Planet Transit 2023: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह वेळोवेळी राशी व नक्षत्र परिवर्तन करत असतो. साधारणतः एका महिन्याच्या अवधीत ग्रह आपले स्थान बदलतात तर काही संथ गतीने चालणारे ग्रह हे निदान वक्री, उदय, अस्त अशा अवस्थांमध्ये तरी जातात. येत्या जुलै महिन्यात सुद्धा सूर्य, बुध, शुक्र, मंगळ गोचर होणार आहे तर शनिदेव वक्री अवस्थेत असणार आहेत, या ग्रहांच्या उलाढालीला एका योगायोगामुळे आणखीनच महत्त्व प्राप्त झाले आहे तो योग म्हणजे जुलै महिन्याची सुरुवातच शनीच्या आवडत्या शनिवारापासून होत आहे. त्यामुळे येत्या महिनाभरात काही राशींच्या प्रगतीला चांगलाच वेग मिळू शकतो. तसेच यांना कोट्याधीश होण्याची सुद्धा संधी आहे. या राशी कोणत्या व त्यांना नेमका कशा पद्धतीचा लाभ होण्याची चिन्हे आहेत हे आपण सविस्तर पाहूया…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

येत्या शनिवारपासून ‘या’ राशींचे अच्छे दिन सुरु?

तूळ रास (Libra Zodiac)

जुलैमध्ये ग्रह गोचर होताच तूळ राशीच्या मंडळींना मोठा व शुभ फायदा मिळू शकतो. विशेषतः शुक्राचे गोचर तुमच्या राशीच्या भाग्योदयाचे कारण ठरू शकते. प्रत्येक पावलावर तुम्हाला मोठे यश व प्रगतीची संधी आहे. सुरु केलेल्या कामात सातत्य राखून ठेवा त्यातूनच तुमच्या प्रगतीची कवाडे खुली होणार आहेत. सोन्यात गुंतवणूक लाभदायक ठरू शकते.

मेष रास (Aries Zodiac)

मंगळ गोचर होताच मेष राशीच्या मंडळींचे नशीब उजळण्याची चिन्हे आहेत. मेष रास ही मंगळाच्या स्वामित्वाची असल्याने तुमच्या समस्यांपासून सुटका मिळू शकते. करिअरमध्ये प्रगतीसाठी तुम्हाला नातेवाईकांची सुद्धा अनपेक्षित मदत लाभू शकते. भावंडांच्या रूपात माता लक्ष्मीचा तुम्हाला कृपाशिर्वाद लाभू शकतो.

मिथुन रास (Gemini Zodiac)

शुक्र ग्रह गोचर व बुधाचा उदय व मग गोचर या दोन्ही उलाढालींमुळे मिथुन राशीला फायदा होऊ शकतो, मिथुन राशीच्या मंडळींना कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून शाब्बासकी मिळू शकते. तुम्हाला नोकरीत पगारवाढ व पदोन्नतीचे योग आहेत पण तुम्हाला वाणीवर नियंत्रण ठेवावे लागू शकते, नोकरदार मंडळींनी कामाच्या सह अन्य मार्गाने अर्थजनाचे प्रयत्न करायला हवेत ज्यासाठी शेअर बाजार व फंड्समध्ये गुंतवणूक लाभदायक ठरू शकते.

हे ही वाचा<< २१ ऑगस्टपर्यंत ‘या’ ५ राशींना लक्ष्मीची मंगलकृपा लाभणार? तीन दिवसांनी धनलाभासह आत्मविश्वासही वाढणार

सिंह रास (Leo Zodiac)

शुक्र सिंह राशीसाठी लाभदायक स्थितीत आहे तर मंगळ गोचर सुद्धा तुमच्या आयुष्यात अनुकूल व सुखाचा काळ सुरु करू शकतो. तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मोठा फायदा होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी तुमचा अहंकार दूर ठेवणे आवश्यक आहे. धनलाभामुळे अनेक ताण दूर होऊ शकतात.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे व यातून अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नाही)