मकर संक्रांतीचा (Makar Sankrant) सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मकर संक्रांत भारतात मोठया आनंदाने आणि उत्साहात साजरी केली जाते. या सणाबद्दल लहानांपासून मोठ्यापर्यंत एक आकर्षण असतं. यादिवशी लोकं आपल्या ओळखीच्या माणसांच्या हातावर तीळ-गूळ देतात, ते देताना, ‘तीळ गुळ घ्या, गोड गोड बोला’ असं आर्वजून सांगतात. शिवाय या सणाचा महिलां वर्गामध्ये एक वेगळाच उत्साह असतो. या दिवशी त्या एकमेकींना वाण देतात. तर लहाण मुलांना या सणाच्या निमित्ताने मनमुराद पतंग उडवण्याचा आनंद घेत असतात. तसंच हा सण नवीन लग्न झालेल्या मुलीसाठी खूप महत्वाचा माणला जातो.
मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर सूर्याचा मकर राशीत प्रवेश होतो. पौष महिन्यात सूर्य उत्तरायण होऊन मकर राशीत प्रवेश करतो. हा सण देशाच्या विविध भागात वेगवेगळ्या पध्दतीनं साजरा केला जातो. या वर्षातील मकर संक्रांत रविवार १५ जानेवारीला येत आहे. या सणाचं आणखी एक खास वैशिष्ट्य आहे. ते म्हणजे, इतर वेळी भारतीय संस्कृतीत अशुभ मानला जाणारा काळा रंग यादिवशी मात्र आवर्जून वापरला जातो.
हेही वाचा- मकर संक्रांतीला पतंग का उडवतात? यामागचे ‘हे’ कारण जाणून तुम्हीही पतंग उडवाल
…म्हणून संक्रातीला काळी कपडे परिधान करतात –
या सणाच्या दिवशी काळी कपडे परिधान केली जातात. शिवाय या सणाला नवविवाहित वधूच्या पहिल्या संक्रांतीला तिला काळी साडी भेट म्हणून दिली जाते. त्यामुळे मकर संक्रांतीला काळी कपडेच का परिधान केली जातात? याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होत असतात. तर यादिवळी काळ्या रंगाची कपडे वापरण्यामागची काही कारणं आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
पुराणातील अशी एक कथा सांगितली जाते की, सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याची पत्नी छाया म्हणजे सावलीने काळे वस्त्र परिधान केलेलं होतं. हे झालं कथेतील कारण, मात्र, यामागचे वैज्ञानिक कारण म्हणजे, पांढरा रंग जसा उष्णता परावर्तित करतो, उष्णता शोषून घेत नाही, त्याप्रमाणे काळा रंग हा ऊष्णता शोषून घेतो. मकर संक्रांतीचा सण हा ऐन हिवाळ्यात येतो. त्यामुळे थंडीच्या दिवसात शरीर उबदार रहावे आपणाला थंडीचा जास्त त्रास होऊ नये, म्हणून मकर संक्रांतीला काळ्या रंगाची कपडे घातली जातात. शिवाय आपल्या शरीराला उष्णता मिळावी शरीर उष्ण राहावं म्हणून या सणाला तिळगूळ वाटले जातात याचं कारण हेच की सणाच्या निमित्ताने आपल्या शरीरात तिळाचे काही तत्व जावेत आणि आपलं थंडीपासून संरक्षण व्हावं.
हेही वाचा- Makar Sankranti 2023 : मकर संक्रांती साजरी का केली जाते? या १० गोष्टींबाबत जाणून घ्या सविस्तर
तसं पाहायला गेलं तर हिंदू धर्मातील प्रत्येक सणाला ऋतुमानानुसार काही ना काही महत्त्व आहे, शास्त्रीय कारणे आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. सूर्याच्या एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण होण्यालाच संक्रांत असं म्हटलं जातं. मकर संक्रांतीला काही ठिकाणी उत्तरायण असंही म्हटलं जातं. मकर संक्रांतीच्या दिवशी रात्र मोठी असते. या दिवसापासून दिनमान वाढायला सुरुवात होते. काळोख्या मोठ्या रात्रीला काळ्या रंगाची वस्त्रे परिधान करुन निरोप दिला जातो असंही सांगितलं जातं. म्हणून या सणाला आवर्जून काळ्या रंगाला मान दिला जातो.