देशभरात दरवर्षी महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करतात. यावेळी १ मार्च म्हणजेच मंगळवारी महाशिवरात्री उत्सव साजरा केला जाणार आहे. सकाळपासूनच शिवमंदिरांमध्ये भाविकांच्या लांबच लांब रांगा लागतात. तसेच लोक शिवलिंगाला वेगवेगळ्या वस्तूंनी अभिषेक करतात आणि भोलेनाथाचा आशीर्वाद घेतात. भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी त्यांना काय अर्पण करावे ते जाणून घेऊया, जेणेकरून त्यांची कृपा तुमच्यावर सदैव राहील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
  • कच्चे दूध: या दिवशी शिवलिंगावर दूध अर्पण करणे विशेष फलदायी असल्याचे सांगितले जाते. विष्णु पुराणानुसार, समुद्रमंथनाच्या वेळी शिवाने सर्व विष प्राशन केले होते, तेव्हा देवतांनी त्यांच्यावर दुधाचा अभिषेक केला होता, ज्यामुळे शिवावरील विषाचा प्रभाव कमी झाला आणि तेव्हापासून शिवलिंगाला दूध अर्पण करण्यास सुरुवात झाली. असे मानले जाते की शिवलिंगावर दूध अर्पण केल्याने आरोग्य प्राप्त होते.
  • चंदनाचा तिलक लावावा : महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाला चंदनाचा तिलक लावावा. चंदन हे अतिशय पवित्र मानले जाते आणि ते शिवशंकरांना अतिशय प्रिय आहे. असे केल्याने समाजात प्रसिद्धी आणि मान-सन्मान मिळतो, असे मानले जाते.
  • अत्तर आणि हळद लावावी: भगवान शंकराला हळदही अर्पण करावी. त्याचबरोबर अत्तरानेही भगवान शिव प्रसन्न होतात. भोलेनाथांना अत्तर अर्पण केल्याने अध्यात्माकडे कल वाढतो, असे मानले जाते.
  • धोतरा आणि बेलपत्र अर्पण करा: धोतरा आणि बेलची पाने देखील भगवान शिवाच्या पूजेमध्ये वापरली जातात. महाशिवरात्रीला शिवलिंगावर अर्पण केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि सर्व संकटांपासून मुक्ती मिळते असे म्हणतात.

पंचग्रही योगामुळे बदलेल देशाची दिशा आणि दशा, काय आहेत ज्योतिषशास्त्रातील संकेत? जाणून घ्या

  • केसर आणि साखर अर्पण करा: महाशिवरात्रीला शिवलिंगावर साखर अर्पण केली जाते. यामुळे जीवनात कीर्ती, वैभव प्राप्त होतं. तसेच या दिवशी भगवान शंकराला लाल केसर तिलक केल्याने मांगलिक दोष समाप्त होतो. वैवाहिक जीवन आनंदी आहे. वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात. इच्छित जीवनसाथी मिळून लवकरच विवाहाची शक्यता निर्माण होते.
  • तीळ आणि उसाचा रस अर्पण करा: शिवलिंगावर तीळ अर्पण केल्याने पापांसह सर्व रोगांपासून मुक्ती मिळते. तसेच उसाचा रस अर्पण केल्याने कौटुंबिक सुख प्राप्त होते आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम टिकून राहते.
  • तांदूळ आणि गहू अर्पण करा: शिवलिंगावर गहू अर्पण केल्याने भोलेनाथ प्रसन्न होतात आणि त्यांच्या आशीर्वादाने कुटुंबात वृद्धी होते. संतान प्राप्तीत योग्य फळ मिळतं आणि मूल आज्ञाधारक बनते. तसेच, तांदूळ अर्पण केल्याने धन आणि सुख-समृद्धी मिळते.
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maha shivratri pooja vidhi and things rmt
Show comments