Mahashivratri Shubh Yog 2024: महाशिवरात्री हा हिंदूंचा प्रमुख धार्मिक सण आहे. महाशिवरात्री हा सण फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला साजरा केला जातो. महाशिवरात्र हा भगवान शंकराच्या विशेष पूजा-विधीसाठी महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी भाविक उपवास करून अभिषेकासह पूजा करतात. यंदा ८ मार्च २०२४ रोजी महाशिवरात्री साजरी होईल. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, या दिवशी अत्यंत शुभ योग निर्माण होत आहे. असा अद्भूत योग तब्बल ३०० वर्षांनी निर्माण होत असल्याचे ज्योतिषशास्त्रातून समोर आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हिंदू पंचांगानुसार, महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी ४ वाजून ४५ मिनिटापासून संपूर्ण दिवस ‘शिव योग’ राहणार आहे. तर सोबतच सकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी ‘सर्वार्थ सिध्दी योग’ सुरु होणार आहे. हा शुभ योग १० वाजून ४५ मिनिटांपर्यंत असेल. असे मानले जात आहे की, महाशिवरात्रीच्या या शुभ पर्वावर घडून येणारा असा शुभ संयोग तीनशे वर्षांनी घडत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांच्या बाबतीतही शुभ योग घडून येत आहे. मकर राशीमध्ये मंगळ आणि चंद्राची युती, ज्यामुळे ‘चंद्र मंगल योग’ निर्माण होत आहे तर दुसरीकडे कुंभ राशीमध्ये शुक्र, शनि आणि सूर्याच्या युतीने ‘त्रिग्रही योग’ घडून येत आहे. तर मीन राशीमध्ये राहू आणि बुधाची युती होत आहे. त्यामुळे या शुभ संयोगामुळे महाशिवरात्रीच्या शुभ पर्वापासून काही राशींचे अच्छे दिन सुरु होण्याची शक्यता आहे. कोणत्या राशींवर शंकराची कृपा बरसणार आहे. जाणून घेऊयात…

‘या’ राशींचे सुखाचे दिवस होणार सुरु?

मेष राशी

मेष राशींच्या लोकांवर भगवान शंकराची विशेष कृपा राहू शकते. अडकलेली काम चांगल्या पद्धतीने मार्गी लागू शकतात. शंकराच्या कृपेने अडकलेले पैसे या काळात परत मिळू शकतात. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना नोकरीच्या संधी मिळू शकतात.

(हे ही वाचा : धन-संपत्तीचा कारक शुक्रदेवाच्या नक्षत्र बदलामुळे धनलक्ष्मी ‘या’ ४ राशींच्या नशिबाला देईल कलाटणी? तुम्हाला आहे का ही संधी? )

मिथुन राशी

मिथुन राशीच्या लोकांसाठी महाशिवरात्री खूप शुभ ठरु शकते. या राशीच्या लोकांना मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे. या काळात मालमत्ता खरेदीचे शुभ योग जुळून येऊ शकतात. गुंतवणुकीतून मोठा नफा मिळू शकतो. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते.

सिंह राशी

या राशीच्या लोकांवर भगवान शंकराची कृपा राहू शकते. या काळात विशेष लाभ मिळू शकतो. व्यापारामध्ये आणि व्यवहारांमध्ये मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. अविवाहितांना विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात. कुटुंबातील वातावरण उत्साही राहण्याची शक्यता आहे.

(टीप-वरील माहिती आणि गृहीतके यांवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahashivratri 2024 special shubh yog made after 300 years positive impact of these zodiac sing can get huge money pdb