Maha Shivratri (Mahashivratri) 2022: यावर्षी मंगळवार, १ मार्च रोजी महाशिवरात्री उत्सव साजरा होणार आहे. या दिवशी भोलेनाथाच्या मंदिरात भक्तांची गर्दी होते आणि लोक भगवान शंकराला विविध वस्तू अर्पण करतात. पण तुम्हाला माहित आहे का की महादेवाची पूजा करताना काही गोष्टींचा वापर करू नये तर काही गोष्टी आवर्जून कराव्यात. जाणून घेऊया भोलेनाथाची पूजा करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात.

अशा प्रकारे करा प्रदक्षिणा

भगवान शंकराची अर्ध प्रदक्षिणा केली जाते. लक्षात ठेवा शिवलिंगाच्या डाव्या बाजूने प्रदक्षिणा सुरू करावी आणि भगवंताला अर्पण केलेले पाणी जिथून बाहेर पडते तिथून परत यावे. त्याला कधीही ओलांडू नये. नंतर विरुद्ध दिशेने जाऊन पाण्याच्या दुसऱ्या टोकाला येऊन प्रदक्षिणा पूर्ण करा.

(हे ही वाचा: Maha Shivratri 2022: महाशिवरात्रीला बनवा मसालेदार उपवासाच्या पिठाची टिक्की! जाणून घ्या रेसिपी)

प्रसाद ठेवू नका

शिवलिंगाला प्रसाद अर्पण करताना लक्षात ठेवा की शिवलिंगावर प्रसाद ठेवू नका. असे मानले जाते की शिवलिंगावर ठेवलेला नैवेद्य स्वीकारला जात नाही, त्यामुळे पूजा अपूर्ण मानली जाते.

(हे ही वाचा: Shani Dev: ३० वर्षांनंतर कुंभ राशीत शनि करेल प्रवेश, ‘या’ राशीच्या लोकांना मिळेल साडेसातीपासून मुक्ती)

शंख वापरण्यास आहे मनाई

असे मानले जाते की भगवान शंकराच्या पूजेमध्ये शंखाचा वापर शुभ मानला जात नाही. यामागील कथा शंखचूड नावाच्या राक्षसाशी संबंधित आहे ज्याला शंकर देवाने मारले होते. शंख हा त्याच राक्षसाचा भाग मानला जातो. त्यामुळे त्याचा उपयोग पूजेत करू नका.

(हे ही वाचा: Dream Interpretation: स्वप्नात अग्नी दिसणे शुभ की अशुभ? जाणून घ्या काय सांगतं स्वप्नशास्त्र)

फक्त संपूर्ण अक्षताचा वापरा

शिवाच्या पूजेत अक्षताचा वापर नक्कीच केला जातो, पण अक्षता मोडलेल्या नकोत हे ध्यानात ठेवा. तुटलेला तांदूळ अपूर्ण आणि अशुद्ध असल्याने तो शिवाला अर्पण करत नाही, असे शास्त्र सांगते.

(हे ही वाचा: Dream Interpretation: स्वप्नात पैसे आणि मंदिर पाहणे शुभ की अशुभ ? जाणून घ्या काय सांगत स्वप्न शास्त्र)

तुळशीचा वापर करण्यास आहे मनाई

शिवपूजेत तुळशीचा वापर कधीच केला जात नाही. पौराणिक मान्यतेनुसार, भगवान शिवाने वृंदाचा पती जालंधरचा वध केला, जालंधरचे रूप घेऊन भगवान विष्णूने वृंदाचा पतिव्रता धर्म मोडला. हे कळल्यावर वृंदाने आत्मदहन केले तिथे तुळशीचे रोप उगवले. वृंदा शिवपूजेत तुळशीचा सहभाग नसल्याबद्दल बोलली होती. तेव्हापासून भगवान शंकराला तुळशीची पाने अर्पण केली जात नाहीत.

(येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.)

Story img Loader