-उदयराज साने

Maharashtra Astrology Predictions: १ मे १९६० साली स्थापन झालेल्या महाराष्ट्र राज्याच्या धनु लग्नाच्या कुंडलीमध्ये गेल्या तीन वर्षात मोठी खळबळ उडालेली आहे. महाविकास आघाडीचे सरकार २८ नोव्हेंबर २०१९ रोजी स्थापन झाले आणि अडीच वर्षांनंतर ते सरकार कोसळले. त्यानंतर नवे मुख्यमंत्री म्हणून ३० जून २०२२ रोजी श्री एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली. या शपथविधी कुंडलीतील ‘रवी-गुरु’ या केंद्र योगामुळे या नवीन सरकारला कोणताही धोका राहिलेला नाही. नुकतेच शनीचे राश्यांतर होऊन शनी कुंभ राशीत आला आणि गुरु ही मीन राशीतून भ्रमण करत आहे. महाराष्ट्राची आर्थिक विस्कटलेली घडी सुधारण्याचा चंग नव्या सरकारने घेतला आहे. त्याला काही प्रमाणात यश देण्यासाठी हा मीने तील गुरु सज्ज आहे. म्हणूनच नुकतेच जे करार मुख्यमंत्र्यांनी, परदेशातील उद्योजकांशी केले त्यापासून त्याची सुरुवात निश्चितपणे होईल.

महाराष्ट्रातील आर्थिक उलाढाली

उद्योग क्षेत्रांना लागणारी वीज-पाणी-वाहतूक व्यवस्था सुधारणा करण्यासाठी हे नवे सरकार जोरदार प्रयत्न करेल. त्यात या सरकारला चांगले यश मिळेल, कारण यापुढील गुरु हा एप्रिल महिन्यात मेष राशीत येणार असून, महाराष्ट्राच्या कुंडलीतील रवी-बुध-शुक्रा वरून त्याचे भ्रमण होणार असल्याने राज्याला हे भ्रमण उपयुक्त ठरणार आहे. पण या गुरु भ्रमणाची शक्ती कमी करणारा दुसरा कुयोग म्हणजेच राहू-प्लूटोचा केंद्रयोग जून पासून सुरु होऊन थेट २८ नोवेंबर पर्यंत राहणार आहे. हा योग उद्योग क्षेत्राचं नुकसान करणार आहे. हया वर्षात महाराष्ट्रात अवकाळी पाऊस चांगलाच धुमाकूळ घालणार आहे. हवामान बदल सर्वत्र झाल्याने महाराष्ट्राला सुद्धा त्याचा फटका बसणार आहे.

jayant patil rahul narvekar
Video: “राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालावर सर्वोच्च न्यायालय अजून विचार करतंय”, जयंत पाटील यांची टोलेबाजी!
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
markadwadi villagers marathi news
मारकडवाडी ग्रामस्थांच्या शंकांचे निरसन करणे आवश्यक, रामदास आठवले यांची भूमिका
deputy chief minister validity loksatta
विश्लेषण : ‘उपमुख्यमंत्री’ असे घटनात्मक पदच नाही… मग शपथ घेणे कितपत योग्य? न्यायालय काय म्हणते?
bahujan vikas aghadi future in vasai virar after defeat all three candidates along with hitendra thakur
वसई-विरारमध्ये हितेंद्र ठाकूर यांच्या बविआचे भवितव्य काय?
Indian scientist Mahesh Galgalikar
भारतीय शास्त्रज्ञाचे अमेरिकन संरक्षण विभागाला अनोखे आरोग्य कवच!
swearing ceremony in Mumbai left many political workers across state despairing
यवतमाळ : मंत्रिमंडळातील समावेशाचा मुहूर्त हुकल्याने महायुतीत अस्वस्थता
delay in Maharashtra Chief Minister face announcement
अग्रलेख : विलंब-शोभा!

महाराष्ट्रात यंदा पाऊस कसा असणार?

