भगवान महादेवांच्या भक्तांसाठी महाशिवरात्रीचा उपवास अत्यंत महत्त्वपूर्ण असतो. या दिवशी अनेक भक्त महादेवाला प्रसन्न करण्यासाठी भक्तीभावाने उपासना करतात. या दिवशी भाविक महादेवाची पूजा, उपवास करतात. मात्र, अनेकांना तो उपवास करताना काय खावे काय नको याबाबची माहिती नसते.
यंदाची महाशिवरात्र १८ फेब्रुवारीला साजरी होणार आहे. या दिवशी अनेक लोक भगवान महादेवांना प्रसन्न करण्यासाठी व्रत ठेवतील. असे म्हणतात की, भगवान शंकर लगेच प्रसन्न होतात आणि क्रोधही लगेच होतात. त्यामुळे महाशिवरात्रीचा उपवास करताना काही नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचं म्हटलं जाते. उपवास करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी तुम्ही अन्न खाऊ शकत नाही. त्यामुळे या उपवासात तुम्ही काय खाऊ शकतो आणि काय नाही याबद्दलची माहिती देणार आहोत.
फळे –
जर तुम्ही शिवरात्रीला उपवास करण्याचा विचार करत असाल तर जेवणाची विशेष काळजी घ्या. उपवासादरम्यान तुम्ही फळे खाऊ शकता. फळांमुळे तुमच्या शरीरात एनर्जी राहते आणि त्याबरोबर पोटदेखील भरेल. उपवासाला केळी, संत्री, सफरचंद, लिची, डाळिंब खाऊ शकता.
थंडाई –
असे म्हटले जाते की उपवासात पेये सेवन करणे अधिक फायदेशीर असते. म्हणूनच तुम्ही शिवरात्रीच्या उपवासात थंडाई पिऊ शकता. ज्यामुळे तुमचे पोटही भरेल आणि ते निरोगीही राहाल. साध्या दुधाऐवजी त्यात ड्रायफ्रुट्स, केशर, वेलची इत्यादी टाकून दूध पिऊ शकता.
हेही वाचा- लक्ष्मी कृपेने होळीपासून ‘या’ राशी होतील श्रीमंत? ‘या’ रुपात मिळू शकते नशिबाला कलाटणी
सात्विक आहार –
उपवासाला नेहमी सात्विक अन्न खावे. उपवासात तुम्ही बटाटा, भोपळा, असा भाज्यांचे सेवन करू शकता.
उपवासाला काय खायच नाही ?
लसूण-कांदा –
जर तुम्ही शिवरात्रीचा उपवास केला नसेल तरीही या दिवशी लसूण आणि कांदा खाऊ नका. पवित्र दिवसांमध्ये कांदा-लसूण खाऊ नये असं मानलं जाते.
पांढरे मीठ खाऊ नका –
पांढऱ्या मिठामध्ये अनेक प्रकारची रसायने असतात असे म्हणतात. त्यामुळे तुम्ही उपवासाच्या दिवशी सैंधव मीठ खाऊ शकता.
तळलेल्या पदार्थांपासून दूर राहा –
जर तुम्ही उपवास करत असाल तर तळलेल्या पदार्थ खाऊ नका. उपवासात तळलेले पदार्थ खाल्ल्याने पोटदुखी, गॅस आणि अपचनाचा त्रास होऊ शकतो.