Maha shivratri 2025 : फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री साजरी केली जाते. या दिवशी महाशिवरात्री २६ फेब्रुवारी २०२५ रोजी साजरी केली जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव ची पूजा आराधना केली जाते. तसेच जलाभिषेक केला जातो.
ज्योतिषशास्त्रानुसार, या वर्षी महाशिवरात्री खूप खास मानली जात आहे. कारण मीन राशीमध्ये बुध, सूर्य आणि शनिची युती निर्माण होऊन त्रिग्रही , शश आणि बुधादित्य योग निर्माण होत आहे. तसेच मीन राशीमध्ये मालव्यय आणि शुक्र राहुची युती निर्माण होत आहे. तसेच सर्वार्थ सिद्धी आणि शिव योग निर्माण होत आहे. जाणून घेऊ या या सर्व राशींविषयी.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मेष राशी (Mesh Zodiac)

मेष राशीच्या लोकांसाठी महाशिवरात्रीचा दिवस अत्यंत खास असणार आहे. या राशीच्या लोकांना अचानक धनलाभ मिळू शकतो. तसेच दीर्घकाळापासून अडकलेले कामे पूर्ण होतील. धन धान्यामध्ये वाढ होऊ शकते. जीवनात सुख शांती लाभू शकते. कुटुंबाबरोबर चांगला वेळ घालवाल.

जीवनात आनंद येईल. तसेच अविवाहित लोकांना लग्नाचा योग जुळून येतील. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ अतिशय लाभदायक ठरू शकतो. शिवच्या कृपेने भरपूर यश मिळू शकते. नवीन नोकरीच्या अनेक संधी मिळू शकतात. समाजात मान सन्मान मिळू शकतो. तसेच आरोग्य उत्तम राहीन.

तुळ राशी (Tula Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी महाशिवरात्री अत्यंत खास होणार आहे. या राशीच्या लोकांना नशीबाची चांगली साथ मिळू शकते ज्यामुळे प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते तसेच धन लाभ मिळू शकतो. आई वडील, गुरू, मेंटरचे सहकार्य लाभेन ज्यामुळे हे लोक त्यांचे ध्येय प्राप्त करू शकतात.

दीर्घ काळापासून सामना करत असलेल्या आरोग्याचा समस्या दूर होतील. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत उघडू शकतात. तसेच पैशांची समस्या दूर होईल. प्रेमी त्यांच्या जोडीदारांसमोर प्रेम आणि भावना व्यक्त करू शकतील. तसेच आईवडिलांना अपत्य सुख प्राप्त होऊ शकते.

कुंभ राशी (Kumbha Zodiac)

कुंभ राशीच्या लोकांसाठी ही महाशिवरात्री अत्यंत खास होणार आहे. कारण या राशीच्या लग्नभावात बुध, शनि आणि सूर्याची युती निर्माण होणार आहे ज्यामुळे त्रिग्रही, बुधादित्य तसेच शश राजयोग निर्मान होईल. तसेच मालव्यव राजयोग दुसऱ्या भावात निर्माण होत आहे. अशात या राशीच्या लोकांना शिव कृपेने नोकरी व्यवसायात अपार यश मिळू शकते.
उसने दिलेले पैसे परत मिळू शकतात. तसेच जीवनात सुरू असलेल्या समस्या दूर होऊ शकतात. नोकरीच्या ठिकाणी अडचणी येत असेल किंवा सहकाऱ्यांबरोबर वाद असतील तर ते समाप्त होईल. जीवनात सुख शांतीचा लाभ मिळू शकतो. नवीन नोकरीची संधी मिळू शकते. व्यवसायामध्ये तयार केलेली रणनीती किंवा योजना फायद्याची ठरू शकते.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)