  • अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि आपल्या पूर्वजांचे स्मरण करा. पिंपळाला सात प्रदक्षिणा मारा.
  • रुद्र, अग्नी आणि ब्राह्मण यांची पूजा केल्यानंतर त्यांना उडीद, दही, पुरी इत्यादींचा नैवेद्य दाखवावा आणि तेच पदार्थ एकदा सेवन करावे.
  • शिव मंदिरात जाऊन शिवलिंगावर कच्च्या गाईचे दूध, दही, मध यांचा अभिषेक करा आणि काळे तीळ अर्पण करा.
  • अमावस्या हा शनिदेवाचा दिवसही मानला जातो. त्यामुळे या दिवशी त्यांची पूजा करणे आवश्यक आहे. अमावस्येला शनि मंदिरात निळी फुले अर्पण करा. काळे तीळ, काळी अख्खी उडीद डाळ, काजल आणि काळे वस्त्र अर्पण करा.