मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाची उपासना केल्यास शुभ फळ मिळते. यावेळी मकर संक्रांतीचा सण १४ जानेवारी, शुक्रवारी साजरा होणार आहे. या दिवशी सूर्य कॅलेंडरनुसार दुपारी २.२८ वाजता मकर राशीत प्रवेश करतो. मकर संक्रांतीबाबत अनेक भाविकांमध्ये साशंकता आहे. मकर संक्रांती सहसा १४ जानेवारी रोजी साजरी केली जाते. मात्र, यावेळी मकर संक्रांतीचा पुण्यकाळ १४ जानेवारीला दुपारी २.२८ पासून सुरू होत आहे. अशा स्थितीत उदयतिथीला मानणारे भाविक १५ जानेवारीला सण साजरा करणार आहेत.
तसेच या दिवशी धान्य दान केल्याने पुण्य मिळते. त्यामुळे तिथे खिचडी आणि गूळ-तीळ दान केल्यानेही फायदा होतो. याशिवाय या दिवशी राशीनुसार विशेष वस्तूंचे दान केल्याने विशेष लाभ होतो. जाणून घ्या मकर संक्रांतीच्या दिवशी राशीनुसार कोणत्या वस्तूंचे दान करावे.
(हे ही वाचा: Bhogi 2022: मकरसंक्रांतीच्या आदल्या दिवशी साजऱ्या होणाऱ्या भोगीचं महत्व माहित आहे का?)
आपल्या राशीनुसार करा दान
मेष (Aries) : या राशीचा स्वामी मंगळ आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांनी स्नानानंतर तीळ, मिठाई, खिचडी, रेशमी वस्त्र, डाळ, गोड भात आणि लोकरीचे कपडे दान करावे.
वृषभ (Taurus): या राशीवर शुक्राचे राज्य आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी उडीद डाळ खिचडी, काळी उडीद, मोहरीचे तेल, काळे वस्त्र, काळे तीळ इत्यादींचे दान करावे.
(हे ही वाचा: मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ आणि गुळाचे का करतात सेवन? जाणून घ्या)
मिथुन (Gemini): या राशीवर बुध ग्रहाचे राज्य आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी गरिबांना खिचडी, काळे तीळ, छत्री, उडीद, बेसनाचे लाडू, मोहरीचे तेल दान करावे.
कर्क (Cancer): कर्क राशीच्या लोकांनी या दिवशी गरीब आणि गरजू लोकांना खिचडी, हरभरा डाळ, पिवळे वस्त्र, अख्खी हळद, पितळेची भांडी, फळे इत्यादी दान करावे. कर्क राशीवर चंद्र ग्रहाचा अंमल आहे, त्यामुळे या राशीचे लोक पांढऱ्या वस्तू दान देखील करू शकतात.
सिंह (Leo): सिंह राशीवर सूर्य देवाचे राज्य आहे. त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी या राशीच्या लोकांनी स्नानानंतर मसूर, खिचडी, लाल वस्त्र, रेवडी इत्यादी दान करावे.
(हे ही वाचा: ‘या’ ४ राशीचे लोक अजिबात नसतात कंजूष, मनमोकळेपणाने करतात खर्च!)
कन्या (Virgo): मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर या राशीच्या लोकांनी अख्खा मूग, हिरवे कपडे, खिचडी, शेंगदाणे इत्यादी गरीबांना दान करावे. कन्या राशीचा स्वामी बुध आहे. त्यामुळे या राशीचे लोकही हिरव्या वस्तू दान करू शकतात.
तूळ (Libra) : मकर संक्रांतीच्या दिवशी तूळ राशीच्या लोकांनी खिचडी, फळे, साखर मिठाई, गरम कपडे इत्यादी गरिबांना दान करावे. तूळ राशीवर शुक्र ग्रहाचे राज्य आहे, त्यामुळे या राशीचे लोक शुक्र ग्रहाशी संबंधित वस्तू दान करू शकतात.
वृश्चिक (Scorpio): मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान केल्यानंतर या राशीच्या लोकांनी खिचडी, घोंगडी, तीळ-गुळ इत्यादींचे दान गरिबांना करावे. या राशीवर मंगळाचे अधिपत्य असते त्यामुळे या राशीचे लोक लाल रंगाच्या वस्तूही दान करू शकतात.
(हे ही वाचा: Astrology: ‘या’ ३ राशींच्या लोकांना कधीच सांगू नका तुमचं सिक्रेट!)
धनु (Sagittarius): धनु राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी शेंगदाणे, तीळ, लाल चंदन, लाल वस्त्र गरीब ब्राह्मण किंवा गरजूला दान करावे. गुरु हा धनु राशीचा अधिपती ग्रह आहे. त्यामुळे या राशीचे लोक कोणतेही शास्त्र ग्रंथ दान करू शकतात.
मकर (Capricorn): मकर राशीच्या लोकांसाठी मकर संक्रांतीचा दिवस खूप महत्त्वाचा आहे कारण सूर्य याच राशीत भ्रमण करत आहे. या दिवशी मकर राशीच्या लोकांनी खिचडी, ब्लँकेट, कपडे इत्यादी दान करावे. तसेच मकर राशीवर शनिदेवाचे राज्य असते त्यामुळे या राशीचे लोक देखील तेल, काळी छत्री दान करू शकतात.
(हे ही वाचा: ‘या’ ४ राशींचे लोक मानले जातात रागीट स्वभावाचे, स्वतःचेच करून घेतात नुकसान)
कुंभ (Aquarius): या राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी शुद्ध गायीच्या तुपाचे दान करावे. याशिवाय खिचडी दान करणे देखील शुभ सिद्ध होईल. कुंभ राशीचा स्वामी शनिदेव आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांनी काळ्या वस्तूंचे दान करावे.
मीन (Pisces): या राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी हरभरा डाळ आणि तीळ दान केल्यास ते शुभ राहील. मीन राशीवर बृहस्पतिचे राज्य आहे, त्यामुळे या राशीच्या लोकांनी पिवळ्या वस्तू आणि कोणत्याही शास्त्राचे पुस्तक दान केले तर त्यांचा चांगला परिणाम होईल.
(येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.)