Magh Purnima 2023: यंदाची माघ पौर्णिमा येत्या शनिवारी म्हणजे ४ फेब्रुवारी रोजी सुरु होणार आहे. तर रविवारी दुपारी म्हणजेच दुसऱ्या दिवशी समाप्त होणार आहे. हिंदू धर्मात माघ पौर्णिमेला विशेष महत्व आहे. या दिवशी चंद्र आपल्या १६ कलांनी परिपूर्ण असतो. या दिवशी चंद्र स्वराशीत म्हणजेच कर्क राशीत प्रवेश करतो. या दिवशी स्वर्गातील सर्व देवी-देवता पृथ्वीवर येतात आणि गंगेत स्नान करतात असे मानले जाते. माघ पौर्णिमेला विशेष योग देखील घडत आहेत. त्यामुळे याचा चांगला परिणाम ४ राशींवर दिसून येईल. जाणून घेऊया या भाग्यशाली राशींबद्दल ज्यांच्यावर माता लक्ष्मीची कृपा असेल.
मेष राशी
या राशीच्या लोकांच्या कुंडलीत महालक्ष्मी योग तयार होत असल्याने शुभ परिणाम दिसून येतील. यावेळी तुम्हाला कोणत्याही सुख-सुविधांची कमतरता भासणार नाही. तसंच तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची देखील शक्यता आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांसाठी हा उत्तम काळ आहे आणि नोकरी करणाऱ्या लोकांची पदोन्नती निश्चित आहे.
कन्या राशी
माघ पौर्णिमेला कन्या राशीच्या लोकांवर माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद राहील. जीवनात मोठा बदल होईल आणि भरपूर पैसा मिळेल. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमच्या घरात आनंदाचे वातावरण राहील. तुमची प्रत्येक समस्या दूर होईल. तसंच आर्थिक जीवन देखील आनंदी राहील. व्यवसायात भरपूर फायदा होईल. नोकरदार लोकांना चांगली बातमी मिळू शकते.
तूळ राशी
या राशीच्या लोकांना भरपूर पैसा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आर्थिक स्तिथी देखील सुधारेल. नवीन नोकरी शोधणाऱ्यांसाठी हा काळ शुभ ठरणार आहे. जे लोकं व्यवसाय करत आहेत त्यांना यावेळी फायदा होईल. याकाळात तुम्हाला तुमच्या मित्रांचे पूर्ण सहकार्य मिळेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. याकाळात तुम्ही नवीन कार किंवा घर खरेदी करू शकता.
( हे ही वाचा: महाशिवरात्रीनंतर ‘या’ राशी होणार श्रीमंत? शुक्राच्या प्रवेशाने मिळणार प्रचंड धनलाभाची संधी)
कुंभ राशी
कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ शुभ ठरणार आहे. यावेळी तुम्हाला अचानक धनलाभ होईल. ज्यामुळे तुमची आर्थिक स्तिथी सुधारेल. तसंच यावेळी नवीन कामात फायदा होईल. व्यवसायात लाभ आणि विस्तार होईल. वर्षानुवर्षे रखडलेली कामे मार्गी लागतील. कुटुंबात शांतता राहील. या दरम्यान तुमच्या जीवनात सकारात्मक बदल दिसून येतील.