हिंदू धर्मात अध्यात्माला अनन्यसाधारण महत्त्व आहे. यामध्ये लोक देवावरची श्रद्धा वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त करतात. तथापि, अध्यात्म फक्त धार्मिक बाबींशी जोडलेले नसून याला वैज्ञानिक जोडसुद्धा आहे. उदाहरणच द्यायचे झाले, तर आपण चंदनाचा टिळा कपाळावर लावतो त्यामुळे आपलं डोकं शांत राहतं. तसेच, मंदिरात जळणाऱ्या दिव्यामुळे आजूबाजूचे कीटक नष्ट होतात. यामध्ये रुद्राक्षाचा देखील समावेश होतो. सामान्यतः, मन शांत ठेवण्यासाठी अनेकजण रुद्राक्ष धारण करतात. परंतु रुद्राक्ष धारण करण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहित आहे का?
पुराणानुसार, रुद्राक्ष हा भगवान शिवाचा अंश असल्याने ते अत्यंत शुद्ध आहे. दुसरीकडे, मानसिक शांतीसाठी आणि रागावर मात करण्यासाठी रुद्राक्ष धारण करावे असे विज्ञानात म्हटले जाते. पण रुद्राक्ष धारण करण्यासोबतच ते पवित्र ठेवणेही खूप गरजेचे आहे. मात्र, जीवनातील काही कार्य करताना रुद्राक्ष धारण केले असल्यास ते अपवित्र होते आणि त्याचे वाईट परिणामही मिळू लागतात. चला तर मग जाणून घेऊया, ‘रुद्राक्ष’ कोणी आणि कधी धारण करू नये.
धूम्रपान आणि मांसाहार करताना रुद्राक्ष धारण करू नये
धूम्रपान, मद्यपान यासारखी व्यसने करताना तसेच मांसाहार करताना चुकूनही रुद्राक्ष धारण करू नये. अन्यथा ते अपवित्र होते आणि रुद्राक्षाचा फायदा होण्याऐवजी तुम्हाला नुकसान होऊ शकते.
झोपताना रुद्राक्ष घालू नये
धार्मिक मान्यतांनुसार, झोपल्यावर शरीर अशुद्ध होते. याचा परिणाम रुद्राक्षाच्या शुद्धतेवर पडतो. म्हणूनच झोपण्यापूर्वी रुद्राक्ष काढून ठेवणे फायद्याचे ठरते. तसेच झोपताना रुद्राक्ष उशीच्या खाली ठेवल्याने मन शांत राहते आणि वाईट स्वप्नसुद्धा पडत नाहीत.
शिवलिंगावर बेलपत्र का अर्पण केले जाते माहित आहे का? जाणून घ्या कोणता मार्ग आहे योग्य
रुद्राक्ष अंत्ययात्रेपासून दूर ठेवा
माहितीच्या अभावामुळे, बरेच लोक रुद्राक्ष धारण करून अंत्यविधी किंवा स्मशानभूमीत जातात, परंतु आपण असे करणे टाळले पाहिजे. यामुळे तुमचा रुद्राक्ष अशुद्ध होतो, ज्याचा तुमच्या जीवनावर वाईट परिणाम होऊ लागतो.
मुलाच्या जन्मावेळी रुद्राक्ष धारण करू नये
असे मानले जाते की मुलाच्या जन्मानंतर, आई आणि मूल काही दिवस अपवित्र राहतात. अशावेळी रुद्राक्ष धारण करून त्यांच्या जवळ जाऊ नका. आई आणि मूल ज्या खोलीत आहेत, त्या खोलीत रुद्राक्ष काढल्यानंतरच प्रवेश करावा. तथापि, मुलाचे नाव ठेवल्यानंतर, आपण निश्चिंत होऊन रुद्राक्ष धारण करू शकता.
(येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.)