Mahashivratri 2023: हिंदू दिनदर्शिकेनुसार दरवर्षी फाल्गुन महिन्यात महाशिवरात्री असते. यंदा २०२३ मध्ये १८ फेब्रुवारीला महाशिवरात्रीचा योग आहे. असं म्हणतात की महाशिवरात्रीला भगवान शंकर व पार्वती यांचा विवाह झाला होता. या दिवशी जी व्यक्ती भगवान शिव- पार्वतीचे व्रत व आराधना करते त्यांच्या सर्व इच्छा व मनोकामना पूर्ण होतात अशी मान्यता आहे. यंदा महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर ३० वर्षांनी अत्यंत दुर्मिळ व लाभदायक योग तयार होत आहे. या महाशिवरात्रीपासून काही राशींचा भाग्योदय होण्याचा योग आहे. महाशिवरात्रीची तिथी, मुहूर्त तसेच या दिवसापासून नेमका कोणाला लाभ होणार हे आपण जाणून घेऊयात..
महाशिवरात्री तिथी (Mahashivratri 2023 Tithi)
पंचांगानुसार, महाशिवरात्री चतुर्दशी तिथी शनिवारी रात्री ८ वाजून २ मिनिटांपासून दुसऱ्या दिवशी म्हणजे १९ फेब्रुवारी, रविवार, दुपारी ४ वाजून ८ मिनिटांपर्यंत असणार आहे.
महाशिवरात्री पूजा मुहूर्त (Mahashivratri 2023 Shubh Muhurt)
पूजेचा शुभ मुहूर्त रात्री १२ वाजून ९ मिनिट ते १ पर्यंत असणार आहे. महाशिवरात्रीचे व्रत करताना उपवास १९ फेब्रुवारीला सुद्धा केला जाऊ शकतो तसेच पारणाचा शुभ मुहूर्त १९ फेब्रुवारीला सकाळी ६ वाजून ५९ मिनिट ते दुपारी ३ वाजून २४ मिनिटांपर्यंत असणार आहे.
३० वर्षांनी महाशिवरात्रीला दुर्मिळ योग
वैदिक ज्योतिषाच्या माहितीनुसार, ३० वर्षानंतर शनिदेव कुंभ राशीत भ्रमण करत आहे. तर १३ फेब्रुवारीला सूर्य सुद्धा शनीच्या कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. शनी सूर्याच्या युतीने महाशिवरात्रीला अत्यंत दुर्मिळ असा शुभ संयोग तयार होत आहे. दुसरीकडे याच दिवशी भगवान शंकराच्या आराधनेचे प्रदोष व्रत सुद्धा आहे.
हे ही वाचा<< Capricorn Horoscope 2023: शनीच्या मकर राशीला कधी मिळेल मोठा धनलाभ? सोनल चितळेंनी सांगितलं १२ महिन्याचं राशीभविष्य
महाशिवरात्रीपासून ‘या’ राशींना होणार धनलाभ?
शनी व सूर्याची युती ही कुंभ राशीत होत असल्याने याचा सर्वाधिक लाभ हा शनीच्या स्वामित्वाच्या राशींना होऊ शकतो. कुंभ राशीला येत्या काळात गुंतवणूक व नवीन कल्पनांच्या माध्यमातून प्रगती व धनलाभाचे योग आहेत. तसेच सूर्याच्या स्वामित्वाच्या सिंह व कन्या या राशींना सुद्धा प्रचंड श्रीमंतीचे योग आहेत.
हे ही वाचा<< २१ एप्रिलपासून मोदींच्या कुंडलीत कष्टी दिन! ज्योतिषतज्ज्ञ म्हणतात “२०२४ ला सत्ता टिकवण्यासाठी मुस्लिमच..”
(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)