देशभरात महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या दिवशी भक्त आपापल्या परीने भगवान शंकराची पूजा करतात. यावेळी १ मार्च रोजी महाशिवरात्रीचा उत्सव होणार आहे. त्याच वेळी या दिवशी ग्रहांचा मोठा संयोग होणार आहे. या दिवशी चंद्र, शनि, शुक्र, बुध आणि मंगळ हे शनिदेवाच्या मकर राशीत विराजमान असतील. दुसरीकडे, ग्रहांचा राजा सूर्य आणि देवांचा गुरू, कुंभ राशीमध्ये स्थित असेल. ग्रहांच्या या विशेष संयोगाचा सर्व राशींवर प्रभाव पडेल. पण अशा चार राशी आहेत ज्यांवर भोलेनाथांची विशेष कृपा असणार आहे. चला जाणून घेऊया या कोणत्या राशी आहेत.
मेष: दशम भावात ग्रहांचा हा विशेष संयोग तयार होईल. यावेळी तुमच्यावर भगवान शंकराची विशेष कृपा असेल. तुमची आर्थिक बाजू मजबूत असेल. तसेच आपण व्यवसायात चांगले पैसे कमवू शकता. रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. लाल चंदन आणि लाल फुले अर्पण करून भगवान शंकराची पूजा करावी.
वृषभ: तुमच्या नवव्या स्थानी म्हणजेच भाग्य स्थानात तुमच्या ग्रहांचा विशेष संयोग होईल. त्यामुळे यावेळी तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. तसेच कौटुंबिक जीवन गोड होईल. परदेशातून पैसे मिळू शकतात. व्यवसायात अचानक फायदा होऊ शकतो. महाशिवरात्रीला उसाचा रस आणि दुधाने रुद्राभिषेक करून भगवान शंकराची पूजा करावी. असे केल्याने भगवान शिव तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतील.
तूळ: तुमच्या राशीच्या चतुर्थ स्थानात योग असणार आहे. ज्याला आनंद आणि आईचं स्थान म्हणतात. यावेळी तुम्हाला भौतिक सुख मिळेल. तसेच तुम्ही कुठेही प्रवास करू शकता. कौटुंबिक जीवनात आनंद राहील. तुम्हाला नवीन नोकरी मिळू शकते. कामाच्या ठिकाणी चांगली कामगिरी करू शकाल. जी तुमच्या कामाचं कौतुक होईल. भोलेनाथाचा रुद्राभिषेक मध आणि अत्तराने करावा.
Magh Amavasya 2022: माघ अमावस्येला दोन विशेष योग, जाणून घ्या तिथी आणि शुभ मुहूर्त
मकर: तुमच्याच राशीत पाच ग्रहांचा उत्तम संयोग होणार आहे. त्यामुळे तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. किंवा तुम्हाला बढती मिळू शकते. पण वैवाहिक जीवन आणि प्रेम जीवनात काही तणाव असू शकतो. यासाठी तुम्ही काळजी घेतली पाहिजे. या काळात वैचारिक मतभेद होऊ शकतात. भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी त्यांच्या दुधात काळे तीळ टाकून रुद्राभिषेक करावा.