Maghi Ganesha Jayanti Special Horoscope : १ फेब्रुवारी २०२५ रोजी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथी आहे. तृतीया तिथी आज दुपारी ११ वाजून ३९ मिनिटांपर्यंत चालेल, त्यानंतर चतुर्थी तिथी सुरू होईल. आज परीघ योग दुपारी १२ वाजून २५ मिनिटांपर्यंत जुळून येईल. याशिवाय पूर्वा भाद्रपद नक्षत्र रात्री २ वाजून ३३ मिनिटांपर्यंत जागृत असेल. राहू काळ सकाळी ९ वाजता सुरु होईल ते १० वाजून ३० मिनिटांपर्यंत असणार आहे.

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत मोफत वाचा

त्याचप्रमाणे आज १ फेब्रुवारी २०२५ रोजी माघी गणेश जयंती (Maghi Ganesh Jayanti) साजरी केली जाणार आहे. हिंदू पंचांगानुसार दरवर्षी माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश जयंती साजरी केली जाते. या दिवशी श्रीगणेशाची विधीवत पूजा करुन व्रत केले जाते. तर आज माघी गणेश जयंतीच्या निमित्ताने मेष ते मीनच्या आयुष्यात काय घडणार हे आपण ज्योतिषी विद्याधर करंदीकर यांच्याकडून जाणून घेणार आहोत.

१ फेब्रुवारीचे मेष ते मीन राशींचे राशिभविष्य (Aries To Pisces Horoscope Today):

मेष:- कामाचा आनंद घ्यावा. हाताखालील लोकांचे उत्तम सहकार्य लाभेल. जवळचे नातेवाईक भेटतील. स्वभावात चंचलता येईल. लहानांशी मैत्री कराल.

वृषभ:- पचनाच्या तक्रारी राहतील. विचारातून कर्मठपणा दर्शवाल. वडीलांचे मत विरोधी वाटू शकते. आपल्या बुद्धिमत्तेचा योग्य वापर करता येईल. जुन्या गोष्टीत अडकून पडाल.

मिथुन:- प्रकृतीच्या बाबत हयगय करू नका. प्रतिकूलतेतून मार्ग काढता येईल. वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे. कामाचे योग्य नियोजन करावे. घरातील कामात अधिक गुंतून राहाल.

कर्क:- जवळच्या प्रवासाची मजा घ्याल. जवळचे मित्र जमवाल. आपल्या छंदाला अधिक वेळ द्यावा. शांतपणे विचार करावा. आधुनिकतेने विचार करून पहावा.

सिंह:- गैरसमजुतीतून वाद वाढू शकतात. काही गोष्टी दिरंगाईने पार पडतील. पायाचे त्रास दुर्लक्षित करू नका. कफ विकाराचा त्रास संभवतो. मानसिक शांतता जपावी लागेल.

कन्या:- आपली छाप पाडण्याचा प्रयत्न करावा. बौद्धिक दृष्टीकोन ठेवावा. दिवस आनंदात घालवाल. मैत्रीचे संबंध अधिक घट्ट होतील. घरातील प्रश्नांकडे प्राधान्याने लक्ष द्यावे.

तूळ:- घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी. कष्टाला मागेपुढे पाहू नका. चिकाटीने कामे करण्यावर भर द्यावा. योग्य समतोल राखण्याचा प्रयत्न करावा. फार विचार करू नयेत.

वृश्चिक:- काही गोष्टींचे चिंतन करावे. धैर्याने कामे हाती घ्यावीत. तुमच्या पराक्रमाला चांगला वाव मिळेल. चटकन निराश होऊ नका. काही गोष्टींचा सखोल विचार करावा.

धनू:- स्थावरची कामे मार्गी लागतील. चिकाटीने अनेक कामे हाती घ्याल. व्यवहारी दृष्टीकोन ठेवाल. अगदी मोजकेच बोलाल.

मकर:- प्रौढपणे वागणे ठेवाल. चटकन निराश होण्याचे कारण नाही. अडथळ्यातून मार्ग निघेल. सर्वांच्या आनंदात सहभागी व्हाल. तुमचा मान वाढेल.

कुंभ:- मानापमानाचे प्रसंग येऊ शकतात. काही मापदंड ठरवून घ्यावेत. आलेल्या संधीचा लाभ उठवावा. गप्पा मारण्यात रंगून जाल. मौल्यवान वस्तु खरेदी कराल.

मीन:- सामाजिक कामात हिरीरीने सहभाग नोंदवाल. मानाने कामे हाती घ्याल. काहीसे स्व‍च्छंदीपणे वागाल. चैनीच्या वस्तु खरेदी कराल. जोडीदाराचा प्रेमळपणा दिसून येईल.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maghi ganesh jayanti 2025 on 1 february bappas blessings will clear all the obstacle from aries to pisces life read horoscope in marathi asp