Mahalakshmi Yog Lucky Zoziac: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचे सेनापती मंगळ या वेळी मिथुन राशीमध्ये विराजमान आहे. पण ज्योतिषशास्त्रानुसार ३ एप्रिलला मंगळ देव कर्क राशीमध्ये प्रवेश करणार आहे. मंगळ राशीमध्ये जून पर्यंत राहणार या दरम्यान विविध ग्रहांची युती निर्माण होईल.
५ एप्रिल रोजी चंद्र कर्क राशीमध्ये प्रवेश करणार आहे. ज्यामुळे मंगळ चंद्रांची युती निर्माण होऊन महालक्ष्मी राजयोग निर्माण होईल. हा शुभ योग काही राशीच्या लोकांसाठी अत्यंत लाभदायक ठरू शकतो. अशात या कोणत्या राशी आहेत ज्यामुळे महालक्ष्मी राजयोगमुळे सर्वात जास्त लाभ प्राप्त होऊ शकतो.
कन्या राशी
कन्या राशीच्या लग्न भावात महालक्ष्मी राजयोग निर्माण होत आहे. अशात या राशीच्या लोकांना अपार यश मिळू शकते. मंगळ तिसऱ्या आणि आठव्या स्थानावर स्वामी होऊन लाभ स्थानावर गोचर करणार आहे, ज्यामुळे अप्रत्याशित धनलाभ मिळू शकतो.
करिअरमध्ये खूप प्रगती होईल. अडकलेल्या संधी प्राप्त करण्यात यश मिळेल. आर्थिक इच्छा पूर्ण होईल. व्यवसायात चांगला नफा मिळेल. मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल.
तुळ राशी
तुळ राशीच्या लोकांसाठी मंगळ आणि चंद्राची युती १० व्या भावात महालक्ष्मी राजयोग निर्माण करणार आहे. कुंडलीच्या दहावा भाव करिअर आणि यशाचा भाव असतो. या योगच्या प्रभावाने करिअरमध्ये मोठे यश मिळू शकते. या दरम्यान अडकलेले कामे पूर्ण होऊ शकतात.
नोकरी करणाऱ्या लोकांना पगारात वृद्धी आणि पदोन्नतीचा लाभ मिळू शकतो. तसेच नोकरी बदलण्यास इच्छू असलेल्या लोकांना चांगली संधी मिळू शकते. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य लाभेन. कौटुंबिक जीवन सुखद राहीन.
मकर राशी
मकर राशीच्या सातव्या भावात चंद्र आणि मंगळची युती निर्माण झाल्याने या राशीच्या लोकांना अनेक शुभ फळ प्राप्त होऊ सकतात. कुंडलीच्या सातव्या भावात विवाह, जोडीदाराशी संबंधित आहे. त्यामुळे अविवाहित लोकांच्या विवाहाचे योग जुळून येतील.
वैवाहिक आयुष्यात प्रेम आणि समजूतदारपणा वाढेन. कामाच्या ठिकाणी कामाचे कौतुक केले जाईल. व्यवसायात चांगला नफा मिळेल. कुटुंबाबरोबर चांगला वेळ घालवण्याची संधी मिळू शकते.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)