Mahashivratri 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, सण आणि उत्सवांच्या काळात अनेक ग्रह आपली स्थिती बदलतात. त्यात महाशिवरात्रीच्या दिवशी शनी देव आणि बुध ग्रहाच्या चालीत बदल होईल. शनी देवाचा मूळ रास असलेल्या कुंभ राशीत अस्त होईल. तर बुध, मीन राशीत भ्रमण गोचर करेल. या दोन्ही ग्रहांच्या हालचालींतील बदल काही राशींचे भाग्य उजळवू शकतो. या राशींना महाशिवरात्रीला भगवान शंकरांच्या आशीर्वादाने अचानक आर्थिक लाभ आणि सौभाग्य मिळू शकते. चला जाणून घेऊ या भाग्यशाली राशींविषयी …
महाशिवरात्रीला ‘या’ राशींवर होईल पैशांचा पाऊस! नोकरी, व्यवसायात मिळेत खूप यश
वृषभ
बुध आणि शनीच्या हालचालींतील बदल वृषभ राशीसाठी फायदेशीर ठरू शकतो. या काळात कामाच्या ठिकाणी अनुकूल वातावरण राहील आणि आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकते. तरुणांना त्यांच्या करिअरमध्ये प्रगती साधण्याच्या संधी मिळतील. तसेच गुंतवणुकीसाठी हा काळ योग्य आहे. या काळात तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते. तसेच, उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. यावेळी व्यवसायात एक मोठी घडामोड होऊ शकते.
मिथुन
बुध आणि शनीच्या हालचालींतील बदल मिथुन राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकतो. या काळात तुम्हाला तुमच्या कामात आणि व्यवसायात चांगली प्रगती साधता येऊ शकते. कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रयत्नांचे कौतुक होईल आणि व्यवसायात अनपेक्षित नफा मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायाच्या निमित्ताने प्रवासाची संधी मिळेल. ही संधी तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. विचारपूर्वक पैसे गुंतवल्याने फायदा होईल. यावेळी तुमच्या इच्छा पूर्ण होतील. त्याच वेळी तुम्ही पैसे बचत करण्यात यशस्वी व्हाल.
कुंभ
बुध आणि शनीच्या हालचालीतील बदल तुमच्यासाठी फलदायी ठरू शकतो. या काळात, तुम्हाला वेळोवेळी अचानक आर्थिक लाभ मिळू शकतो. तसेच तुमचे प्रेमी जीवन चांगले राहील. कुटुंबात सहकार्य आणि सुसंवाद राहील. कामाच्या ठिकाणी पदोन्नती आणि उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होईल. तसेच, या काळात व्यावसायिकांना चांगला आर्थिक फायदा होऊ शकतो. तसेच तुमचे लोकांनी घेतलेले पैसे तुम्हाला परत मिळू शकतात.