11 February 2025 Horoscope : ११ फेब्रुवारीला माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथी आहे. चतुर्दशी तिथी संध्याकाळी ६ वाजून ६५ मिनिटांपर्यंत राहील. आज सकाळी ९ वाजून ६ मिनिटांपर्यंत आयुष्मान योग असेल, त्यानंतर सौभाग्य योग सुरु होईल. तसेच पुष्य नक्षत्र संध्याकाळी ६ वाजून ३४ मिनिटांपर्यंत जागृत असेल. राहू काळ ३ ते ४ वाजून ३० मिनिटांपर्यंत असणार आहे.

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

याशिवाय ११ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजून ५३ मिनिटांनी बुध ग्रहाचा कुंभ राशीत प्रवेश करेल. तर आज पौर्णिमा सुद्धा असणार आहे. माघ महिन्याच्या पौर्णिमेला ‘माघी पौर्णिमा’ असेही म्हणतात. धार्मिक ग्रंथांनुसार या दिवशी भगवान विष्णू स्वत: गंगेच्या पाण्यात राहतात, त्यामुळे गंगेत स्नान करण्याचे विशेष महत्त्व आहे. तर आज आयुष्मान योग, बुध ग्रहाचा कुंभ राशीत प्रवेश आणि माघ पौर्णिमा कोणाच्या कुंडलीत सुख-समृद्धी घेऊन येणार हे आपण जाणून घेऊया…

११ फेब्रुवारी पंचांग व राशिभविष्य:

मेष:- उत्तम व्यावसायिक लाभ होईल. मनातील विचित्र कल्पना काढून टाकाव्यात. काही गोष्टी लपविण्याकडे कल राहील. कामात स्त्रियांची मदत मिळेल. बदलाला अनुसरून वागावे.

वृषभ:- जोडीदाराशी क्षुल्लक कारणावरून मतभेद संभवतात. उगाच विरोध करत बसू नका. भागीदारीत अधिक लक्ष घालावे. नवीन वस्त्र खरेदी कराल. कामाचे योग्य नियोजन करावे.

मिथुन:- क्षुल्लक मतभेद मनात धरून ठेवू नका. जुन्या दुखण्यांकडे दुर्लक्ष करू नका. आपल्या वागण्याने इतरांची मने जिंकून घ्याल. चांगले औद्योगिक वातावरण लाभेल. चैनीच्या वस्तु खरेदी कराल.

कर्क:- मनाची विशालता दाखवाल. मानसिक दोलायमानता जाणवेल. लिखाणात चांगली प्रगती करता येईल. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. जोडीदाराच्या स्वभावाची नवीन बाजू लक्षात येईल.

सिंह:- सहकुटुंब बाहेर जाण्याचा बेत आखाल. शेअर्सच्या कामातून लाभ संभवतो. धाडसाने कामे हाती घ्याल. मुलांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न करावा.

कन्या:- जोडीदाराची कलेच्या क्षेत्रात प्रगती होईल. आकर्षणाला बळी पडू नका. प्रेमसौख्याला बहर येईल. उत्तम गृहिणीपदाचा मान मिळेल. जोडीदाराचा लाडिक हट्ट पुरवाल.

तूळ:- नोकरांचे सुख चांगले राहील. दिवस काहीसा आळसात जाईल. लोकोपवादाकडे दुर्लक्ष करावे. नातेवाईकांची मदत घेता येईल. व्यसनाच्या आहारी जाऊ नका.

वृश्चिक:- कलेसाठी वेळ काढता येईल. गप्पा-गोष्टींची आवड पूर्ण कराल. जुगारातून लाभ संभवतो. निसर्ग सौंदर्यात रमून जाल. छंद जोपासायला वेळ काढता येईल.

धनू:- कौटुंबिक काळजी लागून राहील. प्रवासात काहीसा त्रास संभवतो. कामाची लगबग राहील. सारासार विचार करूनच निर्णय घ्यावा. उष्णतेचे विकार जाणवतील.

मकर:- सामाजिक वादात अडकू नका. धार्मिक कामात सहभाग घ्याल. दूरच्या प्रवासात काळजी घ्यावी. कर्ज प्रकरणात सध्या अडकू नका. गैरसमजुतीतून वाद वाढू शकतो.

कुंभ:- कफाचा त्रास जाणवेल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. मदत करतांना मागे-पुढे पाहू नका. निसर्गाच्या सानिध्यात रममाण व्हाल. जवळचा प्रवास घडेल.

मीन:- सर्वांशी लाघवीपणे बोलाल. प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्याल. बौद्धिक चलाखी दाखवाल. शांत व विचारी निर्णय घ्याल. तुमच्या व्यक्तिमत्वाची उत्तम छाप पडेल.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maghi purnima 2025 on 11 february mesh to meen do these thing as per rashi read horoscope in marathi asp