Powerful mantra: हिंदू धर्मामध्ये भगवान महादेवाच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे. महाशिवरात्री फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीच्या दिवशी साजरी केली जाते. यंदा बुधवार, २६ मार्च रोजी महाशिवरात्री साजरी केली जाईल. अनेक जण या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करतात. महादेवाच्या मंदिरात जाऊन पूजा करतात. परंतु, या दिवशी उपवास आणि महादेवाच्या पूजेव्यतिरिक्त मंत्राचे आणि स्तोत्राचे पठण करणेदेखील लाभकारी मानले जाते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महादेवाचे ५ प्रभावशाली मंत्र

मृत्युंजय मंत्र

ऊँ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्। ऊर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय मामृतात् ।।

या मंत्राने व्यक्तीची अकाल मृत्यू, दुर्घटनांपासून सुटका होते.

पंचाक्षरी मंत्र

ऊँ नम: शिवाय।।

या मंत्राला महादेवाचा मूळ मंत्र म्हटले जाते. हा मंत्र अत्यंत प्रभावशाली आहे. त्यामुळे सर्व मनोकामना पूर्ण होतात.

महामृत्युंजय बीजमंत्र

ऊँ हौं जूं स: ऊँ भुर्भव: स्व: ऊँ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्। ऊर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय मामृतात् ऊँ भुव: भू: स्व: ऊँ स: जूं हौं ऊँ।।

या मंत्राच्या पठणाने स्वतःचे आणि कुटुंबातील व्यक्तींचे आरोग्य सुधारते. ज्या ठिकाणी हा मंत्रजप केला जातो, त्या ठिकाणी सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.

रुद्र गायत्री मंत्र

ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्॥

रुद्र गायत्री मंत्राने व्यक्तीची एकाग्रता वाढते.

रुद्र मंत्र

ॐ नमो भगवते रुद्राय नमः

या मंत्राचा जप केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात.