Bhagvat Ekadashi Astrology: हिंदू धर्मीयांमध्ये एकादशीच्या तिथीला अधिक महत्त्व असते. येत्या महाशिवरात्रीच्या आधी माघ महिन्यातील एकादशीची तिथी जुळून येत आहे. विशेष म्हणजे याच दिवशी ग्रहांचा राजकुमार म्हणून ओळख असलेला बुध ग्रह महागोचर करणार आहे. भागवत एकादशी किंवा विजया एकादशी या नावाने ही तिथी ओळखली जाते. उदय तिथीच्या वेळेनुसार खरंतर ही एकादशी कोणत्या दिवशी साजरी केली जाणार आहे याविषयी संभ्रम आहे. कारण विजया एकादशी ६ मार्चला सकाळी ६ वाजून ३१ मिनिटांनी सुरु होणार आहे तर तिथी समाप्ती ही दुसऱ्या दिवशी म्हणजेच ७ मार्चला सकाळी ४ वाजून १२ मिनिटांनी असणार आहे. तिथीतील अधिक कालावधी हा ६ मार्चलाच असल्याने पंचांगानुसार ६ मार्चला एकादशीची पूजा व उपवास केला जाईल. तर दुसऱ्या दिवशी एकादशीच्या तिथीतच ७ मार्चला बुधाचे मीन राशीत गोचर होणार आहे. या शुभ योगायोगामुळे काही राशींना सोन्याचे दिवस जगता येण्याची चिन्हे आहेत.या राशींमध्ये तुमचाही समावेश आहे का पाहूया..

मेष रास (Aries Rashi Bhavishya)

मेष राशीच्या कुंडलीत मीन राशीतील बुधाचा प्रभाव शुभ असणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रात बुध हा बुद्धी, चातुर्य, धन- वैभव व समृद्धीचा कारक मानला जातो.त्यामुळे या काळात तुमच्या बुद्धीच्या बळावर तुम्ही प्रचंड मोठी धनप्राप्ती करू शकणार आहात. ७ मार्च नंतर पुढील ७ दिवसांचा कालावधी तर आपल्यासाठी अत्यंत शुभ असणार आहे. व्यवसायात गुंतवणूक करण्याची संधी येऊ शकते. तुम्हाला थोडा अभ्यासपूर्ण निर्णय घेतल्यास मोठा लाभ होऊ शकतो. आरोग्य सुधारेल. आई वडिलांकडून प्रेमाच्या रूपात भेटवस्तू मिळू शकते.

मिथुन रास (Gemini Rashi Bhavishya)

मिथुन राशीला बुध ग्रहाच्या प्रभावाने समाजात मान- सन्मान प्राप्त होऊ शकतो. येणारा प्रत्येक दिवस तुम्हाला धनलाभ मिळवून देऊ शकतो. गुंतवणूक फायद्याची ठरेल. या कालावधीत शेअर बाजारात सुद्धा नफा संभवतो. पती- पत्नीच्या नात्यात गोडवा येईल. कमी अंतरावर का होईना पण प्रवास आपल्या भाग्यात संभवतो. भावंडांची साथ लाभेल. तुम्हाला या कालावधीत अनेकांना मदत करण्याचा योग येऊ शकतो.

सिंह रास (Leo Rashi Bhavishya)

बुध ग्रहाचे महागोचर आपल्या राशीसाठी लाभदायक असणार आहे. याचे एक महत्त्वाचे कारण आपल्या राशीचे स्वामित्व बुधाकडे आहे त्यामुळे कितीही संकटे आली तरी आपली नौका बुध ग्रह नेटाने पुढे घेऊन जात असतो. अडकून पडलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. जुने वाद उकरून काढू नका. तुम्हाला आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. तुमच्या नशिबात वाणीच्या बळावर धनलाभ संभवतो आहे. अत्यंत काळजीपूर्वक शब्द वापरा. कलाविश्वात आपल्याला नाव सिद्ध करण्याची संधी मिळू शकते.

हे ही वाचा<< ३ मार्च पंचांग: गजानन महाराज प्रकटदिनी मेष ते मीनपैकी कुणाचे नशीब उजळणार? तन- मन- धनाची स्थिती कशी असेल? 

कन्या रास (Virgo Rashi Bhavishya)

आर्थिक बाजूने भरभक्कम होण्याची संधी घेऊन आलेले असे हे बुधाचे महागोचर असणार आहे. कामाच्या ठिकाणी पदोन्नती व पगारवाढीचा योग आहे. आर्थिक लाभ होण्यासाठी तुम्हाला स्वतःची बाजू सिद्ध करण्यासह शब्दांच्या माध्यमातून मांडणे सुद्धा महत्त्वाचे आहे. वैवाहिक आयुष्यात मागील काळात आलेला दुरावा एखाद्या लहानश्या प्रसंगामुळे दूर होऊ शकतो. कौटुंबिक सुखामुळे तुमची मानसिक शांतता पुन्हा मिळू शकते.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)