आपण सर्वजण भगवान श्री गणेश आणि देवतांचे सेनापती कार्तिकेय यांना महादेवाचे पुत्र म्हणून ओळखतो. तथापि, महादेवला इतर मुले देखील आहेत ज्यांची बहुतेक लोकांना माहिती नाही. पौराणिक कथेनुसार भगवान महादेव ८ मुलांचे पिता होते. महादेवाच्या इतर मुलांबद्दल जाणून घेऊया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अशोक सुंदरी

अशोक सुंदरीचा जन्म कार्तिकेयानंतर झाला. गुजरात आणि त्याच्या आसपासच्या प्रदेशातील पौराणिक कथांमध्ये आपण अशोक सुंदरीबद्दल ऐकू शकता. शिवपुराण आणि पद्म पुराणातही अशोक सुंदरीचा उल्लेख आहे. एकटेपणा दूर करण्यासाठी पार्वतीने अशोक सुंदरीला जन्म दिला असे म्हटले जाते. हे वरदान कल्पवृक्षाने दिले होते जे लोकांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी ओळखले जाते.

ज्योती

दक्षिणेत भगवान शिवासोबत ज्योतीचीही पूजा केली जाते. भगवान शंकराच्या तेजापासून ज्योतीचा जन्म झाला असे मानले जाते. ज्योतीचा जन्मही माता पार्वतींशी निगडित आहे आणि पार्वतीच्या कपाळातून बाहेर पडलेल्या ठिणगीतून ज्योतीचा जन्म झाला असे म्हटले जाते. ज्योती ही देवी मानली जाते आणि दक्षिणेत तिची पूजा केली जाते.

मनसा देवी

शिवपुराणात मनसा देवी माता पार्वतीच्या ईर्षेशी संबंधित आहे. मनसादेवीचा जन्म महादेवाच्या पोटी झाला असे मानले जाते, पण ती पार्वतीची कन्या नव्हती. पौराणिक कथेनुसार, मूर्तीला महादवाने स्पर्श केल्यावर सापांची आई कद्रू यांनी ही मूर्ती तयार केली होती. यातून मनसादेवीचा जन्म झाला. ही एक लोकप्रिय कथा आहे की मनसा सापाच्या इच्छेचा प्रभाव कमी करू शकते आणि सर्पदंश बरे करण्यासाठी ओळखली जाणारी देवी म्हणून मंदिरांमध्ये पूजा केली जाते.

( हे ही वाचा: शनिपुत्र आदित्यचा कुंभ राशीत सर्वात मोठा प्रवेश; ‘या’ होणार श्रीमंत? मिळू शकतो बक्कळ पैसा)

अयप्पा

पौराणिक कथेनुसार भगवान अय्यप्पा यांचा जन्म शिव आणि विष्णूचा पुत्र म्हणून झाला होता. मान्यतेनुसार, अयप्पाचा जन्म शिव आणि मोहिनी यांचा पुत्र म्हणून झाला होता. जेव्हा देवांना अमृत वाटण्यासाठी विष्णूने मोहिनीचे रूप धारण केले. अयप्पा सर्वात शक्तिशाली देवतांपैकी एक आहे आणि केरळ आणि तामिळनाडूमध्ये त्याची पूजा केली जाते. असे म्हटले जाते की भगवान अयप्पा हे एकमेव देवता आहेत जे परशुरामाशी लढू शकतात.

जालंधर

महादेवाला जालंधर नावाचा पुत्रही झाला. महादेवाने जालंधरला जन्म दिला, पण नंतर जालंधर त्याचा सर्वात मोठा शत्रू बनला. पुराणानुसार, जालंधर हे असुराच्या रूपात महोदवाचे एक रूप होते. इंद्राचा पराभव केल्यावर जालंधर तिन्ही लोकांचे दैवत बनले. यामागे जालंधरची पत्नी वृंदा हिची अफाट शक्ती होती असे मानले जाते. त्याच्याकडे एवढी शक्ती होती की कोणताही देव किंवा देवता त्याला पराभूत करू शकत नव्हते, परंतु त्याचा अभिमान नष्ट करण्यासाठी महादेवाने एक युक्ती खेळून त्याचा पराभव केला.

( हे ही वाचा: शनि, शुक्र आणि सूर्य बुधच्या युतीने ‘या’ राशी होणार अपार श्रीमंत? येणारा काळ असेल भरभराटीचा)

सुकेश

सुकेशला शिवपुत्र असेही म्हणतात. सुकेश अनाथ होता. त्याच्या जन्मानंतर त्याच्या पालकांनी त्याची काळजी घेतली नाही कारण त्याची आई व्यभिचारी होती आणि त्याच्या वडिलांनी सुकेशला आपला मुलगा म्हणून स्वीकारले नाही. पुराणानुसार, भगवान शिव आणि माता पार्वतीने या अनाथ मुलाला पाहिले आणि त्याचे रक्षण केले.

अंधकासुर

अंधकासुर हे पौराणिक राक्षसाचे नाव आहे. त्याचा वध भगवान शिवाने भैरवाच्या रूपात केला होता. अंधकासुर हा शिवाचा पुत्र होता. अंधकच्या वडिलांचे नाव हिरण्यक्ष होते. लिंगपुराणातील एका प्राचीन आख्यायिकेनुसार, एकदा भगवान शिव शंकर ध्यानात मग्न होते, त्याच वेळी माता पार्वतीने खेळकरपणे त्यांचे दोन्ही डोळे बंद केले. माता पार्वतीच्या हातातून घामाचा थेंब टपकला आणि भगवान शंकराच्या तिसर्‍या डोळ्याच्या दिव्य प्रकाशाला स्पर्श करून निघून गेली, त्याच घामाच्या आणि दिव्य प्रकाशाच्या मिश्रणातून एक बालक जन्माला आला जो आंधळा आणि कुरूप होता. हे बालक पुढे अंधकासुर म्हणून प्रसिद्ध झाले.

( वरील बातमी माहिती आणि गृहीतके यांवर आधारित आहे. यातून अंधश्रद्धा पसरवण्याचा कोणताही हेतू नाही)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahashivratri 2023 apart from ganpati and kartikeya mahadev had 8 children know the intresting birth story gps