Mahashivratri 2025 : शिवला प्रसन्न करण्यासाठी वर्षातील काही दिवस खूप खास असतात जसे की महाशिवरात्री, श्रावण सोमवार. या वर्षी २६ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री सण साजरा केला जाणार आहे. महादेवाला प्रसन्न करण्यासाठी शिव भक्त उपवास धरतात. पूजा अभिषेक करतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ज्योतिषशास्त्रानुसार काही राशी अशा असतात ज्यांच्यावर शिवची विशेष कृपा दिसून येते. या पाच राशींच्या लोक शिवचे अतिशय प्रिय असतात. जीवनात कोणतीही समस्या आली तरी शिवच्या आशीर्वादाने ते त्या समस्येतून मार्ग काढतात. जाणून घेऊ य शिव च्या प्रिय राशी कोणत्या आहेत.

मेष राशी –

मेष राशीचा स्वामी मंगळ ग्रह आहे आणि या राशीवर हनुमानाची विशेष कृपा दिसून येते. हनुमानजीला शिवचा अवतार मानले जाते. शिवची प्रिय राशी मेष आहे. भोलेनाथच्या कृपेने या लोकांचे बिघडलेले काम पूर्ण होतात आणि करीअरमध्ये तसेच व्यवसायात यश मिळते.

कर्क राशी-

कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे ज्याल शिवने त्याच्या डोक्यावर धारण केले आहे. कर्क राशीचे लोक भगवान शिवचे अतिशय प्रिय आहेत. हे लोक हसमुख, सहनशील आणि धैर्यवान स्वभावाचे असतात. ते प्रत्येक अडचणीचा मोठ्या हिंमतीने सामना करतात.

तुळ राशी –

तुळ राशीचा स्वामी शुक्र ग्रह आहे. भगवान शिवच्या प्रिय राशींमध्ये तुळ राशीचा सुद्धा समावेश आहे. शिवच्या कृपेने या राशीचे लोक जीवनात खूप प्रगती करतात. त्यांच्या जीवनात धन संपत्तीची कमतरता भासत नाही. तसेच या लोकांचे व्यक्तिमत्व अतिशय आकर्षक दिसून येते.

मकर राशी –

मकर राशीचे स्वामी शनि असतात. शनिदेव शिवला आपला आराध्य मानते आणि शिवची आराधना करणाऱ्या लोकांचे शनि सुद्धा काही बिघडू शकत नाही. अडचणीच्या वेळी भगवान शिव स्वत: या राशीच्या लोकांची सुरक्षा करतात.

कुंभ राशी –

कुंभ राशीचा स्वामी शनिदेव आहे आणि या राशीचे लोक सुद्धा शिवचे अतिशय प्रिय व्यक्ती असतात. कुंभ राशीचे लोक अतिशय खरे, प्रामाणिक आणि इतरांचा विचार करणारे असतात. त्यामुळे शिव यांच्यावर शिवची कृपा दिसून येते. या लोकांना जीवनात मान सन्मान तसेच सुख समृद्धी मिळते

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)