Mahashivratri 2022: येत्या १ मार्चला महाशिवरात्री आहे. महाशिवरात्रीला रुद्राक्ष धारण करणे शुभ मानले जाते. रुद्राक्षाचा थेट संबंध महादेवाशी आहे आणि याला फारच चमत्कारिक मानले जाते. महादेवच्या मंत्रांचा जप करण्यासाठीही रुद्राक्षांच्या माळेचा वापर केला जातो. रुद्राक्ष धारण केल्याने संकटे, दुःख तसेच ग्रह दोष दूर होतात आणि आयुष्यात सुख, समृद्धी, धनसंपदा प्राप्त करता येते अशी मान्यता आहे. परंतु रुद्राक्ष धारण करण्याचे काही नियम देखील आहेत. या महाशिवरात्रीच्या निमित्ताने आपण जाणून घेऊया की रुद्राक्षाची उत्पत्ती कशी झाली आणि त्याचे प्रकार कोणते आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रुद्राक्षाची उत्पत्ती

पौराणिक कथांनुसार, एकदा भगवान शिव हजार वर्षे ध्यानात लीन झाले होते. एक दिवस अचानक जेव्हा त्यांचे डोळे उघडले तेव्हा त्यातून अश्रूचा एक थेंब पृथ्वीवर पडला. त्यातूनच रुद्राक्षाची उत्पत्ती झाली. शिवाची आज्ञा आणि मानव कल्याणासाठी रुद्राक्षाची झाडे संपूर्ण पृथ्वीवर पसरली. यामुळेच रुद्राक्ष हा चमत्कारिक आणि गुणकारी मानला जातो.

रुद्राक्षाचे प्रकार

रुद्राक्ष एक ते २१ मुखांपर्यंत आढळतो. यापैकी ११ मुखी रुद्राक्ष हे सर्वात सर्वसिद्ध रुद्राक्ष मानले जातात. चला जाणून घेऊया रुद्राक्षाच्या काही प्रमुख प्रकारांबद्दल.

  • एक मुखी रुद्राक्ष – शिव स्वरूप
  • दोन मुखी रुद्राक्ष – अर्धनारीश्वर रूप
  • तीन मुखी रुद्राक्ष – अग्नि आणि तेजस्वी रूप
  • चार मुखी रुद्राक्ष – ब्रह्मस्वरूप
  • पाच मुखी रुद्राक्ष – कालाग्नी स्वरूप
  • सहा मुखी रुद्राक्ष – भगवान कार्तिकेय स्वरूप
  • सात मुखी रुद्राक्ष – सप्तऋषींचे रूप
  • आठ मुखी रुद्राक्ष – आठ देवींचे रूप
  • नऊ मुखी रुद्राक्ष – धन, संपत्ती, कीर्ती, कीर्ती यासाठी हे धारण करा
  • दहा मुखी रुद्राक्ष – नकारात्मक ऊर्जांपासून संरक्षणासाठी
  • ११ मुखी रुद्राक्ष- आत्मविश्वास वाढवण्यासाठी, सर्वसिद्ध रुद्राक्ष
  • १२ मुखी रुद्राक्ष – यशासाठी
  • १३ मुखी रुद्राक्ष – सुखी वैवाहिक जीवनासाठी

(येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahashivaratri 2022 know the story types and benefits of the origin of rudraksha pvp