Mahalaxmi rajyog: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह त्याच्या ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो. ज्योतिषशास्त्रात चंद्र हा असा ग्रह आहे जो सर्वात जलद एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. चंद्र एका राशीत अडीच दिवस उपस्थित असतो. चंद्राच्या जलद गतीने राशी परिवर्तन करण्याने त्याची कोणत्याना कोणत्या ग्रहाबरोबर युती निर्माण होते. ज्यामुळे शुभ किंवा अशुभ योग निर्माण होतात. २० नोव्हेंबर रोजी चंद्र कर्क राशीत प्रवेश करणार असून या राशीत आधीपासून मंगळ ग्रह उपस्थित आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा चंद्र आणि मंगळ एकाच राशीत येतात तेव्हा ‘महालक्ष्मी योग’ निर्माण होतो, हा योग खूप शुभ मानला जातो. या योगामुळे आर्थिक स्थिती मजबूत होण्यास मदत होते. या शुभ योगामुळे १२ राशींपैकी काही राशीच्या व्यक्तींना आयुष्यात सुख-समृद्धी प्राप्त होईल.
पंचांगानुसार, चंद्र २० नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजून ४६ मिनिटांनी कर्क राशीत प्रवेश करणार आहे.तो या राशीत २२ नोव्हेंबरपर्यंत विराजमान असणार आहे. महालक्ष्मी योगाच्या प्रभावाने काही राशीच्या व्यक्तींना प्रत्येक कामात यश मिळेल. त्यांच्या सुख-समृद्धीत वाढ होईल.
महालक्ष्मी योग करणार मालामाल
वृषभ
मंगळ आणि चंद्राची युती वृषभ राशीच्या लोकांसाठी खूप खास ठरेल. या काळात त्यांची आर्थिक स्थिती उत्तम राहून, कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. वैवाहिक जीवन सुखमय असेल. नव्या वस्तू खरेदी कराल. अविवाहितांची लग्ने जुळतील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींच्या मेहनतीचे कौतुक होईल. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील. नवीन नोकरी शोधणाऱ्यांना मनासारखी नोकरी मिळेल.
कर्क
कर्क राशीच्या व्यक्तींसाठी देखील मंगळ आणि चंद्राची युती खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. नव्या वस्तू खरेदी कराल. नोकरीत प्रमोशन मिळेल. मुलांकडून आनंदी वार्ता येतील. कुटुंबातही आनंदी आनंद असेल. स्पर्धा परीक्षेत यश मिळेल. तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील. करिअरमध्ये चांगली प्रगती होईल. नवे लोक, नवे छंद यांच्याशी जोडले जाल. शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम असेल.
हेही वाचा: २६ नोव्हेंबरपासून नुसती चांदी; शुक्र-गुरू निर्माण करणार षडाष्टक योग, ‘या’ तीन राशींचे चमकणार भाग्य
कन्या
मंगळ-चंद्राची युती कन्या राशीच्या व्यक्तींसाठी सकारात्मक बदल घडवून आणेल. या काळात तुम्हाला अनेक आकस्मिक धनलाभ होतील. प्रत्येक कामात कुटुंबीयांची साथ मिळेल. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. तीर्थक्षेत्रांना भेट द्याल. दूरचे प्रवासही घडतील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल.
(टीप – सदर लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)