Makar Sankranti Astrology: नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांती. हिंदू धर्मात मकर संक्रांतीच्या सणाला विशेष महत्त्व आहे. जेव्हा सूर्य धनु राशी सोडून मकर राशीत प्रवेश करतो, तेव्हा मकर संक्रांती साजरी केली जाते. सूर्याच्या मकरसंक्रमणावर आधारलेला भारतीय सण म्हणजे मकरसंक्रांती. या दिवशी सूर्याच्या उत्तरायणाला प्रारंभ होतो. मकर संक्रांतीला काही खास महत्व आहे. या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो, यामुळे या सणाला मकर संक्रांती म्हणतात.
२०२४ मध्ये १४ जानेवारी रोजी पहाटे २:४३ वाजता सूर्य धनु राशीतून बाहेर पडून मकर राशीत प्रवेश करणार आहे. सूर्य मकर राशीत प्रवेश करताच मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो. दरवर्षी मकर संक्रांतीचा सण पौष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो. यंदा हा सण १५ जानेवारीला साजरा होणार आहे. यंदाची मकर संक्रांती खूप खास असणार आहे. कारण, ७७ वर्षांनंतर या दिवशी विशेष ‘रवि आणि वरीयान योग’ तयार होणार आहे. या दुर्लभ योगात मकर संक्रांतीचे महत्व आणखी वाढून गेले आहे. तसेच पाच वर्षांनंतर मकरसंक्रांतीचा सण सोमवारी येत असल्याने आणखी विशेष होणार आहे. यामुळे ज्योतिषशास्त्रानुसार, काही राशींना मोठा लाभ होण्याची शक्यता आहे.
(हे ही वाचा : फेब्रुवारीमध्ये ‘या’ राशींना मिळेल चांगला पैसा? शनि-बुध युती बनल्याने वर्षभरात होऊ शकता प्रचंड श्रीमंत )
‘या’ राशींचे भाग्य चमकणार?
मेष राशी
मकर संक्रांती मेष राशींच्या लोकांसाठी खास असू शकते. कारण सूर्यदेव दहाव्या भावात असतील. त्यामुळे या काळात तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. यावेळी तुमचा आत्मविश्वास वाढू शकतो. तुमच्या कुटुंबाची भरभराट होण्याची शक्यता आहे.
सिंह राशी
सूर्याचे राशीपरिवर्तन सिंह राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरु शकते. मकर संक्रांतीपासून या राशीच्या लोकांना धनलाभ होण्याची शक्यता आहे. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना चांगल्या संधी मिळू शकतात. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी हा काळ खूप चांगला ठरु शकतो. भागीदारीचे काम करणाऱ्यांना चांगला आर्थिक लाभ मिळू शकतो.
(हे ही वाचा : Vastu Tips: तुळशीला जल अर्पण करताना कोणत्या ७ चुका करु नये? शास्त्रात काय सांगितलंय पहा जरा )
मीन राशी
मीन राशीच्या लोकांसाठी मकर संक्रांती जीनवात आनंद घेऊन येणारी ठरु शकते. या राशीच्या लोकांना जबरदस्त धनलाभ होण्याची शक्यता आहे. पैसे कमविण्याचे अनेक मार्ग सापडू शकतात. नोकरदार वर्गासाठी हा सर्वात उत्तम काळ ठरु शकतो. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता आहे. या काळात मालमत्ता खरेदी करु शकता.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)