Shani And Surya Yuti In Capricon : १४ जानेवारी २०२२ रोजी मकर संक्रांतीचा सण देशभरात आनंदात साजरा केला जाईल. कारण या दिवशी सूर्य देव मकर राशीत प्रवेश करेल. त्याचबरोबर शनीदेव देखील मकर राशीत विराजमान आहेत. हा दुर्मिळ योगायोग आता १४ जानेवारी २०२२ रोजी २९ वर्षानंतर घडत आहे. हा योग यापूर्वी १९९३ मध्ये मकर राशीत शनी आणि सूर्य एकत्र असताना घडला होता. या दुर्मिळ योगायोगाचा सर्व राशींवर परिणाम होईल. पण अशा ४ राशी आहेत ज्यांना बढती आणि सरकारी नोकरी मिळण्याची प्रबळ शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मिथुन: सूर्य आणि शनीचा संयोग तुमच्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करू शकतो. तुमच्या राशीचा स्वामी बुध ग्रह आहे. ज्योतिष शास्त्रानुसार शनीदेव आणि बुध यांच्यात मैत्रीची भावना आहे. त्यामुळे या लोकांना नोकरीत प्रमोशन मिळू शकते. यासोबतच तुम्ही ऑफिसमध्ये तुमच्या कामाने सर्वांची मने जिंकू शकाल. दुसरीकडे, जे लोक स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांना या काळात परीक्षेत यश मिळू शकते.

आणखी वाचा : Sun Transit 2022 : मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याचा मकर राशीत प्रवेश: या ४ राशींसाठी शुभ दिवस सुरू होणार, प्रत्येक कामात यशाचे योग

सिंह: सूर्य आणि शनीच्या संयोगाने तुम्हाला करिअरमध्ये नवीन संधी मिळतील आणि तुम्हाला अतिरिक्त जबाबदाऱ्यांसह नवीन भूमिका मिळू शकेल. सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे. त्यामुळे या काळात तुम्ही केलेल्या कामाचे कौतुक केले जाऊ शकते. तुम्ही तुमची वेगळी ओळख निर्माण करू शकाल. या कालावधीत तुम्हाला पदोन्नती किंवा पगारवाढ देखील मिळू शकते.

आणखी वाचा : पराक्रम देणारा मंगळ १६ जानेवारीला धनु राशीत प्रवेश करेल, या ४ राशींच्या संपत्तीत प्रचंड वाढ होण्याची शक्यता

धनु: तुम्हाला भौतिक लाभ होईल. तुमच्या बँक खात्यात काही अनपेक्षित पैसे येऊ शकतात. नोकरीत बदल आणि पगारात चांगली वाढ अपेक्षित आहे. धनु राशीचा स्वामी गुरु ग्रह आहे आणि सूर्य आणि गुरु ग्रह यांच्यात मैत्रीची भावना आहे. त्यामुळे धनु राशीच्या लोकांसाठी हे संयोजन अपेक्षित परिणाम देईल. त्यामुळे सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ विशेष चांगला असेल. नोकरीत बदल आणि पगारात चांगली वाढ अपेक्षित आहे.

आणखी वाचा : Budh Vakri 2022: बुद्धिमत्ता आणि व्यवसाय देणारा बुध होतोय वक्री, या ४ राशीच्या लोकांच्या अडचणी वाढू शकतात

मीन: शनि आणि रवि यांच्या संयोगामुळे तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो. उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. बृहस्पति हा मीन राशीचा स्वामी आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला राजकारणातही मोठे पद मिळू शकते. कारण सूर्य देव आणि गुरु ग्रह यांच्यात मैत्रीची भावना आहे. यासोबतच तुमची आर्थिक स्थितीही सुधारेल. या काळात तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होऊ शकते.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Makar sankranti 2022 surya shani yuti after 29 years horoscope rashifal sun saturn conjunction impact on different zodiac signs prp