Read benefits of wearing rudraksha: पंचांगानुसार, फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्र साजरी केली जाते. यंदा २६ मार्च रोजी महाशिवरात्र साजरी केली जाईल. या दिवशी महादेवाची मनोभावे पूजा-आराधना केली जाते. जो भक्त या दिवशी व्रत करून महादेवाचे मनोभावे स्मरण करतो. त्याच्यावर महादेव प्रसन्न होतो. या शुभ दिवशी रुद्राक्ष धारण करणेही खूप लाभदायी मानले जाते. परंतु, रुद्राक्ष नेहमी राशीनुसार धारण करावा. कारण- त्यामुळे तो धारण करणाऱ्या व्यक्तीसाठी खूप लाभदायी ठरतो. चला तर मग जाणून घेऊ कोणत्या राशींसाठी कोणता रुद्राक्ष फायदेशीर ठरेल ते…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राशीनुसार रुद्राक्ष धारण केल्याने व्यक्तीला त्याचे अनेक फायदे होतात. आयुष्यात सुख, समृद्धी, आत्मविश्वास व सकारात्मकता वाढते. प्रत्येक कामात यश मिळते, असे म्हटले जाते. शास्त्रामध्ये एकमुखीपासून २१ मुखी रुद्राक्षांचे वर्णन करण्यात आले आहे. तसेच प्रत्येक रुद्राक्षाचे वेगवेगळे महत्त्व आहे.

रुद्राक्ष धारण करण्याचे नियम

  • रुद्राक्ष धारण करणे फायदेशीर असले तरीही ते धारण करण्याचे काही नियमदेखील आहेत.
  • ज्योतिषशास्त्रानुसार, रुद्राक्ष किंवा रुद्राक्षांची माळ सोमवारी, पौर्णिमा, श्रावण महिना किंवा महाशिवरात्रीच्या दिवशी धारण करावी.
  • रुद्राक्ष नेहमी लाल, पिवळ्या रंगाच्या धाग्यात किंवा सोने, चांदीमध्ये बनवून घालावा.
  • रुद्राक्षामध्ये साक्षात भगवान शंकराचा अंश असल्याचे मानले जाते. त्यामुळे मांसाहार अथवा दारू, सिगारेट असे कोणत्याही प्रकारचे व्यसन करणाऱ्यांनी रुद्राक्ष धारण करू नये.

तुमच्या राशीनुसार धारण करा रुद्राक्ष

मेष

या राशीच्या व्यक्तींनी त्रिमुखी रुद्राक्ष धारण करावा. हा रुद्राक्ष त्यांच्यासाठी अत्यंत फायदेशीर मानला जातो.

वृषभ

या राशीचा स्वामी ग्रह शुक्र आहे. त्यामुळे या राशीच्या व्यक्तींनी सहा मुखी रुद्राक्ष धारण करावा. त्यामुळे त्यांचे भाग्य उजळते.

मिथुन

या राशीच्या व्यक्तींनी चार मुखी रुद्राक्ष धारण करावा. त्यामुळे सर्व कार्यांत यश मिळते.

कर्क

या राशीचा स्वामी चंद्र आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांनी द्विमुखी रुद्राक्ष धारण करावा. तसे केल्याने चंद्र ग्रह मजबूत होतो.

सिंह

या राशीच्या व्यक्तींनी १२ मुखी रुद्राक्ष धारण करावा. त्यामुळे तुमच्या कामातील अडथळे दूर होतील.

कन्या

या राशीच्या व्यक्तींनी चार मुखी रुद्राक्ष धारण करावे. यामुळे तुमची सर्व कामं पूर्ण होतील.

तूळ

या राशीचा स्वामी ग्रह शुक्र आहे. त्यामुळे या व्यक्तींनी सहा मुखी रुद्राक्ष धारण करावा. त्यामुळे त्यांना आयुष्यात भौतिक सुखाची प्राप्ती होईल.

वृश्चिक

या राशीच्या व्यक्तींनी त्रिमुखी रुद्राक्ष धारण करावा. त्यामुळे व्यक्तीला पैशांची कमतरता भासत नाही.

धनू

या राशीच्या व्यक्तींनी पंचमुखी रुद्राक्ष धारण करावा. त्यामुळे त्यांना आयुष्यात यशस्वी होण्यास मदत होईल.

मकर

या राशीच्या व्यक्तींनी सात मुखी रुद्राक्ष धारण करावा. त्यामुळे तुमचे आरोग्य उत्तम राहील.

कुंभ

या राशीच्या व्यक्तींनी सात मुखी रुद्राक्ष धारण करावा. त्यामुळे तुमच्या आयुष्यातील अनेक समस्या दूर होतील.

मीन

या राशीचा स्वामी ग्रह गुरू आहे. या व्यक्तींनी पंचमुखी रुद्राक्ष धारण करावा. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल.

(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)