नव्या वर्षात बुध हा अग्नी राशीत वक्री राहणार आहे, त्यामुळे उन्हाळा हा चांगलाच कडक राहणार असला, तरी त्याचसोबत अवकाळी पाऊसही जोरदार राहणार असल्याने पिकांची नासाडी होणार आहे. हा अवकाळी पाऊस नगर-सांगली–कोल्हापूर-कोकण-विदर्भ-मराठवाडा या प्रदेशांना चांगलाच फटका देणारा आहे. एकीकडे पाऊस चांगलीच ओढ देणार असून, दुसरीकडे हा अवकाळी पाऊस मोठे नुकसान करणार असल्याचे दिसून येईल. शेयर बाजार जून ते नोव्हेंबर अखेरपर्यंत सातत्याने वेगवेगळ्या बातम्यांचा प्रभाव पडून सतत अस्थिर राहील.

२८ नोव्हेंबरला गोचर राहू हा मीन राशीत प्रवेश करतो तेव्हापासून, राजकीय स्तरावर विरोधी पक्षांना तापदायक ग्रहमान राहणार आहे. हा बदलणारा राहू उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला जसा तापदायक आहे, तसाच काँग्रेस आणि भाजपाला सुद्धा आहे. मनसे व राष्ट्रवादी या पक्षांना हा राहू चांगला येत आहे पण कुंभेचा शनि त्यांना तापदायक आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला हा राहू मध्यम फलदायी आहे. त्यामुळे आपला पक्ष जोमानं वाढवण्यात मुख्यमंत्र्यांना चांगलेच यश येणार आहे.

आगामी काळात महाराष्ट्रात पालिका- महानगरपालिका यांच्या निवडणुका होत आहेत. यात त्यांच्या पक्षाला आणखी मेहनत घेतल्यास चांगले यश मिळू शकते. महाराष्ट्राची राजकीय स्थिती अत्यंत गुंतागुंतीची झालेली आहे. महाविकास आघाडीत तीन पक्ष असल्याने त्यांना बंडखोरीला सामोरे जावे लागणार आहे. तसेच भाजपा व शिंदे गट असे पक्ष मैदानात राहिल्याने चौरंगी लढत होऊ शकते. आता सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच अस्थिर झाल्याने व जनतेचा विश्वास अनेक पक्षांनी गमावल्यामुळे जशी निवडणूक जवळ येईल अथवा त्यापूर्वीसुद्धा कावळ्याच्या छत्रीप्रमाणे अनेक नवे पक्ष व अपक्ष असे मैदानात आल्याचे दिसून येईल. महाराष्ट्रातील दुभंगलेले लोकमत त्याला कारणीभूत ठरेल.

महाराष्ट्रातील सध्याची ग्रहांची स्थिती म्हणजेच तृतीय स्थानात कुंभ राशीत आलेला शनि, धनस्थानातील मकरेचा प्लुटो, २८ नोव्हेंबर रोजी बदलणारा मीन राशीतील राहू, मीन राशीत आलेला नेपचून आणि २० एप्रिल ला मेष राशीत येणार गुरु ही ग्रह स्थिती लक्षात घेतली तर अस्थिरता जास्तच असल्याचं दिसून येतं. २०२३ च्या शेवटास व २०२४ सुरुवातीचा असे दोन महिने राहू- नेपच्यून यांचा युती योग महाराष्ट्राला अत्यंत तापदायक जाणार आहे. दुभंगलेले जनमत, टोकाची राजकीय कटूता, लोकशिक्षणात फारच कमी पडलेले नेते गण हे सर्व ग्रहांच्या अनुषंगाने पाहता, महाराष्ट्राचा वेगळ्याच दिशेने प्रवास सुरू असून,२०२४ च्या मध्यानंतर वेगळेच चित्र आपणासमोर आणखी नव्याने स्पष्ट होईल.

