Shani Dev, Vakri Shani Gochar 2022: शनिदेव मुख्यतः दर अडीच वर्षांनी आपली राशी बदलतात, परंतु काहीवेळा काही विशेष परिस्थितींमध्ये शनी याआधीही आपली राशी बदलतात. ज्योतिष शास्त्रानुसार, शनीने कुंभ राशी सोडून १२ जुलै २०२२ रोजी मकर राशीत प्रवेश केला आहे. पुढील ३ महिने ते विराजमान राहतील. मकर राशीतील त्यांच्या प्रतिगामीमुळे या तीन राशींच्या कुंडलीत महापुरुष राज योग तयार होईल. हा राजयोग अतिशय शुभ मानला जातो आणि या राशीच्या लोकांसाठी भाग्यवान असेल. तर जाणून घ्या या तीन राशींबद्दल ज्यांच्या आयुष्यात महापुरुष राज योग येईल.
मेष
मेष राशीच्या लोकांसाठी महापुरुष राजयोग अत्यंत शुभ राहील. या लोकांना अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नवीन नोकरीची ऑफर येऊ शकते. तसंच जर तुम्ही नोकरी करत असाल तर जुन्या नोकरीत बढती मिळू शकते. या काळात तुमचे उत्पन्न वाढू शकते त्यामुळे आर्थिक स्थिती देखील चांगली राहील.
( हे ही वाचा: Budh Gochar: १ ऑगस्टपासून ‘या’ राशींचे शुभ दिवस सुरू होतील; बुध ग्रहाचा वर्षाव होईल)
मिथुन
करिअर आणि व्यवसायात चांगले यश मिळेल . व्यवसायात जास्त पैसा मिळेल. नफा वाढेल. मान-प्रतिष्ठेत वाढ होईल. काही नवीन यश प्राप्त होईल. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. राजकारणाशी संबंधित लोकांना फायदा होईल. परदेशाशी संबंधित काम करणाऱ्यांना मोठा लाभ मिळण्याची शक्यता आहे. बऱ्याच दिवसापासून रखडेलली कामे पूर्ण होतील.
कन्या
कन्या राशीच्या लोकांसाठी हा उत्तम राजयोग चांगले दिवस घेऊन येईल. या राजयोगाच्या प्रभावामुळे या लोकांना अचानक पैसे मिळू शकतात. त्यांना प्रत्येक कामात यश मिळेल. त्यांची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे मार्गी लागतील. विशेषत: सरकारी क्षेत्राशी संबंधित कामांना वेग येईल. जे उमेदवार कोणत्याही परीक्षा-मुलाखतीला बसणार आहेत, त्यांना त्यात यश मिळेल. प्रवेशाचा विचार करणारे विद्यार्थी इच्छित संस्थेत प्रवेश घेऊ शकतात.