महाराष्ट्रातील पालिका व महानगरपालिकांच्या निवडणुकांचं भविष्य

महाराष्ट्रातील पालिकांच्या आणि महानगरपालिकांच्या निवडणुका हया एका वर्षापेक्षा जास्त काळ पुढे ढकलता येणार नाहीत, असा सुप्रीम कोर्टाचा आदेश असल्याने, आता मात्र या निवडणुका एप्रिल-मे या संभाव्य कालखंडात होणार असल्याने, आपण पण ज्योतिष शास्त्राच्या आधाराने या पक्षांच्या कुंडल्या बघणार आहोत. मुंबई महानगर पालिकेसाठी २२७ जागा आहेत, तर पुणे महानगर पालिकेसाठी १७० जागा आहेत. या सर्व लढती चौरंगी अथवा पंचरंगी होऊ शकतात, कारण महाविकास आघाडीत तीन पक्ष गेले आहेत. त्यात ठाकरे गट, काँग्रेस राष्ट्रवादी व काँग्रेस अशी विभागणी तर भाजपा व शिंदे गट असे प्रमुख पक्ष मैदानात आहेत. महाविकास आघाडीचे नेतेगण निवडणूक एकत्रित लढवू असे जरी म्हणत असले, तरी कुंभ राशीत शनीचे आगमन झाल्याने परिस्थितीत आमुलाग्र परिवर्तन झाले आहे. या निवडणुका जर १५ एप्रिल नंतर झाल्या, तर सत्तेचा कारक ग्रह रवी हा मेष राशीत येईल . काँग्रेसच्या कुंडलित त्याचे भ्रमण त्यांच्या मूळ कुंडलीतील चंद्र-शनी वरून होणार असल्याने, महाविकास आघाडीत पक्षाला मागे खेचण्याचा प्रयत्न उर्वरित दोन पक्ष करणार असल्याने बंडखोरीला मोठाच वाव राहणार आहे.

हे ही वाचा<< PM Modi Astrology: नरेंद्र मोदी यांना २०२३ मध्ये किती व काय अडचणी येणार? जाणून घ्या पंतप्रधानांचं राशीभविष्य

राष्ट्रवादी काँग्रेसचं भविष्य

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कुंडलित १५ एप्रिल नंतर मेष रवीचे भ्रमण त्यांच्या मूळ कुंडलीतील गुरु-शनी वरून होणार असल्याने पक्षातील इच्छुकांना थोपवणे त्यांनाही शक्य होणार नाही. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या कुंडलीत हे मेष रवीचे भ्रमण प्लूटोच्या केंद्रातून आणि मूळच्या रवीला हा रवी आठवा राहणार असल्याने, या तीनही पक्षाचे उमेदवारीवरून चांगलेच जुंपणार असून, बंडखोरी ही निश्चितपणे होऊ शकते. मनसेला हे मेष रवीचे भ्रमण चांगले असल्याने, पालिका निवडणुकात त्यांना यावेळी जोरदार संधी मिळू शकते.

हे ही वाचा<< ‘भारत जोडो’ नंतरही राहुल गांधी का ठरतील अपयशी राजपुत्र? ज्योतिषतज्ज्ञांनी मांडली कुंडली..

भाजपचं भविष्य

भाजपाच्या कुंडलीत सुद्धा हे मेष रविचे भ्रमण संपूर्ण चांगले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला रवीचे भ्रमण संमिश्र आहे. कुंभ राशीतील शनी भाजपा व मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेला अनुकूल असून, हा कुंभेचा शनी मनसेला मात्र तापदायक आहे. महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना कुंभ राशीतील शनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव सेनेला तापदायक असल्याने या निवडणुका लढवण्यासाठी जो एकोपा असायला हवा, तसा एकोपा मिळणार नसल्याने उमेदवारांची त्यांच्या स्वतःच्या वैयक्तिक कामावरच मदार असणार आहे. प्रत्यक्ष तारखा जाहीर झाल्यानंतर आपण त्यांची सखोल विश्लेषण फलज्योतिष शास्त्राच्या आधाराने बघणार आहोतच. याच शास्त्राच्या आधाराने मुख्य ग्रह रवी- शनि यांच्यावरूनच त्याचा अंदाज बांधायचा झाल्यास महाविकास आघाडीला निवडणुका सोप्या नाहीत. तर भाजपा आणि शिंदे गटाला अधिक प्रयत्न करणे क्रमप्राप्त ठरणार आहे. मनसेला काही अंशी या निवडणुकीत ग्रहांचं बळ मिळत असल्याचं दिसून येतं.

Story img Loader